वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • yc पाठ ११ पृ. २४-२५
  • त्यांनी येशूबद्दल लिहिलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्यांनी येशूबद्दल लिहिलं
  • आपल्या चिमुकल्यांना शिकवा
  • मिळती जुळती माहिती
  • येशूबद्दल लिहिणारे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • आपल्या गुरूकडून तो क्षमा करण्यास शिकला
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • विश्‍वास, योग्य आचरण आणि प्रेम यांबद्दल सल्ला
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • तो आपल्या धन्याकडून क्षमा करण्याचा धडा शिकतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
आपल्या चिमुकल्यांना शिकवा
yc पाठ ११ पृ. २४-२५
येशूबद्दल लिहिणारे लोक—मत्तय, मार्क, लूक, योहान, पेत्र, याकोब, यहूदा आणि पौल

धडा ११

त्यांनी येशूबद्दल लिहिलं

चित्रात तुला हे लोक दिसतात का?— त्यांची नावं आहेत: मत्तय, मार्क, लूक, योहान, पेत्र, याकोब, यहुदा आणि पौल. हे लोक येशूच्या काळात राहत होते आणि त्यांनी येशूबद्दल लिहिलं. आपण वाचू या आणखी त्यांच्याबद्दल.

या लोकांबद्दल तुला काय माहीत आहे?

येशूबरोबर ज्या तिघांनी प्रिचिंग केली ते प्रेषित होते. त्यांची नावं माहीत आहेत का तुला?— मत्तय, योहान व पेत्र. मत्तय आणि योहान येशूला ओळखत होते आणि प्रत्येकानं त्याच्याबद्दल एकएक पुस्तक लिहिलं. प्रेषित योहानानंपण ‘प्रकटीकरण’ नावाचं पुस्तक आणि ‘पहिले योहान,’ ‘दुसरे योहान,’ आणि ‘तिसरे योहान’ नावाची तीन पत्रं लिहिली. प्रेषित पेत्रानं बायबलमधली दोन पत्रं लिहिली. त्यांना ‘पहिले पेत्र’ आणि ‘दुसरे पेत्र’ म्हणतात. पेत्रानं दुसऱ्‍या पत्रात असं लिहिलं, की यहोवानं स्वर्गातून एकदा आकाशवाणी केली व येशूबद्दल म्हटलं: ‘हा माझा पुत्र आहे. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो.’

चित्रात तुला हे दुसरे लोक दिसतात का? त्यांनीपण येशूबद्दलची माहिती देणारी पुस्तकं लिहिली. त्यांपैकी एकाचं नाव आहे मार्क. येशूला धरलं तेव्हा तोही त्याच्याबरोबर होता. येशूबरोबर जे काही घडलं ते सर्व त्यानं पाहिलं. आणखी एक जण होता लूक. तो डॉक्टर होता आणि येशूचा मृत्यू झाल्यानंतर तो ख्रिश्‍चन झाला.

आणखी दोघं दिसतात का तुला चित्रात? त्यांनीसुद्धा बायबलमधली पुस्तकं लिहिली. ते येशूचे लहान भाऊ होते. तुला त्यांची नावं माहीत आहेत का? एकाचं नाव आहे याकोब आणि दुसऱ्‍याचं नाव यहुदा. पहिल्यांदा त्यांनी येशूवर विश्‍वास ठेवला नाही. त्यांना वाटलं तो वेडा आहे. पण नंतर त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला आणि ते ख्रिश्‍चन झाले.

या चित्रात आणखी एक जण दिसतो बघ. त्यानंही येशूबद्दल लिहिलं. त्याचं नाव आहे पौल. ख्रिश्‍चन व्हायच्याआधी त्याचं नाव शौल होतं. त्याला ख्रिश्‍चन लोकांचा खूप राग यायचा व तो त्यांना खूप त्रास द्यायचा. पौल ख्रिश्‍चन का झाला?— एकदा तो रस्त्यावरून चालला होता तेव्हा अचानक त्याला स्वर्गातून कोणीतरी त्याच्याबरोबर बोलत असल्याचं ऐकू आलं. येशू त्याच्याबरोबर बोलत होता! त्यानं पौलाला विचारलं: ‘तू माझ्या लोकांना असा त्रास का देतोस?’ त्यानंतर पौल चांगला माणूस झाला आणि ख्रिश्‍चन बनला. त्यानं बायबलमधली १४ पुस्तकं, म्हणजे रोमकरांसपासून इब्री लोकांसपर्यंतची पुस्तकं लिहिली.

आपण रोज बायबल वाचतो, नाही का?— बायबल वाचल्यावर आपल्याला येशूबद्दल पुष्कळ गोष्टी शिकायला मिळतात. तुला आवडेल का मग येशूबद्दल आणखी शिकायला?—

आपण वाचू या

  • २ पेत्र १:१६-१८

  • मार्क ३:२१; १४:५१

  • यहूदा १

  • प्रेषितांची कृत्ये ९:१-१८

प्रश्‍न:

  • येशूच्या कोणत्या प्रेषितांनी त्याच्याबद्दल लिहिलं?

  • येशूच्या दोन भावांची नावं काय ज्यांनी बायबल लिहिलं?

  • पौल ख्रिश्‍चन कसा बनला?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा