वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पाठ ७५ पृ. १७८-पृ. १७९ परि. ४
  • सैतान येशूची परीक्षा घेतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सैतान येशूची परीक्षा घेतो
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • येशूप्रमाणे तुम्हीही “सैतानाला अडवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • येशूच्या परिक्षांपासून बोध घेणे
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • येशूच्या परीक्षेपासून शिकणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • सार्वकालिक जीवनाचा शत्रू
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पाठ ७५ पृ. १७८-पृ. १७९ परि. ४
मंदिराच्या उंच टोकावरून उडी मारण्यासाठी येशू नकार देतो

पाठ ७५

सैतान येशूची परीक्षा घेतो

दगडांच्या भाकरी करण्यापासून येशू नकार देतो

येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर, पवित्र आत्मा त्याला अरण्यात घेऊन गेला. येशूने ४० दिवस काहीच खाल्लं नाही. त्यामुळे त्याला खूप भूक लागली. तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला. तो येशूला म्हणाला: ‘जर तू खरोखरंच देवाचा मुलगा आहेस, तर या दगडांना भाकरी बनायला सांग.’ पण येशूने शास्त्रातल्या वचनाचा वापर करून त्याला म्हटलं: ‘असं लिहिलं आहे, की जगण्यासाठी फक्‍त अन्‍न नाही तर यहोवा देवाची प्रत्येक गोष्ट ऐकण्याची गरज आहे.’

त्यानंतर सैतानाने येशूला म्हटलं: ‘जर तू खरंच देवाचा पुत्र असशील, तर मंदिराच्या सर्वात उंच ठिकाणावरून खाली उडी टाक. कारण लिहिलं आहे, की तुला वाचवण्यासाठी देव आपल्या दूतांना पाठवेल.’ पण या वेळीसुद्धा येशूने वचनाचा वापर करून उत्तर दिलं: ‘असंही लिहिलं आहे, की तू तुझा देव यहोवा याची परीक्षा घेऊ नकोस.’

सैतान सर्व राज्य देण्याचा प्रस्ताव येशूपुढे मांडतो. येशू तो प्रस्ताव नाकारतो

मग सैतानाने येशूला जगातली सर्व राज्यं आणि त्यांतली संपत्ती व त्यांचं वैभव दाखवलं. त्याने येशूला म्हटलं: ‘तू फक्‍त एकदा माझी उपासना कर, मग मी ही सर्व राज्यं आणि त्यांचं वैभव तुला देईन.’ पण येशूने उत्तर दिलं: ‘अरे सैताना! चालता हो! कारण लिहिलं आहे, की आपण फक्‍त यहोवा देवाचीच उपासना केली पाहिजे.’

मग सैतान निघून गेला आणि देवदूतांनी येऊन येशूला अन्‍न दिलं. त्यानंतर येशूने प्रचाराचं काम सुरू केलं. त्याने लोकांना देवाच्या राज्याबद्दलचा आनंदाचा संदेश सांगितला. येशूला याच कामासाठी पृथ्वीवर पाठवण्यात आलं होतं. येशू लोकांना जे शिकवायचा ते त्यांना आवडायचं. आणि यामुळे तो जिथे कुठे जायचा, तिथे लोक त्याच्या मागोमाग जायचे.

“[सैतान] खोटं बोलतो तेव्हा त्याच्या मूळ स्वभावानुसारच बोलतो, कारण तो खोटारडा आणि खोटेपणाचा बाप आहे.”—योहान ८:४४

प्रश्‍न: तीन परीक्षा कोणत्या होत्या? येशूने सैतानाला उत्तर कसं दिलं?

मत्तय ४:१-११; मार्क १:१२, १३; लूक ४:१-१५; अनुवाद ६:१३, १६; ८:३; याकोब ४:७

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा