भाग ११ ची प्रस्तावना
या भागापासून ख्रिस्ती ग्रीक शास्त्राची सुरुवात होते. लहानशा शहरात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबात येशूचा जन्म झाला. येशूचे वडील सुतार होते आणि येशू त्यांच्यासोबत काम करायचा. पुढे जाऊन येशू मानवजातीला वाचवणार होता. यहोवाने त्याला स्वर्गातल्या राज्याचा राजा म्हणून निवडलं होतं. तुम्हाला मुलं असतील तर त्यांना पुढील गोष्टी शिकण्यासाठी मदत करा: चांगलं वातावरण मिळेल अशा कुटुंबाची निवड करून यहोवाने येशूची काळजी कशी घेतली? यहोवाने येशूला हेरोद राजापासून कसं वाचवलं आणि त्याचा उद्देश कसा नेहमी पूर्ण होतो? योहानला निवडून यहोवाने येशूसाठी मार्ग कसा तयार केला? तसंच, लहानपणापासूनच येशूला देवाचं मार्गदर्शन आवडायचं हे त्याने कसं दाखवलं?