वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पाठ ५५ पृ. १३२
  • यहोवाच्या देवदूताने हिज्कीयाचं रक्षण केलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या देवदूताने हिज्कीयाचं रक्षण केलं
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • तो “यहोवाला एकनिष्ठ राहिला”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • देव हिज्कीया राजाला मदत करतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • सात मेंढपाळ, आठ लोकनायक—आज आपल्याकरता कोणता अर्थ राखून आहेत?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • ‘भिऊ नको. मी तुला साहाय्य करीन’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पाठ ५५ पृ. १३२
एक देवदूत अश्‍शूरी छावणीवर हल्ला करतो

पाठ ५५

यहोवाच्या देवदूताने हिज्कीयाचं रक्षण केलं

अश्‍शूरी साम्राज्याने दहा वंशांच्या इस्राएली राज्यावर कबजा केला. अश्‍शूरचा राजा सन्हेरीब याला दोन वंशांच्या यहूदा राज्यावरही कबजा मिळवायचा होता. तो एक-एक करून यहूदाची शहरं जिंकत गेला. त्याला खासकरून यरुशलेम शहर हवं होतं. पण सन्हेरीबला हे माहीत नव्हतं, की यहोवा यरुशलेमचं रक्षण करत आहे.

सन्हेरीबने यरुशलेम शहर जिंकण्याचा विचार सोडून द्यावा म्हणून यहूदाचा राजा, हिज्कीया याने त्याला खूप पैसे दिले. सन्हेरीबने पैसे घेतले. पण तरीसुद्धा त्याने यरुशलेमवर हल्ला करण्यासाठी त्याचं शक्‍तिशाली सैन्य पाठवलं. अश्‍शूरी दिवसेंदिवस शहराजवळ येत असल्यामुळे यरुशलेम शहराचे लोक घाबरले. हिज्कीयाने त्यांना म्हटलं: ‘घाबरू नका. अश्‍शूरी शक्‍तिशाली असले, तरी यहोवा आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त शक्‍तिशाली बनवेल.’

सन्हेरीबने यरुशलेमच्या लोकांची थट्टा करण्यासाठी संदेश घेऊन एका अधिकाऱ्‍याला पाठवलं. त्या अधिकाऱ्‍याला रबशाके म्हटलं जायचं. तो शहराच्या बाहेरून ओरडून म्हणाला: ‘यहोवा तुमची काहीएक मदत करू शकणार नाही. हिज्कीया तुम्हाला फसवत आहे. त्याचं ऐकू नका. तुम्हाला कोणताच देव वाचवू शकत नाही.’

अशा परिस्थितीत काय करावं, हे हिज्कीयाने यहोवाला विचारलं. यहोवाने त्याला उत्तर दिलं: ‘रबशाकेने जे म्हटलं त्यामुळे घाबरू नकोस. सन्हेरीब यरुशलेमवर कबजा मिळवू शकणार नाही.’ त्यानंतर सन्हेरीबने हिज्कीयाला काही पत्रं पाठवली. त्यांत लिहिलं होतं: ‘यहोवा तुम्हाला वाचवू शकत नाही. हार मान्य करा.’ हिज्कीयाने प्रार्थना केली: ‘यहोवा कृपा करून वाचव आम्हाला. म्हणजे सर्वांना कळेल की फक्‍त तूच खरा देव आहेस.’ यहोवाने त्याला उत्तर दिलं: ‘अश्‍शूरी राजा यरुशलेममध्ये येणार नाही. मी माझ्या शहराचं रक्षण करेन.’

शत्रू सैनिकांनी शहराच्या बाहेर तंबू बांधले होते. सन्हेरीबला खात्री होती, की तो यरुशलेमवर लवकरच कबजा करेल. पण हिज्कीयाला प्रार्थनेचं उत्तर दिल्यावर त्याच रात्री यहोवाने एका देवदूताला पाठवलं. त्या देवदूताने १,८५,००० (एक लाख पंचाऐंशी हजार) सैनिकांना मारून टाकलं! सन्हेरीब राजाने आपले सर्वात शक्‍तिशाली सैनिक गमावले. त्याला हार मानून परत आपल्या देशात जावंच लागलं. यहोवाने हिज्कीया आणि यरुशलेमचं रक्षण करण्याचं जे वचन दिलं होते ते त्याने पूर्ण केलं. समज त्या काळात आपण यरुशलेममध्ये असतो, तर तूही यहोवावर भरवसा दाखवला असता का?

“परमेश्‍वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्‍यांच्या भोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो.” —स्तोत्र ३४:७

प्रश्‍न: यहोवाने यरुशलेमचं रक्षण कसं केलं? यहोवा तुझंही रक्षण करेल असं तुला वाटतं का?

२ राजे १७:१-६; १८:१३-३७; १९:१-३७; २ इतिहास ३२:१-२३

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा