वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ypq प्रश्‍न ३ पृ. ९-११
  • मी माझ्या आई-बाबांशी कसं जुळवून घेऊ शकतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मी माझ्या आई-बाबांशी कसं जुळवून घेऊ शकतो?
  • तरुणांच्या मनात येणाऱ्‍या १० प्रश्‍नांची उत्तरं
  • मिळती जुळती माहिती
  • आमचा समृद्ध आध्यात्मिक वारसा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • आमच्या आईवडिलांनी आम्हाला देवावर प्रेम करायला शिकवलं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • माझ्या पालकांचे अनुकरण करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
तरुणांच्या मनात येणाऱ्‍या १० प्रश्‍नांची उत्तरं
ypq प्रश्‍न ३ पृ. ९-११
एक तरुण त्याचे वडील त्याच्याशी बोलत असताना तोंड फिरवतो

प्रश्‍न ३

मी माझ्या आई-बाबांशी कसं जुळवून घेऊ शकतो?

हे जाणून घेणं महत्त्वाचं का आहे?

तुम्ही जितकं जास्त आपल्या आई-बाबांशी जुळवून घ्याल तितकंच तुमचं जीवन सोपं होईल.

तुम्ही काय केलं असतं?

कल्पना करा: बुधवारचा दिवस आहे, दुपारची वेळ आहे. १७ वर्षांचा जेफ्री आपली कामं संपवून आता कुठं मोकळा झाला आहे. थोडा वेळ आराम तर मिळायलाच हवा, म्हणून तो आपल्या आवडत्या खुर्चीवर बसून टी.व्ही लावतो.

तेवढ्यात बाबा आत येतात आणि जेफ्रीला तिथं बसलेला पाहून चिडतात.

“जेफ्री! इथं टी.व्ही समोर बसून वेळ काय वाया घालवतोयस, त्यापेक्षा आपल्या लहान भावाला होमवर्क पूर्ण करण्यासाठी मदत कर! तुला सांगितलेली एकही गोष्ट तू ऐकत नाहीस!”

“झालं सुरू यांचं,” असं जेफ्री पुटपुटतो पण त्याचं बोलणं त्यांना स्पष्ट ऐकू येतं.

बाबा थोडं पुढे येऊन म्हणतात, “काय बोललास, परत बोल एकदा?”

“मी कुठं काय बोललो!” जेफ्री डोळे फिरवून बोलतो.

आता मात्र बाबांचा पारा आणखी चढतो. “माझ्याशी बोलताना नीट बोल जरा!” असं ते त्याला खडसवून सांगतात.

समजा तुम्ही जेफ्रीच्या जागी असता तर तुम्ही हा वाद कसा टाळू शकला असता?

थांबा आणि विचार करा!

आपल्या आई-बाबांशी बोलणं गाडी चालवण्यासारखं आहे. गाडी चालवता-चालवता समजा समोर “रस्ता बंद” असा बोर्ड दिसला तर तिथंच थांबण्यापेक्षा तुम्ही गाडी वळवून दुसरा रस्ता शोधून, पुढे जाऊ शकता.

एक उदाहरण पाहू या:

“बाबांशी बोलणं कठीणच आहे. कधीकधी त्यांच्याशी बोलत असताना थोड्या वेळाने ते मला विचारतात, ‘तू मला काही सांगत होतीस का? सॉरी माझं लक्ष नव्हतं.’” असं लिआ नावाची मुलगी म्हणते.

लिआकडे कमीतकमी तीन पर्याय आहेत.

  1. १. ती बाबांवर चिडू शकते.

    लिआ ओरडते, “काय हो बाबा! मी तुम्हाला इतकी महत्त्वाची गोष्ट सांगत होते!”

  2. २. बाबांशी बोलायचं सोडून देऊ शकते.

    लिआ कंटाळते आणि तो विषय तिथंच थांबवते.

  3. ३. योग्य वेळेची वाट पाहून पुन्हा तो विषय बाबांसमोर मांडू शकते.

    लिआ नंतर बाबांशी समोरासमोर बोलते किंवा आपल्या प्रॉब्लमविषयी त्यांना लिहिते.

तुम्ही लिआला कुठला पर्याय सुचवाल?

हे लक्षात घ्या: लिआच्या बाबांचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं आणि त्यामुळे ती का वैतागलेली आहे हे त्यांना माहीत नाही. जर लिआ पर्याय १ निवडते, तर ती त्यांच्यावर का ओरडली ते त्यांना कळणारच नाही. या पर्यायामुळे लिआ काय सांगण्याचा प्रयत्न करतेय हे त्यांना समजणार नाही. शिवाय, तिच्या या वागण्यामुळे त्यांचा अनादर होईल. (इफिसकर ६:२) त्यामुळे हा पर्याय निवडल्यानं कुणाचाच फायदा होणार नाही.

रस्त्यात एका अडथळ्यासमोर कार येते

जर रस्ता बंद असेल तर आपण दुसरा रस्ता शोधतो, तसंच आई-बाबांशी जुळवून घेण्याचा मार्गदेखील तुम्ही शोधून काढू शकता

पर्याय २ सोपा वाटत असला, तरी तो योग्य ठरणार नाही. का बरं? आपले प्रॉब्लम्स नीट सोडवता यावेत यासाठी तिला बाबांशी बोलावं लागेल. आणि बाबांना तिला तेव्हाच मदत करता येईल जेव्हा तिला नेमकं कशाची गरज आहे, किंवा तिला कुठली गोष्ट सतावत आहे हे त्यांना माहीत असेल. गप्प बसल्यानं काहीच साध्य होत नाही.

पर्याय ३ निवडला, तर लिआ एका अर्थानं “रस्ता बंद” याला शेवट समजणार नाही. याउलट ती योग्य वेळी तो विषय काढायचं ठरवेल. आणि तिने त्यांना पत्र लिहून सांगण्याचं ठरवलं असेल, तर तेही योग्यच असेल. कारण तिने आपल्या भावना कागदावर उतरवल्यामुळे तिचं मन हलकं होईल.

पत्राद्वारे सांगितल्यामुळे तिला नेमकं काय म्हणायचं आहे ते ती नीट सांगू शकेल. लिआचे बाबा जेव्हा ते पत्र वाचतील तेव्हा त्यांना हे समजेल की, त्या वेळी ती त्यांना नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यामुळे ते तिची परिस्थिती नीट समजून घेतील. म्हणून पर्याय ३ हा लिआ आणि तिचे बाबा या दोघांसाठी फायद्याचा ठरू शकतो. समोरासमोर बोलणं किंवा पत्राद्वारे आपले विचार कळवणं हे पर्याय बायबलमधील सल्ल्यानुसार आहेत. त्यामध्ये म्हटलं आहे, “शांतीला  . . . पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे आपण लागावे.”—रोमकर १४:१९.

लिआकडे आणखी कोणते पर्याय असू शकतात?

आणखी एखाद्या पर्यायाविषयी विचार करा. मग विचार करा की या पर्यायाचे काय परिणाम होतील.

बायबलमधून मोलाचा सल्ला

“तुमच्या आईवडिलांचा मान राखा.”—इफिसकर ६:२, सुबोधभाषांतर.

“तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त . . . असावे.”—कलस्सैकर ४:६.

“प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा.”—याकोब १:१९.

जे मनात आहे ते स्पष्ट बोला

तुम्ही आपल्या आई-बाबांना जे सांगितलं आणि त्यांना जे समजलं यामध्ये बराच फरक असू शकतो.

जसं की:

आज तुझा मूड का खराब आहे? कॉलेजमध्ये काही झालं का? असं आई-बाबांनी तुम्हाला विचारलं पण तुम्ही असं उत्तर दिलं “काही नाही.”

तर त्यांना तुम्ही असं म्हटल्यासारखं वाटेल: “तुम्हाला नाही समजणार माझा प्रॉब्लम, मला कसं वाटतंय हे तुमच्यापेक्षा माझे मित्रच चांगलं समजू शकतात.”

समजा तुमच्यासमोर एक कठीण समस्या आहे आणि तुमचे आई-बाबा तुम्हाला मदत करू इच्छितात पण जर तुम्ही असं म्हटलं “तुम्ही काळजी करू नका, मी काढेन यातून काहीतरी मार्ग.”

  • तर त्यांना काय वाटू शकतं?

  • याऐवजी तुम्ही काय म्हणू शकला असता?

माझा निर्धार

  • पुढच्या वेळी मला आई-बाबांशी बोलावसं वाटत नसलं तर मी काय करणार?

  • एखाद्या विषयावर मला आई किंवा बाबांशी बोलावसं वाटत नसलं आणि त्यांनी असा हट्ट धरला की, “नाही, तू सांगच काय झालं ते” तेव्हा मी काय करणार?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा