वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ll भाग ४ पृ. १०-११
  • सैतानाचं ऐकल्यामुळे काय झालं?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सैतानाचं ऐकल्यामुळे काय झालं?
  • देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • मिळती जुळती माहिती
  • एदेन बागेत जीवन कसं होतं?
    देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • भाग ४
    देवाचं ऐका
  • मृत कोठे आहेत?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • आपण का म्हातारे होतो आणि मरतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
अधिक माहिती पाहा
देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
ll भाग ४ पृ. १०-११

भाग ४

सैतानाचं ऐकल्यामुळे काय झालं?

आदाम आणि हव्वाने देवाची आज्ञा मोडली आणि त्यामुळे ते मेले. उत्पत्ती ३:६, २३

हव्वाने मनाई केलेलं फळ खाल्लं आणि आदामलाही दिलं

हव्वाने सापाचं ऐकलं आणि फळ खाल्लं. मग तिने ते आदामला दिलं आणि त्यानेही ते खाल्लं.

आदाम आणि हव्वाला नंदनवनातून बाहेर जावं लागलं

त्यांनी जे केलं ते चुकीचं होतं; ते पाप होतं. त्यामुळे देवाने त्यांना नंदनवनातून बाहेर काढलं.

आदाम आणि हव्वा म्हातारे होऊन मेले

एदेन बागेतून बाहेर निघाल्यावर त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं जीवन खूप कठीण झालं. ते म्हातारे झाले आणि शेवटी मेले. मेल्यानंतर ते स्वर्गात किंवा नरकात, कुठेही गेले नाहीत. त्यांचं जीवन संपलं होतं.

मेलेले लोक मातीत मिळतात; त्यांचं जीवन संपतं. उत्पत्ती ३:१९

वेगवेगळ्या संस्कृतींचे आणि वेगवेगळ्या काळातले लोक

आपण सगळेच आदाम आणि हव्वाची मुलं आहोत आणि म्हणून आपणही मरतो. मेलेले लोक काहीच पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत आणि काही करूही शकत नाहीत.—उपदेशक ९:५, १०.

एक मुलगी मेली आहे आणि तिच्या घरचे लोक रडत आहेत

लोकांनी मरावं अशी यहोवा देवाची मुळीच इच्छा नव्हती. लवकरच तो मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करणार आहे. त्यांनी त्याचं ऐकलं, म्हणजेच त्याच्या आज्ञा पाळल्या तर ते कायम जगू शकतील.

  • आपण का मरतो?—रोमकर ५:१२.

  • कोणीही मरणार नाही.—१ करिंथकर १५:२६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा