वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • yc पाठ १४ पृ. ३०-३१
  • पृथ्वीवर येणारं राज्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृथ्वीवर येणारं राज्य
  • आपल्या चिमुकल्यांना शिकवा
  • मिळती जुळती माहिती
  • पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
  • “नंदनवनात भेटू या!”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • “तू माझ्यासोबत नंदनवनात असशील”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • देवाचं राज्य काय आहे?
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
अधिक माहिती पाहा
आपल्या चिमुकल्यांना शिकवा
yc पाठ १४ पृ. ३०-३१
येशू ख्रिस्त नंदनवन पृथ्वीवर राज्य करतो

धडा १४

पृथ्वीवर येणारं राज्य

हे कोणाचं राज्य आहे?— बरोबर. देवाचं राज्य! ते पृथ्वीला नंदनवन बनवणार आहे. आणखी सांगू का तुला या राज्याबद्दल?—

प्रत्येक राज्याचा एक राजा असतो. हा राजा लोकांवर राज्य करतो. देवाच्या राज्याचा राजा कोण आहे माहीतंय तुला?— येशू ख्रिस्त! तो स्वर्गात राहतो. लवकरच तो पृथ्वीवर राहणाऱ्‍या सर्वांवर राज्य करेल. येशू पृथ्वीवर राज्य करायला लागेल तेव्हा सगळे लोक खूश होतील का?—

नंदनवनात तू काय करशील?

हो. नंदनवनात कुणीही एकमेकांबरोबर भांडणार नाही. आपण एकमेकांवर प्रेम करू. तिथं कुणीही आजारी पडणार नाही, मरणार नाही. अंधळ्या लोकांना दिसू लागेल, बहिऱ्‍या लोकांना ऐकू येईल आणि ज्यांना चालता येत नाही ते लोक उड्या मारतील, पळतील. आपल्याला खायला भरपूर असेल. प्राणी एकमेकांना खाणार नाहीत, ते एकमेकांचे आणि आपलेही फ्रेंड्‌स बनतील. मेलेल्या लोकांना परत जिवंत केलं जाईल. तेव्हा आपण रिबका, राहाब, दावीद आणि एलीया यांना भेटू. या ब्रोशरमध्ये आपण त्यांच्याबद्दल शिकलो. तुला आवडेल का त्यांना भेटायला?—

यहोवाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू खूश राहावं असं त्याला वाटतं. तू जर यहोवाबद्दल असंच शिकत राहिलास, त्याचं ऐकत राहिलास तर तुला या सुंदर नंदनवनात राहता येईल. राहायला आवडेल का तुला या नंदनवनात?—

आपण वाचू या

  • यशया २:४; ११:६-९; २५:८; ३३:२४; ३५:५, ६

  • योहान ५:२८, २९; १७:३

प्रश्‍न:

  • देवाच्या राज्याचा राजा कोण आहे?

  • येशू कुणावर राज्य करेल?

  • येशू पृथ्वीवर राज्य करेल तेव्हा सगळीकडं कसं असेल?

  • नंदनवनात राहायचं असेल तर तुला काय करावं लागेल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा