गीत ३०
यहोवाने राज्य आरंभिले
१. गाऊ याहाची स्तुती, पाहा सियोन डोंगरी
स्थापिली आहे त्याने कोनशिला!
ख्रिस्ता विराजवुनी वैभवी राजासनी,
त्या सोपिली याहाने राज्याची धुरा.
(कोरस)
राज्य याहा, तुझे वैभवी,
आणील ते खरी शांती!
देईल आम्हा सदाचे जीवन,
स्थापील ते पुन्हा नीती!
तू खरा, याहा सर्वेशा,
थोर असे तुझी प्रीती!
२. आली निर्णायक घडी, येईल आता लौकरी
हर्मगिदोनाचे भारी तुफान.
सांगू या नम्र जनां, याहाचा घ्या आसरा,
नाही उरणार सैतानाचे नामोनिशाण!
(कोरस)
राज्य याहा, तुझे वैभवी,
आणील ते खरी शांती!
देईल आम्हा सदाचे जीवन,
स्थापील ते पुन्हा नीती!
तू खरा, याहा सर्वेशा,
थोर असे तुझी प्रीती!
३. ख्रिस्त राजा आमुचा, याहाने जो नेमिला,
प्रिय तो आम्हा, अधीन त्या राहू!
याहा आराधू आम्ही, येऊन त्याच्या मंदिरी,
राजासनापुढे नित्य स्तुती करू!
(कोरस)
राज्य याहा, तुझे वैभवी,
आणील ते खरी शांती!
देईल आम्हा सदाचे जीवन,
स्थापील ते पुन्हा नीती!
तू खरा, याहा सर्वेशा,
थोर असे तुझी प्रीती!
(२ शमु. ७:२२; दानी. २:४४; प्रकटी. ७:१५ देखील पाहा.)