गीत १५
याहाचा जो एकुलता त्याची स्तुती करा
१. जय-जय-कार ख्रि-स्ता-चा,
तो प्रि-य य-हो-वा-ला.
क-रे न्या-या-ने रा-ज्य,
अ-पा-र त्या-ची द-या.
ना-वा-व-रून या-हा-च्या,
पु-सू-न का-ळी-मा.
सा-ऱ्या ज-गा-ला सां-गे,
या-हा कि-ती म-हान!
(कोरस)
जय-जय-कार ख्रि-स्ता-चा,
या-हा-चा जो ए-कुल-ता.
आ-हे सि-योन डों-ग-री.
म-हान आ-प-ला रा-जा!
२. जय-जय-कार ख्रि-स्ता-चा,
सो-डव-ले त्या-ने आ-म्हा.
दे-ऊन स्व-तः-चे जी-वन.
ता-रि-ले या मा-ती-ला.
सज-ली व-धू ये-शू-ची,
प-वि-त्र, ते-ज-स्वी.
दे-ईल हे ना-ते आ-म्हा,
का-यम-चे आ-शी-र्वाद!
(कोरस)
जय-जय-कार ख्रि-स्ता-चा,
या-हा-चा जो ए-कुल-ता.
आ-हे सि-योन डों-ग-री.
म-हान आ-प-ला रा-जा!
(स्तो. २:६; ४५:३, ४; प्रकटी. १९:८ ही वचनंसुद्धा पाहा.)