वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पृ. ७२-७३
  • भाग ६ ची प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भाग ६ ची प्रस्तावना
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • इजिप्तमधून सुटका ते इस्राएलच्या पहिल्या राजापर्यंत
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • इस्राएल लोक कनान देशात प्रवेश करतात
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • विश्‍वासू राहिल्यास देवाची स्वीकृती मिळते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तिनं तिच्या बाबांना व यहोवाला खूश केलं
    आपल्या चिमुकल्यांना शिकवा
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पृ. ७२-७३
शमशोन गज्जा शहराचा प्रवेशद्वार उचलून नेताना

भाग ६ ची प्रस्तावना

इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात पोचले, तेव्हा निवासमंडप खऱ्‍या उपासनेचं मुख्य केंद्र बनला. याजक, लोकांना नियमशास्त्र शिकवायचे आणि न्यायाधीश राष्ट्राचं मार्गदर्शन करायचे. प्रत्येक इस्राएली व्यक्‍तीला यहोवाला आणि इतरांना विश्‍वासू राहण्याची गरज होती. या भागात आपण पाहणार आहोत, की एका व्यक्‍तीच्या निर्णयांचा आणि कामांचा इतरांवर कशा प्रकारे जबरदस्त प्रभाव पडू शकतो? तुम्हाला मुलं असतील तर त्यांना शिकवताना यावर जोर द्या, की दबोरा, नामी, यहोशवा, हन्‍ना, इफ्ताहची मुलगी या सर्वांचा त्यांच्या समाजावर कसा प्रभाव पडला? तसंच, इस्राएली नसलेल्या काही लोकांनी जसं की राहाब, रूथ, याएल आणि गिबोनी लोकांनी, देव इस्राएली लोकांसोबत आहे हे ओळखून त्यांची बाजू कशी घेतली?

आपण काय शिकणार आहोत?

  • यहोवाने न्यायाधीशांचा वापर केला आणि चमत्कार करून आपल्या लोकांना वाचवलं

  • यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवल्यामुळे, तरुण आणि वृद्ध विश्‍वासू जनांना प्रतिफळ मिळालं

  • देव पक्षपात करत नाही; जे त्याच्यावर प्रेम करतात आणि योग्य ते करतात त्यांना तो स्वीकारतो, मग ते कोणत्याही राष्ट्रांतले किंवा पार्श्‍वभूमीचे असले तरीही

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा