भाग ४ ची प्रस्तावना
या भागात आपण योसेफ, ईयोब, मोशे आणि इस्राएली लोकांबद्दल शिकणार आहोत. या सर्वांना सैतानाच्या हातून भरपूर त्रास सहन करावा लागला. काहींसोबत अन्याय झाला. तर काहींना तुरुंगात टाकण्यात आलं. तसंच, काहींना गुलाम म्हणून विकण्यात आलं. इतकंच नाही, तर काहींना मृत्यूचाही सामना करावा लागला. पण, यादरम्यान यहोवाने वेगवेगळ्या मार्गांनी त्यांचा सांभाळ केला. तुम्हाला मुलं असतील तर त्यांना हे समजायला मदत करा, की यहोवाच्या या सेवकांनी वाईट परिस्थितीचा सामना करूनही आपला विश्वास कसा मजबूत ठेवला.
यहोवाने मिसरमध्ये (इजिप्तमध्ये) दहा पीडा आणून हे दाखवून दिलं, की तो तिथल्या सर्व खोट्या देवांपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. यहोवाने आधीच्या काळात आपल्या लोकांचं कशा प्रकारे रक्षण केलं आणि आताही तो हे कसं करत आहे, यावर जोर द्या.