वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • bh पृ. १९९-पृ. २०१ परि. ४
  • येशू ख्रिस्त—भाकीत केलेला मशीहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशू ख्रिस्त—भाकीत केलेला मशीहा
  • बायबल नेमके काय शिकवते?
  • मिळती जुळती माहिती
  • मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्यांवरून हे सिद्ध होतं का की येशूच मसीहा आहे?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • त्यांनी मशीहाची वाट पाहिली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • येशू ख्रिस्त देवाबद्दलच्या ज्ञानाची गुरुकिल्ली
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • त्यांना मशीहा सापडला!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
बायबल नेमके काय शिकवते?
bh पृ. १९९-पृ. २०१ परि. ४

परिशिष्ट

येशू ख्रिस्त—भाकीत केलेला मशीहा

मशीहाला ओळखण्यास आपल्याला मदत करण्याकरता, यहोवा देवाने अनेक बायबल संदेष्ट्यांना या भाकीत केलेल्या तारणकर्त्याच्या जन्माविषयी, सेवेविषयी आणि मृत्यूविषयी सविस्तर माहिती देण्यास पवित्र आत्म्याने प्रेरित केले. बायबलमधील या सर्व भविष्यवाण्या येशू ख्रिस्तात पूर्ण झाल्या. आश्‍चर्य वाटावे इतक्या त्या अचूक व सविस्तर होत्या. जसे की, मशीहाचा जन्म आणि त्याचे बालपण यांजशी संबंधित भाकीत घटनांविषयीच्या काही भविष्यवाणींचा आपण विचार करू या.

यशया संदेष्याने भाकीत केले होते, की मशीहा, राजा दावीदाच्या वंशातून येईल. (यशया ९:७) येशू खरोखरच दावीदाच्या वंशातून आला.—मत्तय १:१, ६-१७.

देवाचा आणखी एक संदेष्टा मीखा याने असे भाकीत केले, की या बालकाचा जन्म “बेथलेहेम एफ्राथा” येथे होईल व पुढे हे मूल एक शासक बनेल. (मीखा ५:२) येशूच्या जन्माच्या वेळी, इस्राएलात बेथलेहेम नावाची दोन शहरे होती. एक शहर इस्राएलच्या उत्तरेकडील भागात नासरेथजवळ होते तर दुसरे शहर यहुदात जेरुसलेमजवळ होते. जेरुसलेमजवळील बेथलेहेमास पूर्वी एफ्राथा म्हटले जात. भविष्यवाणीत म्हटले त्याप्रमाणे अगदी याच शहरात, येशूचा जन्म झाला.—मत्तय २:१.

देवाच्या पुत्राला “मिसरातून बोलाविले” जाईल, असेही एका बायबल भविष्यवाणीत म्हटले होते. बाळ असताना येशूला मिसरात अर्थात ईजिप्तमध्ये नेण्यात आले होते. पण हेरोदाच्या मृत्यूनंतर त्याला मिसरातून बाहेर आणण्यात आले. अशाप्रकारे ही भविष्यवाणी पूर्ण झाली.—होशेय ११:१; मत्तय २:१५.

पृष्ठ २०० वरील तक्‍त्‌यात, “भविष्यवाणी” या मथळ्याखालील शास्त्रवचनांमध्ये मशीहाविषयीची सविस्तर माहिती दिली आहे. कृपया यांची तुलना, “पूर्णता” या मथळ्याखालील शास्त्रवचनांशी करून पाहा. असे केल्याने देवाच्या वचनाच्या सत्यतेवरील तुमचा विश्‍वास आणखी पक्का होईल.

या शास्त्रवचनांचे परीक्षण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. ती म्हणजे, भविष्यसूचक शास्त्रवचने, येशूच्या जन्माच्या शेकडो वर्षांआधी लिहिण्यात आली होती. येशूने म्हटले: “मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्‍यांत माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्‍य आहे.” (लूक २४:४४) तुमच्या बायबलमधून उघडून पाहा—प्रत्येक भविष्यवाणीची बित्तंबातमी पूर्ण झाली!

मशीहाविषयीच्या भविष्यवाण्या

घटना

भविष्यवाणी

पूर्णता

यहुदाच्या वंशात जन्म झाला

उत्पत्ति ४९:१०

लूक ३:२३-३३

कुमारिकेच्या पोटी जन्माला आला

यशया ७:१४

मत्तय १:१८-२५

राजा दावीदाच्या वंशातून आला

यशया ९:७

मत्तय १:१, ६-१७

यहोवाने आपला पुत्र म्हणून घोषित केले

स्तोत्र २:७

मत्तय ३:१७

बहुतेकांनी विश्‍वास ठेवला नाही

यशया ५३:१

योहान १२:३७, ३८

शिंगरावर बसून जेरुसलेमेत प्रवेश केला

जखऱ्‍या ९:९

मत्तय २१:१-९

निकटच्या व्यक्‍तीने विश्‍वासघात केला

स्तोत्र ४१:९

योहान १३:१८, २१-३०

चांदीच्या ३० नाण्यांसाठी विश्‍वासघात केला

जखऱ्‍या ११:१२

मत्तय २६:१४-१६

दोषारोप करणाऱ्‍यांपुढे गप्प राहिला

यशया ५३:७

मत्तय २७:११-१४

चिठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेण्यात आली

स्तोत्र २२:१८

मत्तय २७:३५

वधस्तंभावर असताना लोकांनी त्याचा उपहास केला

स्तोत्र २२:७, ८

मत्तय २७:३९-४३

त्याचे एकही हाड मोडण्यात आले नाही

स्तोत्र ३४:२०

योहान १९:३३, ३६

धनवानांबरोबर पुरण्यात आले

यशया ५३:९

मत्तय २७:५७-६०

कुजण्याआधी उठवण्यात आले

स्तोत्र १६:१०

प्रेषितांची कृत्ये २:२४, २७

देवाच्या उजवीकडे बसवून त्याला उंचावण्यात आले

स्तोत्र ११०:१

प्रेषितांची कृत्ये ७:५६

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा