गीत २१
जे दयाळू ते धन्य!
१. दयाळू जे, धन्य किती!
याहा ते प्रिय वाटती.
सागर दयेचा तो स्वतः,
अथांग त्याची ममता.
पुत्रास त्याने अर्पुनी,
केली बहाल खंडणी.
नव्हतो दयेस पात्र या,
थोर यहोवाची कृपा!
२. दया मनी ज्यांच्या वसे,
क्षमा पापांची त्यां मिळे,
ख्रिस्ताने मोल देउनी,
ते वाहिले याहचरणी.
लाभो दया ही लीन जनां,
पावोत तेही जीवना!
सर्वां जाउनी सांगू या,
‘पाहा यहोवाची दया!’
३. धनवान होती ते खरे,
देती दयेचे दान जे,
दया ही याह स्मरुनी,
तारील त्यां न्यायदिनी.
जपू दयेचा वारसा
याहा, ख्रिस्ताचा सर्वदा.
दया करुनी नेमाने,
वाढीस लावू धन हे!
(लूक ६:३६; रोम. १२:८; याको. २:१३ देखील पाहा.)