वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पाठ ३ पृ. १४-पृ. १५ परि. ३
  • आदाम आणि हव्वा यांनी देवाचं ऐकलं नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आदाम आणि हव्वा यांनी देवाचं ऐकलं नाही
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • त्यांनी आपलं घर का गमावलं
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • एदेन बागेत जीवन कसं होतं?
    देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • खडतर जीवनाची सुरुवात होते
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • देवाला वाईट वाटतं आपण त्याला कसं खूश करू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पाठ ३ पृ. १४-पृ. १५ परि. ३
आदाम आणि हव्वा एदेन बागेच्या बाहेर जाताना

पाठ ३

आदाम आणि हव्वा यांनी देवाचं ऐकलं नाही

हव्वाने आदामच्या हातात देवाने मना केलेले फळ दिलं

एक दिवशी हव्वा एकटी असताना साप तिच्याशी बोलला. तो म्हणाला: ‘बागेतल्या कोणत्याच झाडाचं फळ खायचं नाही, असं देव तुम्हाला म्हणाला का?’ हव्वा म्हणाली: ‘असं काही नाही, आम्ही खाऊ शकतो. पण फक्‍त एकाच झाडाचं फळ आम्ही खाऊ शकत नाही. जर खाल्लं तर आम्ही मरू.’ मग साप म्हणाला: ‘तुम्ही नाही मरणार. याउलट तुम्ही जर ते खाल्लं तर तुम्ही देवासारखं बनाल.’ तुला काय वाटतं, साप जे बोलला ते खरं होतं का? नाही, तो खोटं बोलत होता. पण हव्वाला ते खरं वाटलं. हव्वा त्या फळाकडे बघतच राहिली. तिला ते हवंहवंसं वाटलं. त्यामुळे तिने ते फळ खाल्लं आणि आदामलाही दिलं. आदामला माहीत होतं, की त्यांनी देवाचं ऐकलं नाही तर ते मरतील. पण तरीसुद्धा आदामने ते फळ खाल्लं.

आदाम आणि हव्वा एदेन बागेच्या बाहेर जातात तेव्हा देवाने बागेच्या बाहेर देवदूतांना उभं कलं आणि आगीची फिरणारी तलवार ठेवली

मग संध्याकाळी यहोवा आदाम आणि हव्वाशी बोलला. देवाने त्यांना विचारलं, की त्याने सांगितलेली गोष्ट त्यांनी का ऐकली नाही. तेव्हा हव्वा म्हणाली: ‘सापाने मला फळ खायला सांगितलं म्हणून मी ते खाल्लं.’ आणि जेव्हा यहोवाने आदामला विचारलं तेव्हा तो म्हणाला: ‘हव्वाने मला सांगितलं म्हणून मी ते फळ खाल्लं.’ आदाम आणि हव्वा यांनी देवाचं ऐकलं नाही म्हणून देवाने त्यांना बागेतून बाहेर काढून टाकलं. त्यानंतर, त्याने बागेच्या बाहेर देवदूतांना उभं केलं आणि एक आगीची तलवार ठेवली. त्यामुळे आदाम आणि हव्वा परत कधीच आत जाऊ शकले नाहीत.

मग जो हव्वाशी खोटं बोलला त्याचं काय झालं? त्यालाही शिक्षा केली जाईल, असं यहोवा म्हणाला. पण हव्वाशी खरंतर साप बोलला नव्हता. कारण यहोवाने बोलणारे साप बनवले नव्हते. एका वाईट देवदूताने सापाला बोलायला लावलं होतं. त्याने हव्वाला फसवण्यासाठी असं केलं. बायबलमध्ये त्या देवदूताला दियाबल सैतान म्हटलं आहे. पण यहोवा लवकरच सैतानाचा नाश करणार आहे. म्हणजे, तो आपल्याला वाईट गोष्टी करण्यासाठी कधीच फसवू शकणार नाही.

“सैतान . . . सुरुवातीपासूनच खुनी आहे आणि तो सत्यात टिकून राहिला नाही कारण त्याच्यामध्ये सत्य नाही.”—योहान ८:४४

प्रश्‍न: हव्वाने ते फळ का खाल्लं? आदाम आणि हव्वा यांनी देवाचं ऐकलं नाही, त्यामुळे देवाने त्यांना काय शिक्षा केली? दियाबल सैतान कोण आहे?

उत्पत्ति ३:१-२४; योहान ८:४४; १ योहान ३:८; प्रकटीकरण १२:९

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा