अनुक्रमणिका
भाग १ यहोवाकडं परत का यावं?
बायबलमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या यहोवाच्या लोकांनासुद्धा आपल्यासारख्याच समस्या होत्या. त्यांना मदत करण्यासाठी यहोवानं पहिलं पाऊल उचललं आणि त्यानं त्यांना जे वचन दिलं तेच वचन तो आज आपल्यालासुद्धा देतो. यहोवा एक प्रेमळ मेंढपाळ आहे. त्याच्या मेंढरांकडं त्याचं लक्ष आहे. एखादं मेंढरू त्याच्या कळपापासून दूर भरकटलं असलं तरी, तो त्याचा शोध घेतो आणि त्याला पुन्हा कळपात आणण्याचा प्रयत्न करतो.
भाग १ हरवलेल्या मेंढराला मी शोधेन
भाग २-४ परत येणं सोपं का नाही?
अनेक वर्षांपासून देवाची विश्वासूपणे सेवा करणाऱ्यांनासुद्धा चिंता होत्या. इतरांनी त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यांनाही दोषी असल्यासारखं वाटत होतं. आणि याचा परिणाम त्यांच्या सेवेवर झाला. पण यहोवानं त्यांना या सर्वांतून सावरायला, पुन्हा त्याच्या लोकांबरोबर संगती करायला आणि त्याच्या सेवेत परत आनंदी व्हायला कशी मदत केली ते पाहा.
भाग २ चिंता—चारी बाजूंनी येणारी संकटं
भाग ३ दुखावलेलं मन—एखादी व्यक्ती आपलं मन दुखावते तेव्हा . . .
भाग ४ दोषी भावना—“माझे पाप दूर करून मला निर्मळ कर”
भाग ५ परत येण्यासाठी काय करावं लागेल?
तुम्ही परत यावं अशी यहोवाची इच्छा आहे याचे अनेक पुरावे आहेत. यहोवापासून दूर गेलेले अनेक जण का परत आले, मंडळीत गेल्यावर सर्वांनी त्यांचं स्वागत कसं केलं आणि वडिलांनी त्यांना यहोवाची सेवा पुन्हा जोमानं सुरू करण्यास कशी मदत केली याबद्दल वाचा.
भाग ५ आपल्या मेंढपाळाकडं व जिवाचं रक्षण करणाऱ्याकडं परत या