वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत २८
  • नवे गीत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नवे गीत
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • नवे गीत
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • सर्वकाळाचं जीवन!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • चिरकालाचे जीवन!
    यहोवाचे स्तवन करू या
  • तू दिलेस अनमोल अर्पण
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत २८

गीत २८

नवे गीत

(स्तोत्र ९८)

१. गीत गाऊ या, यहोवाच्या स्तुतीचे गीत!

थोर पराक्रम त्याचे आहेत शब्दांतीत!

गाऊ जयजयकार, विजयी राज्याचा त्याच्या!

न्यायनीती त्याची कळावी सर्वांना.

(कोरस)

गाऊ या,

यहोवाची स्तुती,

तो राजा,

आमचा गौरवशाली!

२. सारे गाऊ या, मिळून गीत आनंदाचे.

नाव उंचावू या साऱ्‍या जगी त्याचे!

गाती गीत नवे, थवे लोकांचे एकसुरात,

वीणा, डफ, सारंग्या देती सुरेल साथ.

(कोरस)

गाऊ या,

यहोवाची स्तुती,

तो राजा,

आमचा गौरवशाली!

३. गाते ही धरा, नभीच्या ज्योतीही साऱ्‍या,

सागरात उठती लहरी आनंदाच्या.

सारी निर्मिती करिते याहाचे स्तवन,

डोंगर दऱ्‍यांतून निनादो हे भजन!

(कोरस)

गाऊ या,

यहोवाची स्तुती,

तो राजा,

आमचा गौरवशाली!

(स्तो. ९६:१; १४९:१; यश. ४२:१० देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा