गीत ४३
अविचल, सावध व बलशाली व्हा!
१. अविचल, सावध, बलशाली
आम्ही सैनिक ख्रिस्ताचे,
ना हरू हिंमत कधीही,
पाळू आदेश त्याचे.
आज धीर धरण्याचा समय,
होईल अंती याहाचा विजय!
(कोरस)
अविचल, सावध, बलशाली,
राहण्या झटू सारे!
२. अविचल राहू विश्वासात
भान ठेवू काळाचे.
राहुनी अधीन ख्रिस्ताच्या,
ऐकू सुज्ञ दासाचे.
मान देऊ या वडील जनां,
वादळी होती जे आसरा!
(कोरस)
अविचल, सावध, बलशाली,
राहण्या झटू सारे!
३. अविचल, सावध राहुनी
सारे चालू एकीने.
ढालीवर विश्वासाच्या,
वार झेलू वैऱ्याचे.
जाउनी सांगू सर्व जनां,
दिन यहोवाचा जवळ आता!
(कोरस)
अविचल, सावध, बलशाली,
राहण्या झटू सारे!
(मत्त. २४:१३; इब्री १३:७, १७; १ पेत्र ५:८ देखील पाहा.)