गीत १२०
येशूसारखं प्रेमळ होऊ या!
१. म-हान स-र्व लो-कां-त हो-ता ये-शू,
पण ना दि-लं ग-र्वा-ला म-नी रु-जू.
दि-लं दे-वा-ने त्या स-र्व-श्रे-ष्ठ स्थान.
त-री न-म्र तो, ना त्या-ला अ-भि-मान.
२. ओ-झ्या-ने दब-ले-ल्यां-ची त्या-ला चिं-ता,
म्ह-णे, ‘तुम-चं ओ-झं म-ला तु-म्ही द्या.’
दे-ती जे-व्हा रा-ज्या प-हि-ली जा-गा,
ये-शू प्रे-मा-ने त्यां दे-ई त-जे-ला.
३. ‘तु-म्ही सा-रे भा-ऊ,’ म्ह-णा-ला ये-शू,
च-ला न-म्र-ते-ने अ-धीन त्या रा-हू.
जे प्रे-मळ, जे न-म्र, ते प्रि-य दे-वा,
त्यां-ना दे-ईल तो पृ-थ्वी-चा वा-र-सा.
(नीति. ३:३४; मत्त. ५:५; २३:८; रोम. १२:१६ ही वचनंसुद्धा पाहा.)