वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • fy अध्या. ११ पृ. १२८-१४१
  • तुमच्या घरात शांती राखा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या घरात शांती राखा
  • कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तुमच्या पतीचा वेगळा विश्‍वास असल्यास
  • पत्नीचा विश्‍वास वेगळा असतो तेव्हा
  • मुलांना प्रशिक्षण देणे
  • तुमचा धर्म, तुमच्या पालकांचा नसल्यास
  • सावत्र पालक असण्याचे आव्हान
  • भौतिक ध्येये तुमच्या घराला विभक्‍त करतात का?
  • तुमचं कुटुंब सुखी होऊ शकतं!
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • कौटुंबिक जीवन यशस्वी करणे
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • टिकाऊ विवाहाकरता दोन गुरुकिल्ल्या
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • देवाला संतुष्ट करणारे कौटुंबिक जीवन
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
अधिक माहिती पाहा
कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
fy अध्या. ११ पृ. १२८-१४१

अध्याय ११

तुमच्या घरात शांती राखा

१. कुटुंबांत विभाजन आणणाऱ्‍या कोणत्या काही गोष्टी आहेत?

प्रेम, समजुतदारपणा आणि शांती असलेल्या कुटुंबांतील सदस्य किती आनंदी असतात. असे तुमचेही कुटुंब असेल अशी आशा वाटते. हे दुःखाचे आहे की, पुष्कळ कुटुंबे या वर्णनात बसत नाहीत आणि ते एखाद-दुसऱ्‍या कारणामुळे विभक्‍त झालेले आहेत. कोणती गोष्ट घरांना विभक्‍त करते? या अध्यायात आपण तीन गोष्टींची चर्चा करणार आहोत. काही कुटुंबांमध्ये सर्व सदस्य एकाच धर्माचे नसतात. इतर कुटुंबांत मुलांचे सख्खे आईवडील नसतील. तर इतर कुटुंबांमध्ये उदरनिर्वाह करण्याची धडपड किंवा अधिक भौतिक वस्तू मिळवण्याची इच्छा या गोष्टी कौटुंबिक सदस्यांना विभक्‍त करत आहे. तरीही, ज्या परिस्थिती एका घराला विभक्‍त करतात त्या कदाचित दुसऱ्‍या घरावर परिणाम करत नसतील. हा फरक कशामुळे घडतो?

२. काही लोक कौटुंबिक जीवनाच्या मार्गदर्शनासाठी कोठे पाहतात परंतु अशा मार्गदर्शनाचा उत्तम स्रोत काय आहे?

२ दृष्टिकोन हा एक घटक आहे. तुम्ही दुसऱ्‍या व्यक्‍तीचा दृष्टिकोन प्रामाणिकपणे समजण्याचा प्रयत्न केल्यास, ऐक्य असलेल्या घराची जोपासना कशी करावी हे जाणण्याची तुम्हाला अधिक शक्यता असते. दुसरा घटक, तुमच्या मार्गदर्शनाचा स्रोत हा आहे. अनेक लोक सहकर्मी, शेजारी, वृत्तपत्र स्तंभलेखक अथवा इतर मानवी मार्गदर्शकांतील सल्ल्याचे अनुसरण करतात. तथापि, काहींना, देवाचे वचन त्यांच्या परिस्थितीविषयी काय म्हणते हे समजले आहे आणि शिकलेल्या गोष्टीचे अनुकरण त्यांनी केले आहे. असे केल्याने घरात शांती राखण्यासाठी कुटुंबाला कशी मदत मिळू शकते?—२ तीमथ्य ३:१६, १७.

तुमच्या पतीचा वेगळा विश्‍वास असल्यास

१३० पानांवरील चित्र

इतर व्यक्‍तीचा दृष्टिकोन समजण्याचा प्रयत्न करा

३. (अ) वेगळा विश्‍वास असणाऱ्‍यासोबत विवाह करण्याविषयी बायबलचा सल्ला कोणता आहे? (ब) एक विवाह सोबती सत्य मानणारा असला व दुसरा नसला तरीही कोणते काही मूलभूत तत्त्वे लागू होतात?

३ बायबल आपल्याला, वेगळा धर्म असलेल्या कोणासोबत विवाह करण्याविरुद्ध जोरदार सल्ला देते. (अनुवाद ७:३, ४; १ करिंथकर ७:३९) तथापि, कदाचित तुम्ही तुमच्या विवाहानंतर बायबलमधील सत्य शिकला असाल पण तुमचा पती सत्य शिकला नसेल. मग काय? अर्थातच, विवाह शपथा येथेही महत्त्वाच्या आहेत. (१ करिंथकर ७:१०) बायबल, विवाहातील स्थायीपणाच्या बंधनावर जोर देते आणि ते विवाहित लोकांनी मतभेदांपासून पळ काढण्याऐवजी मिटवण्याचे उत्तेजन त्यांना देते. (इफिसकर ५:२८-३१; तीत २:४, ५) समजा, तुमचा पती बायबलचा धर्म अनुसरण्यावर कडक आक्षेप घेत असल्यास काय? मंडळीच्या सभांना जाऊ नये म्हणून तो तुम्हाला अडथळा आणू शकेल किंवा पत्नीने धर्माविषयी बोलण्यासाठी घरोघरी जाऊ नये असे तो म्हणू शकेल. तेव्हा तुम्ही काय कराल?

४. पतीचा विश्‍वास पत्नीसारखा नसल्यास ती आपल्या पतीबद्दल कशा प्रकारे समभावना दाखवू शकते?

४ स्वतःला विचारा, ‘माझ्या पतीला असे का वाटते?’ (नीतिसूत्रे १६:२०, २३) तुम्ही काय करत आहात याबद्दल त्याला खरोखर समजले नसल्यास, त्याला तुमच्याबद्दल काळजी वाटेल. अथवा नातेवाईकांना महत्त्वाच्या वाटत असलेल्या विशिष्ट रूढीपरंपरांमध्ये आता तुम्ही भाग घेत नसल्यामुळे पतीवर त्यांचा दबाव येत असेल. एका पतीने म्हटले, “घरात एकटाच असल्यामुळे मला त्यागले गेल्याचे वाटले.” धर्मामुळे आपल्या पत्नीला गमावत असल्याचे या मनुष्याला वाटले. तरीही, गर्व असल्यामुळे त्याने एकाकीपणा जाणवत असल्याचे कबूल केले नाही. यहोवावरील तुमच्या प्रीतीचा अर्थ, तुम्ही पूर्वी तुमच्या पतीवर जसे प्रेम करत होता त्यापेक्षा आता कमी प्रेम करत आहात असा होत नसल्याची हमी त्याला देण्याची गरज असेल. त्याच्यासोबत वेळ घालवण्याची खातरी करा.

५. एखाद्या पत्नीने, वेगळा विश्‍वास असलेल्या पतीसोबत कोणते संतुलन राखले पाहिजे?

५ तथापि, या परिस्थितीबरोबर तुम्ही सुज्ञतापूर्वक व्यवहार करणार असल्यास यापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण गोष्टीचा विचार केला पाहिजे. देवाचे वचन पत्नींना असे आर्जवते: “जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपआपल्या पतीच्या अधीन असा.” (कलस्सैकर ३:१८) अशा प्रकारे, ते स्वतंत्रतेच्या आत्म्याविरुद्ध इशारा देते. शिवाय, “जसे प्रभूमध्ये उचित आहे” असे म्हणण्याद्वारे, एखाद्याच्या पतीला अधीन असण्यामध्ये प्रभुला अधीन असण्याला विचारात घेतले पाहिजे, असे ते शास्रवचन दर्शवते. यामध्ये संतुलन असावयास हवे.

६. ख्रिस्ती पत्नीने कोणती तत्त्वे लक्षात ठेवली पाहिजेत?

६ एखाद्या ख्रिश्‍चनाकरता मंडळीच्या सभांना उपस्थित राहणे आणि बायबलवर आधारित असलेल्या स्वतःच्या विश्‍वासाबद्दल इतरांना साक्ष देणे हे खऱ्‍या भक्‍तीचे महत्त्वपूर्ण पैलू आहेत ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. (रोमकर १०:९, १०, १४; इब्री लोकांस १०:२४, २५) परंतु, देवाच्या विशिष्ट अपेक्षेप्रमाणे न करण्याची आज्ञा मानवाने तुम्हाला थेटपणे दिल्यास, तुम्ही काय कराल? येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी म्हटले: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” (प्रेषितांची कृत्ये ५:२९) त्यांचे उदाहरण, एक आदर्श या नात्याने जीवनातील अनेक परिस्थितींना लागू होते. यहोवाबद्दलची प्रीती, न्याय्यपणे त्याचीच भक्‍ती करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करील काय? त्याचवेळी, पतीबद्दलचे तुमचे प्रेम आणि आदर, यहोवाची एकनिष्ठ भक्‍ती पतीला स्वीकारयोग्य असलेल्या रीतीने करण्याचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त करील का?—मत्तय ४:१०; १ योहान ५:३.

७. ख्रिस्ती पत्नीचा काय निश्‍चय असावा?

७ असे करणे नेहमीच शक्य नसेल असे येशूने निदर्शले. त्याने इशारा दिला की, खऱ्‍या भक्‍तीस केलेल्या विरोधामुळे, कुटुंबांमधील सत्य मानणाऱ्‍या सदस्यांना अलिप्त केल्यासारखे वाटेल, जणू काय त्यांच्या व कुटुंबातील बाकीच्यांमध्ये तरवार आली आहे. (मत्तय १०:३४-३६) जपानमधील एका स्त्रीने हे अनुभवले. तिच्या पतीने ११ वर्षे तिला विरोध केला. त्याने अतिशय कठोरपणे तिला वागणूक दिली आणि अनेकदा तिला घरातच घेतले नाही. पण ती चिकाटी धरून राहिली. ख्रिस्ती मंडळीतील मित्रमंडळीने तिला मदत केली. तिने अविरत प्रार्थना केली आणि १ पेत्र २:२० मधून अधिक उत्तेजन मिळवले. या ख्रिस्ती स्त्रीला, ती दृढ राहिल्यास तिचा पती देखील तिच्यासोबत यहोवाची सेवा करील याची खातरी झाली होती. त्याने तसेच केले.

८, ९. एखाद्या पत्नीने तिच्या पतीसमोर अनावश्‍यक अडथळे आणण्याचे टाळण्यासाठी कसे कार्य केले पाहिजे?

८ तुमच्या सोबत्याच्या मनोवृत्तीवर प्रभाव पाडण्यासाठी, पुष्कळ व्यावहारिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ, तुमचा पती तुमच्या धर्मावर आक्षेप घेत असल्यास, इतर क्षेत्रांमध्ये तक्रार करण्यास त्याला सबळ कारणे देऊ नका. घर स्वच्छ ठेवा. तुमच्या वैयक्‍तिक स्वरूपाची काळजी घ्या. प्रेमाची आणि कृतज्ञतेची वक्‍तव्ये दाखवण्यामध्ये उदार असा. टीका करण्याऐवजी सहकार्य करणारे असा. मस्तकपदाकरता तुम्ही त्याच्यावर अवलंबून असता हे दाखवा. तुमच्यावर अन्याय झाला आहे असे तुम्हाला वाटल्यास जशास तसे वागू नका. (१ पेत्र २:२१, २३) मानवी अपरिपूर्णतेकडे दुर्लक्ष करा आणि मतभेद उद्‌भवत असल्यास, नम्रपणे प्रथम तुम्ही क्षमा मागा.—इफिसकर ४:२६.

९ सभेतील तुमच्या उपस्थितीला, त्याचे भोजन उशिरा होण्याचे कारण बनवू नका. काही वेळा तुमचा पती घरी नसतो तेव्हा ख्रिस्ती सेवेत भाग घेण्याचा विचार कदाचित तुम्ही कराल. पती ऐकत नसल्यास ख्रिस्ती पत्नीने तिच्या पतीला प्रचार करण्याचे आवरणे सुज्ञतेचे आहे. उलटपक्षी, ती प्रेषित पेत्राचा सल्ला अनुसरते: “तसेच, स्त्रियांनो, तुम्हीहि आपआपल्या पतीच्या अधीन असा; ह्‍यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.” (१ पेत्र ३:१, २) ख्रिस्ती पत्नी देवाच्या आत्म्याची फळे अधिक पूर्णपणे प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतात.—गलतीकर ५:२२, २३.

पत्नीचा विश्‍वास वेगळा असतो तेव्हा

१०. एखाद्या सत्य मानणाऱ्‍या पतीने, वेगळा विश्‍वास असलेल्या त्याच्या पत्नीसोबत कसे वागले पाहिजे?

१० पती ख्रिस्ती विश्‍वासाचे आचरण करत असल्यास आणि पत्नी करत नसल्यास काय? अशा परिस्थितींबद्दल बायबल मार्गदर्शन देते. ते म्हणते: “जर कोणाएका बंधुची पत्नी ख्रिस्तीतर असली, आणि ती त्याच्याजवळ नांदावयास राजी असली, तर त्याने तिला सोडू नये.” (१ करिंथकर ७:१२) ते पतींना देखील सल्ला देते: “आपआपल्या पत्नींवर प्रीति करा.”—कलस्सैकर ३:१९.

११. पत्नी सत्य न मानणारी असल्यास एखादा पती समजबुद्धी दाखवून चातुर्याने मस्तकपद कसे चालवू शकतो?

११ तुमच्या पत्नीचा विश्‍वास तुमच्या विश्‍वासापेक्षा वेगळा असल्यास, तिला आदर देण्याबद्दल आणि तिच्या भावनांचा विचार करण्याबद्दल विशेष काळजी घ्या. ती प्रौढ असल्यामुळे धार्मिक विश्‍वासाचे आचरण करण्याबद्दल तुमची असहमती असली तरी तिला काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळणे योग्य आहे. तुम्ही तुमच्या विश्‍वासाबद्दल तिच्याशी पहिल्यांदा बोलता तेव्हा या नवीन विश्‍वासाचा स्वीकार करण्यासाठी तिने तिचे जुने विश्‍वास मनातून काढून टाकावेत अशी तिच्याकडून अपेक्षा करू नका. तिने आणि तिच्या कुटुंबाने दीर्घ काळापासून मूल्यवान समजलेल्या धार्मिक प्रथा खोट्या आहेत असे अविचाराने बोलण्यापेक्षा, शास्त्रवचनांतून तिच्यासोबत तर्क करण्याचा धीराने प्रयत्न करा. तुम्ही मंडळीतील कार्यहालचालींमध्ये अधिक वेळ घालवत असल्यास तिच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे तिला वाटेल. तुम्ही यहोवाची सेवा करण्याचा जो प्रयत्न करीत आहात त्यास ती कदाचित विरोध करील, तरीही, त्यातील महत्त्वपूर्ण विचार, “मला तुमचा अधिक वेळ हवा आहे,” इतकाच असेल! सहनशील असा. तुमच्या प्रेमळ विचारपूर्वकतेमुळे, कालांतराने खरी उपासना स्वीकारण्यास तिला मदत केली जाऊ शकेल.—कलस्सैकर ३:१२-१४; १ पेत्र ३:८, ९.

मुलांना प्रशिक्षण देणे

१२. जरी एखाद्या पतीचा व त्याच्या पत्नीचा वेगळा विश्‍वास असला, तरी मुलांना प्रशिक्षण देण्यात शास्रवचनीय तत्त्वांना कसे लागू केले पाहिजे?

१२ उपासनेत ऐक्य नसलेल्या घरात मुलांचे धार्मिक शिक्षण याचा काही वेळा वादविषय बनतो. शास्त्रवचनीय तत्त्वांना कसे लागू केले पाहिजे? बायबल, मुलांना शिक्षण देण्याची प्रमुख जबाबदारी पित्याला देत असले तरी मातेला देखील महत्त्वपूर्ण भूमिका पूर्ण करावयाची आहे. (नीतिसूत्रे १:८; पडताळा उत्पत्ति १८:१९; अनुवाद ११:१८, १९.) तो ख्रिस्ताच्या मस्तकपदाचा स्वीकार करत नसला, तरी देखील पिताच कुटुंब प्रमुख असतो.

१३, १४. पती, मुलांना ख्रिस्ती सभांना घेऊन जाण्यास अथवा त्यांच्यासोबत अभ्यास करण्याची पत्नीला मनाई करत असल्यास ती काय करू शकते?

१३ माता, मुलांना धार्मिक विषयांचे शिक्षण देते तेव्हा सत्य न मानणारे काही पिता यावर आक्षेप घेत नाहीत. इतर जण घेतात. पती, मुलांना मंडळीच्या सभांना घेऊन जाण्याची अनुमती देत नसल्यास अथवा घरात त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करण्यास मनाई करत असल्यास काय? आता तुम्हाला अनेक कर्तव्यांत—यहोवा देवाप्रती, तुमच्या पतीच्या मस्तक पदाप्रती आणि तुमच्या प्रिय मुलांप्रतीच्या कर्तव्यात संतुलन राखले पाहिजे. तुम्ही यांचा समेट कसा घडवून आणू शकता?

१४ निश्‍चितच, तुम्ही याबद्दल प्रार्थना कराल. (फिलिप्पैकर ४:६, ७; १ योहान ५:१४) शेवटी, कोणते कार्य करावे याचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. तुम्ही पतीच्या मस्तकपदाला आव्हान देत नाही याचे व्यवहारचार्तुयाने आधीच स्पष्टीकरण त्याला दिल्यास, कालांतराने त्याचा विरोध कमी होऊ शकेल. जरी तुमचा पती मुलांना सभांना घेऊन जाण्याची अथवा त्यांच्यासोबत औपचारिक बायबल अभ्यास करण्याची मनाई करत असला, तरी तुम्ही मुलांना शिकवू शकता. तुमचे दैनंदिन संभाषण आणि चांगल्या उदाहरणाद्वारे त्यांच्यामध्ये यहोवाबद्दलची प्रीती, त्याच्या वचनावर विश्‍वास, पालकांबद्दल आदर—ज्यामध्ये पित्याबद्दलचा आदर समाविष्ट होतो—तसेच इतर लोकांबद्दल प्रेमळ काळजी आणि प्रामाणिक कार्य करण्याच्या सवयींबद्दलचे महत्त्व त्यांच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करा. कालांतराने, पित्याला चांगले परिणाम दिसतील आणि तुमच्या प्रयत्नांच्या मोलाची कदर तो बाळगू लागेल.—नीतिसूत्रे २३:२४.

१५. मुलांच्या शिक्षणाबद्दल सत्य मानणाऱ्‍या एखाद्या पित्याची जबाबदारी काय आहे?

१५ तुम्ही सत्य मानणारे पती असल्यास पण तुमची पत्नी नसल्यास, मुलांचे संगोपन “प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात” करण्यासाठी तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे. (इफिसकर ६:४) असे करत असताना, अर्थातच, तुमच्या पत्नीसोबत व्यवहार करताना तुम्ही दयाळू, प्रेमळ आणि समजूतदार असले पाहिजे.

तुमचा धर्म, तुमच्या पालकांचा नसल्यास

१६, १७. मुलांनी पालकांपेक्षा वेगळा विश्‍वास स्वीकारला असल्यास त्यांनी बायबलची कोणती तत्त्वे लक्षात ठेवली पाहिजेत?

१६ लहान मुलांनी त्यांच्या पालकांपासून वेगळे धार्मिक दृष्टिकोन स्वीकारणे आता असामान्य राहिले नाही. तुम्ही असे केले आहे का? असे असल्यास बायबलमध्ये तुमच्यासाठी एक सल्ला दिला आहे.

१७ देवाचे वचन म्हणते: “मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे: ‘आपला बाप व आपली आई ह्‍यांचा मान राख.’” (इफिसकर ६:१, २) यामध्ये पालकांबद्दल हितकर आदर बाळगणे समाविष्ट आहे. तथापि, पालकांच्या आज्ञेत राहणे महत्त्वपूर्ण असले तरी, ते खऱ्‍या देवाची कदर न बाळगता केले जाऊ नये. मूल, निर्णय घेण्याइतपत मोठे होते तेव्हा ते आपल्या कार्यांबद्दल अधिक प्रमाणात जबाबदार असते. हे केवळ लौकिक नियमांच्या बाबतीतच नव्हे, तर विशेषपणे ईश्‍वरी नियमांच्या बाबतीतही खरे आहे. बायबल सांगते की, “आपणांतील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी [देवाला] हिशेब देईल.”—रोमकर १४:१२.

१८, १९. मुलांचा धर्म पालकांच्या धर्मापासून वेगळा असल्यास पालकांना तो चांगल्या प्रकारे समजावून देण्यात ते कशी मदत करू शकतात?

१८ तुम्हाला विश्‍वासामुळे तुमच्या जीवनात बदल करावे लागत असल्यास पालकांचा दृष्टिकोन समजण्याचा प्रयत्न करा. बायबल शिकवणी शिकत व त्यांचे अनुकरण करत असल्यामुळे, तुमच्याकडून ज्याची अपेक्षा ते करतात त्यात तुम्ही अधिक आदरणीय, अधिक आज्ञाधारक, अधिक परिश्रमी झाल्यामुळे ते कदाचित खूष होतील. तथापि, ते ज्या विश्‍वासांचा आणि प्रथांचा वैयक्‍तिकपणे आनंद घेत आहेत त्यांचा तुमच्या नवीन विश्‍वासामुळे त्यागही करावा लागत असल्यास ते तुम्हाला जो वारसा देऊ पाहतात त्याला तुम्ही तिरस्काराने झिडकारत आहात असे त्यांना वाटेल. तुम्ही जे करत आहात ते समाजात लोकप्रिय नसल्यामुळे अथवा त्यांच्या मते उद्योग-धंद्यापासून तुमचे लक्ष विचलित होत असल्यामुळे तुम्हाला भौतिकरित्या उन्‍नती करण्यास मदत करणाऱ्‍या तुमच्या हिताबद्दलही त्यांना काळजी वाटेल. गर्व देखील एक अडखळण होऊ शकतो. वस्तुतः, त्यांचे चुकत आहे व तुमचे बरोबर आहे असे तुम्ही म्हणत असल्याचे कदाचित त्यांना वाटेल.

१९ या कारणास्तव, तुमच्या पालकांची होता होईल तितक्या लवकर भेट घेण्यासाठी स्थानिक मंडळीतील काही वडिलांची अथवा प्रौढ साक्षीदारांची योजना करा. तुमच्या पालकांना, राज्य सभागृहाला भेट देऊन तेथे काय चर्चा केली जाते हे स्वतः ऐकण्याचे आणि यहोवाचे साक्षीदार कशा प्रकारचे लोक आहेत हे प्रत्यक्ष पाहण्याचे उत्तेजन द्या. कालांतराने, तुमच्या पालकांची मनोवृत्ती कदाचित सौम्य होईल. पालक निग्रहीपणे विरोध करत असले, बायबल साहित्य नष्ट करत असले आणि मुलांना ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याची मनाई करीत असले तरी सामान्यपणे, इतर ठिकाणी वाचन करण्याच्या, सहख्रिश्‍चनांसोबत बोलण्याच्या आणि इतरांना अनौपचारिकपणे साक्ष देण्याच्या तसेच मदत करण्याच्या संधी उपलब्ध असतात. तुम्ही यहोवाला प्रार्थना देखील करू शकता. काही युवकांना घराबाहेर राहून अधिक कार्य करण्यासाठी आधी मोठे होईपर्यंत थांबावे लागते. तथापि, घरात कोणतीही परिस्थिती असली तरी “आपला बाप व आपली आई ह्‍यांचा मान,” राखण्याचे विसरू नका. घरात शांतीला हातभार लावण्यासाठी स्वतःची भूमिका पूर्ण करा. (रोमकर १२:१७, १८) सर्वात अधिक म्हणजे देवाबरोबर शांती राखा.

सावत्र पालक असण्याचे आव्हान

२०. पिता अथवा माता सावत्र असल्यास मुलांच्या भावना कोणत्या असतील?

२० अनेक घरांमध्ये प्रस्तुत होत असलेले मोठे आव्हान, धार्मिक मतभेद नसून सावत्र कुटुंब हे आहे. पुष्कळ घराण्यांत एका अथवा दोन्ही पालकांना त्यांच्या आधीच्या वैवाहिक सोबत्यांकडून झालेली मुले असतात. अशा कुटुंबात मुलांना कदाचित, ईर्ष्या आणि चीड किंवा निष्ठांच्या संघर्षाचा अनुभव येईल. परिणामस्वरूप, सावत्र पालकांनी, एक चांगला पिता वा माता होण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना ही मुले नाकारू शकतील. सावत्र कुटुंबाला यशस्वी बनविण्यासाठी काय मदत करू शकते?

१३८ पानांवरील चित्र

सख्खे किंवा सावत्र पालक असोत, मार्गदर्शनाकरता बायबलवर अवलंबून राहा

२१. सावत्र पालकांची खास परिस्थिती असतानाही, मदतीसाठी त्यांनी बायबलमधील तत्त्वांचा शोध का केला पाहिजे?

२१ खास परिस्थिती असतानाही, इतर घराण्यांमध्ये यश आणणारी बायबल तत्त्वे येथेही लागू होतात याची जाणीव ठेवा. या तत्त्वांकडे दुर्लक्ष केल्यास समस्या तात्पुरती सुटल्याचे वाटेल पण नंतर मात्र त्यामुळे अतिशय दुःखी होण्याची शक्यता असेल. (स्तोत्र १२७:१; नीतिसूत्रे २९:१५) बुद्धी आणि समजबुद्धी विकसित करा—दीर्घकालीन लाभ लक्षात ठेवून ईश्‍वरी तत्त्वे लागू करण्यासाठी बुद्धी आणि कौटुंबिक सदस्य काही गोष्टी का बोलतात वा करतात हे जाणण्यासाठी समजबुद्धी विकसित करा. समभावनेची देखील गरज आहे.—नीतिसूत्रे १६:२१; २४:३; १ पेत्र ३:८.

२२. सावत्र पालकाचा स्वीकार करणे मुलांना कठीण का वाटू शकेल?

२२ तुम्ही सावत्र पालक असल्यास, त्या कुटुंबाचे एक मित्र या नात्याने मुलांनी तुमचे स्वागत केले होते याची आठवण कदाचित तुम्हाला होईल. परंतु, जेव्हा तुम्ही त्यांचे सावत्र पालक झालात तेव्हा त्यांच्या मनोवृत्तीत बदल झाला असेल. मुलांना सध्या त्यांच्यासोबत राहत नसलेल्या सख्ख्या पालकाची आठवण झाल्यावर, ती निष्ठेच्या संघर्षाबरोबर कदाचित झगडतील, त्यांच्या पालकांबद्दल त्यांना जी आपुलकी वाटते ती तुम्हाला हिरावून घेण्याची आहे असे त्यांना वाटण्याची शक्यता असेल. काही वेळा, तुम्ही त्यांचा पिता अथवा त्यांची माता नसल्याची आठवण ते तुम्हाला उघडपणे करून देतील. अशा वक्‍तव्यांमुळे मन दुखावले जाते. तरीही, ‘मन उतावळे होऊ देऊन रागावू नका.’ (उपदेशक ७:९) मुलांच्या भावनांशी व्यवहार करताना समजबुद्धी आणि समभावना यांची गरज असते.

२३. सावत्र मुले असलेल्या कुटुंबात कशी शिस्त लावली पाहिजे?

२३ एखादी व्यक्‍ती शिस्त लावत असताना हे गुण अधिक महत्त्वपूर्ण असतात. सुसंगत शिस्त आवश्‍यक आहे. (नीतिसूत्रे ६:२०; १३:१) तसेच, सर्व मुले सारखीच नसल्यामुळे शिस्तीमध्ये फरक असू शकतो. सुरवातीला पालकत्वाच्या पैलूला सख्ख्या पालकाने हाताळावे हे उचित असल्याचे काही सावत्र पालकांना दिसून येते. असे असले, तरी सावत्र मुलांपेक्षा सख्ख्या मुलांना प्रिय न मानून शिस्त लावण्यात आणि शिस्तीला दुजोरा देण्यात दोन्ही पालकांची सहमती आवश्‍यक आहे. (नीतिसूत्रे २४:२३) आज्ञाधारकपणा महत्त्वपूर्ण आहे पण अपरिपूर्णता विचारात घेतली पाहिजे. प्रतिहल्ला करू नका. प्रेमाने शिस्त लावा.—कलस्सैकर ३:२१.

२४. सावत्र कुटुंबात विरुद्ध लिंगी सदस्यांमधील नैतिक समस्या टाळण्यासाठी काय मदत करू शकते?

२४ कौटुंबिक चर्चा, त्रास कमी होण्याकरता बरेच काही करू शकतात. त्या जीवनातील अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींना केंद्रस्थानी ठेवण्यास कुटुंबाला मदत करू शकतात. (पडताळा फिलिप्पैकर १:९-११.) त्या कौटुंबिक ध्येयांना प्राप्त करण्याप्रत कशी मदत करू शकतात हे दाखवण्यासाठी देखील प्रत्येकाला साह्‍य करू शकतात. याशिवाय, मोकळेपणाने केलेल्या कौटुंबिक चर्चा नैतिक समस्यांना टाळू शकतात. सावत्र पिता आणि सावत्र भाऊ सभोवती असताना मुलींनी कसा पेहराव करावा आणि योग्यप्रकारे कसे वागावे हे जाणण्याची गरज आहे आणि मुलांना त्यांची सावत्र आई आणि सावत्र बहिणींबरोबर योग्य वर्तन ठेवण्याविषयीच्या सल्ल्याची गरज आहे.—१ थेस्सलनीकाकर ४:३-८.

२५. सावत्र कुटुंबात शांती राखण्यासाठी कोणते गुण मदत करू शकतात?

२५ सावत्र पालक होण्यातील खास आव्हानाला तोंड देताना सहनशील असा. नवे संबंध विकसित करण्यासाठी वेळ लागतो. रक्‍ताचे नाते नसलेल्या मुलांकडील प्रेम आणि आदर मिळवणे एक कठीण काम असू शकते. परंतु हे शक्य आहे. सुज्ञ आणि समजदारीच्या अंतःकरणासोबत यहोवाला खूष करण्याची गाढ इच्छा, सावत्र कुटुंबातील शांतीची गुरूकिल्ली आहे. (नीतिसूत्रे १६:२०) असे गुण इतर परिस्थितींचा सामना करण्यासाठी तुमची मदत देखील करू शकतात.

भौतिक ध्येये तुमच्या घराला विभक्‍त करतात का?

२६. कुटुंबाला भौतिक गोष्टींबद्दलच्या समस्या आणि मनोवृत्ती कोणत्या मार्गांनी वेगळे करू शकतात?

२६ कुटुंबांना भौतिक गोष्टींबद्दलच्या समस्या आणि मनोवृत्ती अनेक मार्गांनी विभाजित करू शकतात. काही कुटुंबांची पैशावरील वादविवादामुळे आणि श्रीमंत—अथवा थोडेफार श्रीमंत बनण्याच्या इच्छेमुळे फाटाफूट होते हे दुःखाचे आहे. दोन्ही सोबती लौकिक नोकरी करतात तेव्हा “तुझे पैसे, माझे पैसे” ही मनोवृत्ती विकसित केल्यामुळे विभाजन होऊ शकते. वादविवाद टाळले जात असले तरी, दोन्ही सोबती नोकरी करतात तेव्हा त्यांना एकदुसऱ्‍याकरता फारच थोडा वेळ उरत असल्याचे दिसून येते. जगातील एक वाढती रीत म्हणजे घरी राहून जे पैसे कमावत होते त्यापेक्षा अधिक पैसे कमावता येण्यासाठी अनेक पिता दीर्घ कालावधीपर्यंत—महिने अथवा वर्षांपर्यंत कुटुंबांपासून दूर राहतात ही आहे. यामुळे अनेक गंभीर समस्या उद्‌भवू शकतात.

२७. आर्थिक तणावाखाली असलेल्या कुटुंबाला कोणती काही तत्त्वे मदत करू शकतात?

२७ विविध कुटुंबांना विविध दबाव आणि गरजांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे या परिस्थितींना हाताळण्यासाठी कोणतेही नियम बनवले जाऊ शकत नाहीत. तरीही, बायबल सल्ल्याची मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, नीतिसूत्रे १३:१० सुचवते, की ‘मसलत घेतल्यावर’ अनावश्‍यक प्रयत्न काही वेळा टाळले जाऊ शकतात. यामध्ये केवळ एखाद्याचे विचार मांडणेच नव्हे तर सल्ला घेणे आणि एखाद्या गोष्टीकडे दुसरी प्रौढ व्यक्‍ती कशी पाहते ते जाणून घेणे समाविष्ट असते. शिवाय, वाजवी अंदाजपत्रक बनविल्याने कुटुंबाच्या प्रयत्नांत ऐक्य घडवून आणण्यास मदत होऊ शकते. काही वेळा, विशेषपणे, मुले किंवा त्यांच्यावर अवलंबून राहणारे इतर जण असतात तेव्हा अधिक खर्च भागवण्यासाठी दोन्ही सोबत्यांना—कदाचित तात्पुरत्या कालावधीपर्यंत बाहेर नोकरी करण्याची आवश्‍यकता असते. अशी परिस्थिती असते तेव्हा पत्नीसाठी त्याच्याजवळ अजूनही वेळ असल्याची हमी पती देऊ शकतो. पत्नीला सामान्यपणे एकटीला करावे लागत असलेल्या कामात पती तसेच मुले प्रेमळपणे मदत करू शकतात.—फिलिप्पैकर २:१-४.

२८. कोणत्या स्मरणिकांचे पालन केल्यास कुटुंबाला ऐक्याने कार्य करण्यास मदत होईल?

२८ तथापि, या व्यवस्थीकरणात पैशाची आवश्‍यकता असली, तरी त्यामुळे सौख्यानंद मिळत नाही, हे लक्षात ठेवा. पैशामुळे निश्‍चितच जीवन मिळत नाही. (उपदेशक ७:१२) वस्तुतः, भौतिक गोष्टींना फाजील महत्त्व दिल्याने आध्यात्मिक आणि नैतिक नुकसान होऊ शकते. (१ तीमथ्य ६:९-१२) जीवनावश्‍यक गरजा प्राप्त करण्यासाठी आपल्या प्रयत्नांवरील त्याच्या आशीर्वादाच्या हमीसह प्रथम देवाचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवणे किती उत्तम आहे! (मत्तय ६:२५-३३; इब्री लोकांस १३:५) आध्यात्मिक हित प्रथम ठेवल्याने आणि सर्वप्रथम देवाबरोबर शांती मिळवण्याचा प्रयत्न केल्याने, जरी तुमचे घर कदाचित विशिष्ट परिस्थितींमुळे विभाजित झाले असले, तरी अधिक महत्त्वपूर्ण मार्गांनी खरेपणाने ऐक्य घडून आलेले एक कुटुंब होईल असे तुम्हाला दिसून येईल.

ही बायबल तत्त्वे . . . घरात शांती टिकवण्यासाठी कौटुंबिक सदस्यांची मदत कशी करू शकतात?

ख्रिश्‍चन समजबुद्धी विकसित करतात.—नीतिसूत्रे १६:२१; २४:३.

जोडप्याने विवाहात प्रेम आणि आदर दाखवणे, ते एकाच धर्माचे असण्यावर अवलंबून नाही.—इफिसकर ५:२३, २५.

एखादा ख्रिस्ती जाणूनबुजून देवाचा नियम कधीही तोडणार नाही.—प्रेषितांची कृत्ये ५:२९.

ख्रिश्‍चन समेट घडवून आणणारे आहेत.—रोमकर १२:१८. लगेच रागावू नका.—उपदेशक ७:९.

कायदेशीर विवाह माननीयता आणि शांती आणतात

आपल्या दिवसात अनेक पुरुष आणि स्त्रिया, कोणत्याही कायदेशीर बंधनाशिवाय पती-पत्नी या नात्याने एकत्र राहतात. याच परिस्थितीबरोबर नवीन विश्‍वासूला कदाचित तोंड द्यावे लागेल. काही बाबतीत, अशा एकोप्याला समाज किंवा वंशीय रुढीपरंपरा कदाचित मान्यता देतील, परंतु हे कायदेशीर नाही. तथापि, बायबलचा दर्जा विवाहाच्या उचित नोंदणीची अपेक्षा करतो. (तीत ३:१; इब्री लोकांस १३:४) बायबल, ख्रिस्ती मंडळीतील लोकांस विवाह बंधनात केवळ एक पती आणि एक पत्नी असावेत अशी अट देखील घालते. (१ करिंथकर ७:२; १ तीमथ्य ३:२, १२) या दर्जांनुरूप असणे, हे तुमच्या घरात शांती आणण्यातील हे पहिले पाऊल होय. (स्तोत्र ११९:१६५) यहोवाच्या अपेक्षा अवाजवी किंवा कठीण नाहीत. तो आपल्याला जे काही शिकवतो ते आपल्या लाभाची योजना केलेले असते.—यशया ४८:१७, १८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा