धडा १३
तीमथ्याला लोकांना मदत करायची इच्छा होती
तीमथ्याला लोकांना मदत करायला खूप आवडायचं. म्हणून तो या ठिकाणाहून त्या ठिकाणी जायचा. असं करताना त्याला खूप मजा यायची. ऐकायचं का तुला याबद्दल?—
तीमथ्याची आई आणि त्याची आजी यांनी त्याला यहोवाबद्दल शिकवलं
तीमथ्य लुस्त्र नावाच्या एका शहरात वाढला. तो लहान होता तेव्हा त्याची आजी लोईस आणि आई युनीके यांनी त्याला यहोवाबद्दल शिकवायला सुरुवात केली. आणि तो जसजसा मोठा होत गेला तसतसं इतर लोकांना यहोवाबद्दल शिकवू लागला.
एकदा पौलानं तीमथ्याला, तू माझ्याबरोबर इतर ठिकाणी प्रिचिंगला येणार का असं विचारलं. तेव्हा तो लगेच, ‘हो’ म्हणाला कारण इतरांना मदत करायला त्याला खूप आवडायचं.
तीमथ्य पौलाबरोबर मासेदोनियातील थेस्सलनीका नावाच्या शहरात गेला. तिथं जायला त्यांना खूप चालावं लागलं आणि बोटीनं प्रवास करावा लागला. तिथं पोहचल्यावर त्यांनी लोकांना यहोवाबद्दल शिकायला मदत केली. पण काही लोकांना मात्र त्यांचा राग आला आणि त्यांनी त्यांना मारलं. म्हणून मग पौलाला आणि तीमथ्याला तिथून निघून दुसरीकडं जावं लागलं.
तीमथ्य खूपखूप खूश होता
काही महिन्यांनंतर पौलानं तीमथ्याला, तू थेस्सलनीकाला जाऊन तिकडचे ब्रदर्स कसे आहेत हे पाहून येशील का, असं विचारलं. तेव्हा तीमथ्याला खूप भीती वाटली. कारण थेस्सलनीकातील लोकांनी त्याला मारलं होतं! पण तीमथ्याला तिकडच्या ब्रदर्सची काळजी वाटत असल्यामुळं त्यानं धाडस केलं आणि तो तिकडं गेला. थेस्सलनीकातील सर्व ब्रदर्स बरे आहेत, ही आनंदाची बातमी घेऊन तो पौलाकडं आला.
तीमथ्य खूप वर्षांपर्यंत पौलाबरोबर प्रिचिंग करत होता. एकदा पौलानं असंही लिहिलं, की मंडळ्यांना मदत करण्यासाठी तीमथ्यच सर्वात बेस्ट आहे. तीमथ्याचं यहोवावर आणि लोकांवर खूप प्रेम होतं.
तुझंही लोकांवर प्रेम आहे का? त्यांनी यहोवाबद्दल शिकावं म्हणून तू त्यांना मदत करशील का?— असं केलंस ना तर आपणसुद्धा तीमथ्यासारखंच खूपखूप खूश होऊ शकतो.