पाठ १३
तुम्हाला खरा धर्म कसा शोधता येईल?
सर्वच धर्म देवाला संतुष्ट करतात, की केवळ एकच? (१)
ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे इतके धर्म का आहेत? (२)
खऱ्या ख्रिश्चनांना तुम्ही कसे ओळखू शकता? (३-७)
१. येशूने केवळ एका खऱ्या ख्रिस्ती धर्माची सुरवात केली. यास्तव, यहोवा देवाच्या खऱ्या उपासकांचे केवळ एकच मंडळ अथवा गट असला पाहिजे. (योहान ४:२३, २४; इफिसकर ४:४, ५) फार थोडे लोक जीवनाच्या अरुंद मार्गावर असल्याचे बायबल शिकवते.—मत्तय ७:१३, १४.
२. प्रेषितांच्या मृत्यूनंतर, खोट्या शिकवणी व ख्रिस्तेतर प्रथा हळूवारपणे ख्रिस्ती मंडळीमध्ये शिरतील, असे बायबलने भाकीत केले होते. ख्रिस्ताऐवजी, आपले अनुसरण करण्यासाठी अनेक लोक विश्वासू लोकांना आपल्यामागे ओढणार होते. (मत्तय ७:१५, २१-२३; प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०) म्हणूनच तर आज आपण, ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे इतके विविध धर्म पाहतो. खऱ्या ख्रिश्चनांना आपण कसे ओळखू शकतो?
३. खऱ्या ख्रिश्चनांचे सर्वात उल्लेखनीय ओळख चिन्ह म्हणजे, त्यांच्यामध्ये आपसात खरी प्रीती आहे, हे आहे. (योहान १३:३४, ३५) इतर जातीच्या किंवा वर्णाच्या लोकांपेक्षा ते उच्च आहेत असा विचार करण्यास त्यांना शिकवले जात नाही. किंवा दुसऱ्या राष्ट्रांतील लोकांचा द्वेष करण्यासही त्यांना शिकवले जात नाही. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) याचकारणास्तव ते युद्धांमध्ये भाग घेत नाहीत. खरे ख्रिस्ती एकमेकांशी बंधू आणि भगिणी या नात्याने व्यवहार करतात.—१ योहान ४:२०, २१.
४. खऱ्या धर्माचे आणखी एक ओळख चिन्ह म्हणजे, त्याचे सदस्य बायबलचा गाढ आदर करतात. बायबल देवाचे वचन आहे असे स्वीकारतात आणि ते जे काही सांगते त्यावर विश्वास ठेवतात. (योहान १७:१७; २ तीमथ्य ३:१६, १७) मानवी कल्पना किंवा रूढींपेक्षा देवाचे वचन महत्त्वपूर्ण असल्याचे ते लेखतात. (मत्तय १५:१-३, ७-९) त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये बायबलनुसार जगण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणूनच, ते एका गोष्टीचा प्रचार करून दुसरेच काही आचरत नाहीत.—तीत १:१५, १६.
५. खऱ्या धर्माने देवाच्या नावाचा आदर देखील केला पाहिजे. (मत्तय ६:९) येशूने देवाचे नाव यहोवा आहे, असे इतरांना कळविले. खऱ्या ख्रिश्चनांनी देखील असेच केले पाहिजे. (योहान १७:६, २६; रोमकर १०:१३, १४) इतरांना देवाचे नाव सांगणारे कोणते लोक तुमच्या समाजात आहेत?
६. खऱ्या ख्रिश्चनांनी देवाच्या राज्याचा प्रचार केला पाहिजे. येशूने तसे केले. तो नेहमी राज्याबद्दल बोलत असे. (लूक ८:१) सर्व पृथ्वीवर याच संदेशाचा प्रचार करण्याची आज्ञा त्याने आपल्या शिष्यांनी दिली. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) केवळ देवाचे राज्य, या पृथ्वीवर खरी शांती आणि सुरक्षितता आणील, असा खऱ्या ख्रिश्चनांचा विश्वास आहे.—स्तोत्र १४६:३-५.
७. येशूच्या शिष्यांनी या दुष्ट जगाचे भाग होता कामा नये. (योहान १७:१६) ते जगाच्या राजकीय बाबींमध्ये व सामाजिक झगड्यांमध्ये भाग घेत नाहीत. ते, जगामध्ये सर्वसामान्य असलेले हानीकारक वर्तन, प्रथा आणि मनोवृत्ती यांना टाळतात. (याकोब १:२७; ४:४) तुमच्या समाजात, खऱ्या ख्रिस्ती धर्माची ही चिन्हे असलेल्या धार्मिक गटाला तुम्ही ओळखू शकता का?
[२६, २७ पानांवरील चित्रं]
खरे ख्रिस्ती एकमेकांवर प्रीती करतात, बायबलचा आदर करतात व देवाच्या राज्याचा प्रचार करतात