अध्याय ६
तुमच्या किशोरवयीनाला जोमाने वाढण्यास मदत करा
१, २. किशोरावस्था कोणती आव्हाने आणि आनंद आणू शकते?
घरात किशोरवयीन असणे, हे पाच वर्षे किंवा दहा वर्षे वयाचे मूल असण्यापेक्षा बरेच वेगळे असते. किशोरावस्थेमुळे आव्हाने आणि समस्या येतात परंतु त्यामुळे आनंद व प्रतिफळे देखील मिळू शकतात. योसेफ, दावीद, योशीया आणि तीमथ्य यांची उदाहरणे दाखवून देतात, की तरुण लोक जबाबदारीने कार्य करू शकतात आणि यहोवासोबत त्यांचा एक उत्तम नातेसंबंध असू शकतो. (उत्पत्ति ३७:२-११; १ शमुवेल १६:११-१३; २ राजे २२:३-७; प्रेषितांची कृत्ये १६:१, २) आज अनेक किशोरवयीन तेच शाबीत करतात. नक्कीच, त्यापैकी काही तुम्हाला माहीत आहेत.
२ तरीसुद्धा, किशोरावस्था काहींकरता प्रक्षुब्ध करणारी असते. तरुणांना भावनात्मक चढउतार अनुभवावा लागतो. किशोवयीन मुला-मुलींना अधिक स्वातंत्र्य हवे असेल आणि पालकांनी लावलेल्या मर्यादा त्यांना आवडत नसतील. तरीही, असे युवक अजूनही अननुभवी असतात आणि त्यांना आपल्या पालकांकडील प्रेमळ सहनशील मदतीची गरज असते. होय, किशोरावस्था आनंददायक असू शकते पण ती पालक आणि किशोरवयीनांना—दोघांनाही गोंधळून टाकणारी देखील असू शकते. या वर्षांदरम्यान युवकांना मदत कशी केली जाऊ शकते?
३. पालक त्यांच्या प्रौढ संततीला जीवनातील उत्तम संधी कशा रीतीने देऊ शकतात?
३ बायबल सल्ला अनुकरणात आणणारे पालक, त्यांच्या तरुण संततीला त्या परीक्षांमधून जबाबदार प्रौढ होण्याकरता त्यांचा मार्ग यशस्वी करण्यासाठी शक्य असेल तितके उत्तम करतात. सर्व देशांत आणि सर्व काळांदरम्यान, बायबल तत्त्वांचा अवलंब करणाऱ्या पालकांना आणि किशोरवयीनांना आशीर्वाद मिळाले आहेत.—स्तोत्र ११९:१.
प्रामाणिक आणि खुले दळणवळण
तुमच्या किशोरवयीनाला तुमच्यासोबत बोलावेसे वाटते तेव्हा उपलब्ध असा
४. मसलत, विशेषपणे किशोरावस्थेत का महत्त्वपूर्ण आहे?
४ बायबल सांगते: “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात.” (नीतिसूत्रे १५:२२) जर मुले तरुण असताना मसलतीची आवश्यकता होती तर किशोरावस्थेत—जेव्हा युवक घरात कमी आणि शालेय मित्रांसोबत किंवा इतर सोबत्यांबरोबर अधिक वेळ घालवतात—तेव्हा विशेषपणे आवश्यक आहे. मसलत नसल्यास अथवा पालक आणि मुलांमध्ये प्रामाणिक आणि खुले दळणवळण नसल्यास घरामध्ये किशोरवयीन अनोळखी बनू शकतात. यास्तव, दळणवळणाचा मार्ग कसा खुला ठेवता येऊ शकतो?
५. किशोरवयीनांना त्यांच्या पालकांसोबत दळणवळण राखण्याच्या बाबीकडे पाहण्याचे उत्तेजन कसे दिले जाते?
५ यामध्ये किशोरवयीन आणि पालक या दोघानींही आपापली भूमिका बजावली पाहिजे. तरुणांना त्यांच्या पालकांसोबत बोलणे ते लहान असताना बोलत होते त्यापेक्षा अधिक जड जात असेल हे खरे आहे. तरीसुद्धा, “जेथे शहाणपणाची मसलत नसते तेथे लोक पडतात, पण मसलत देणारे पुष्कळ असल्याने संरक्षण होते,” हे लक्षात ठेवा. (नीतिसूत्रे ११:१४, पंडिता रमाबाई भाषांतर) हे शब्द, तरुण आणि वयस्कर सर्वांना सारखेच लागू होतात. हे जाणणाऱ्या किशोरवयीनांना अजूनही शहाणपणाच्या मसलतीची गरज आहे हे समजेल कारण ते आता पूर्वीपेक्षा अधिक किचकट वादविषयांना तोंड देत आहेत. सत्य मानणाऱ्या त्यांच्या पालकांना जीवनाचा अधिक अनुभव आहे आणि अनेक वर्षे त्यांनी त्यांची प्रेमळ काळजी व्यक्त केल्यामुळे ते मसलत देणारे या नात्याने अधिक निपुण आहेत हे त्यांनी ओळखले पाहिजे. या कारणास्तव, त्यांच्या जीवनातील या स्थितीत सुज्ञ किशोरवयीन त्यांच्या पालकांपासून दूर जाणार नाहीत.
६. सुज्ञ आणि प्रेमळ पालकांची किशोरवयीनांसोबत दळणवळण करण्याविषयी कोणती मनोवृत्ती असेल?
६ खुले दळणवळण याचा अर्थ, पालक किशोरवयीनास बोलणे आवश्यक वाटते तेव्हा, उपलब्ध असण्यासाठी अधिक प्रयत्न करतील असा होतो. तुम्ही पालक असल्यास, निदान तुमच्या बाजूने दळणवळण खुले असल्याची खात्री करा. हे सोपे नसेल. बायबल म्हणते की, “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” (उपदेशक ३:७) तुमच्या किशोरवयीनाला एखादा समय बोलण्याचा असल्याचे वाटतो तेव्हा तुमच्याकरता तो कदाचित मौन धरण्याचा समय असू शकेल. कदाचित तो समय तुम्ही वैयक्तिक अभ्यास, विश्रांती किंवा घरासभोवती कार्य करण्यासाठी असेल. तरीसुद्धा, तुमच्या तरुणाला तुम्हासोबत बोलायचे असल्यास, तुमच्या योजनांमध्ये तडजोड करा आणि त्याचे ऐका. नाहीतर तो पुन्हा तुम्हाला विचारणार नाही. येशूच्या उदाहरणाचा विचार करा. एके प्रसंगी, आराम करण्याचे त्याने ठरवले होते. परंतु, लोकसमुदाय त्याचे ऐकण्यासाठी त्याच्यासभोवती आल्यावर आराम न करता तो त्यांना शिकवू लागला. (मार्क ६:३०-३४) अनेक किशोरवयीनांना त्यांच्या पालकांच्या व्यग्र जीवनाचा परिचय आहे, पण आवश्यकता असते तेव्हा त्यांचे पालक उपलब्ध असतील याची हमी त्यांना हवी असते. या कारणास्तव, उपलब्ध आणि समजदार असा.
७. पालकांनी काय टाळण्याची आवश्यकता आहे?
७ तुम्ही किशोरवयीन होता तेव्हा तुम्हाला कसे वाटत होते हे आठवण्याचा प्रयत्न करा आणि तुमची विनोदबुद्धी गमावू नका! मुलांसोबत असण्यामध्ये पालकांना आनंद वाटावयास हवा. पालक आपला रिकामा वेळ कसा घालवतात? ते रिकाम्या वेळेचा उपयोग कुटुंबाला समाविष्ट न करता नेहमीच काहीतरी काम करण्यासाठी करत असले तर हे त्यांच्या किशोरवयीनांच्या लगेच प्रत्ययास येईल. पालकांपेक्षा तरुणांचे शालेय मित्र त्यांचा अधिक विचार करतात अशा निष्कर्षास ते पोहंचल्यास नक्कीच समस्या उद्भवतील.
कशाचे दळणवळण करावे
८. मुलांवर प्रामाणिकपणा, परिश्रम आणि उचित वर्तन यांबद्दलची कदर कशी बिंबवली जाऊ शकते?
८ पालकांनी प्रामाणिकपणा आणि परिश्रम याबद्दल गुणग्राहकता बाळगण्याचे त्यांच्या मुलांच्या मनावर आधीच बिंबवले नसल्यास, किशोरावस्थेच्या दरम्यान त्यांनी तसे केलेच पाहिजे. (१ थेस्सलनीकाकर ४:११; २ थेस्सलनीकाकर ३:१०) त्यांची मुले नैतिक आणि शुद्ध जीवन जगण्याच्या महत्त्वावर पूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवतात याची खातरी त्यांनी करणे देखील आवश्यक आहे. (नीतिसूत्रे २०:११) पालक उदाहरणाद्वारे या क्षेत्रात अधिक दळणवळण करू शकतो. ज्याप्रमाणे सत्य न मानणारे पती “वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले,” जाऊ शकतात तशाच प्रकारे किशोरवयीन त्यांच्या पालकांच्या वर्तनापासून योग्य तत्त्वे शिकू शकतात. (१ पेत्र ३:१.) तरीही, केवळ उदाहरणच पुरेसे नसते कारण मुलांना अनेक वाईट अनुभवांची आणि बाहेरील मोहीत करणाऱ्या प्रचाराची झळ लागत असते. यास्तव, काळजी घेणाऱ्या पालकांनी, किशोरवयीन जे पाहतात आणि ऐकतात याबद्दल त्यांचा दृष्टिकोन जाणण्याची इच्छा बाळगणे जरूरीचे आहे आणि असे करण्यासाठी अर्थपूर्ण संभाषणाची गरज आहे.—नीतिसूत्रे २०:५.
९, १०. पालकांनी त्यांच्या मुलांना लैंगिक विषयाबद्दल माहिती देण्याची खातरी का केली पाहिजे आणि हे ते कसे करू शकतात?
९ हे लैंगिक बाबींचा विषय येतो त्या प्रसंगी विशेषपणे लागू होते. पालकांनो, लैंगिकतेची चर्चा तुमच्या मुलासोबत करण्यास तुम्हाला लाज वाटते का? तुम्हाला लाज वाटत असली तरी चर्चा करण्याचा प्रयत्न करा कारण तुमच्या तरुण जनांना हा विषय इतरांकडून नक्कीच समजेल. जर त्यांना याची माहिती तुमच्याकडून मिळाली नाही तर कोण जाणे त्यांना किती विपर्यस्त माहिती मिळेल? बायबलमध्ये लैंगिक गोष्टींच्या बाबींची चर्चा करण्यास यहोवा लाजत नाही आणि पालकांनीही लाजता कामा नये.—नीतिसूत्रे ४:१-४; ५:१-२१.
१० बायबलमध्ये लैंगिक वर्तनाच्या बाबतीत स्पष्ट मार्गदर्शन आहे आणि हे मार्गदर्शन आधुनिक जगाला अजूनही लागू होत आहे ते दाखवण्यासाठी वॉचटावर सोसायटीने याबद्दल बरीच सहायक माहिती प्रकाशित केली आहे. या मदतीचा आपण उपयोग का करू नये? उदाहरणार्थ, तरुण लोक विचारत असलेले प्रश्न—उपयोगी ठरणारी उत्तरे (इंग्रजी) या पुस्तकातील “लैंगिकता आणि नीतिमूल्ये” या भागाची उजळणी तुमचा मुलगा अथवा तुमच्या मुलीबरोबर का करू नये? याच्या परिणामांमुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल.
११. यहोवाची सेवा कशी करावी हे पालकांनी मुलांना शिकवण्यासाठी सर्वात प्रभावकारी मार्ग कोणता आहे?
११ पालक आणि मुलांनी चर्चा करावी, असा सर्वात महत्त्वपूर्ण विषय कोणता आहे? प्रेषित पौलाने लिहिताना याचा उल्लेख असा केला: “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात [तुमच्या मुलांना] वाढवा.” (इफिसकर ६:४) मुलांनी यहोवाबद्दल शिकत राहण्याची गरज आहे. विशेषपणे, त्याच्यावर प्रीती कशी करावी हे शिकण्याची गरज आहे आणि त्याची सेवा करण्याची त्यांना इच्छा असली पाहिजे. येथे देखील उदाहरणाद्वारे बरेच काही शिकवता येऊ शकते. तरुण जन, त्यांच्या पालकांना देवावर “पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने” प्रीती करत असल्याचे आणि ही गोष्ट त्यांच्या पालकांच्या जीवनात चांगले फळ उत्पन्न करत असल्याचे ते पाहत असल्यास, तसेच करण्याचा परिणाम त्यांच्यावर होऊ शकेल. (मत्तय २२:३७) त्याचप्रमाणे, तरुण लोक त्यांच्या पालकांचा भौतिक गोष्टींच्या बाबतीत संतुलित दृष्टिकोन असल्याचे, देवाच्या राज्याला प्रथम स्थान देत असल्याचे पाहत असल्यास त्यांनाही अशीच मनोवृत्ती विकसित करण्यास मदत होईल.—उपदेशक ७:१२; मत्तय ६:३१-३३.
नियमित बायबल अभ्यास कुटुंबाकरता आवश्यक आहे
१२, १३. कौटुंबिक अभ्यास यशस्वी होण्यासाठी कोणते मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत?
१२ तरुणांसोबत आध्यात्मिक मूल्याचे दळणवळण ठेवताना साप्ताहिक बायबल अभ्यास एक उल्लेखनीय साह्य आहे. (स्तोत्र ११९:३३, ३४; नीतिसूत्रे ४:२०-२३) असा अभ्यास नियमित असणे आवश्यक आहे. (स्तोत्र १:१-३) कौटुंबिक अभ्यासाला इतर गोष्टींपेक्षा प्राधान्य दिले पाहिजे, याच्या उलट घडू नये हे पालक आणि मुलांनी जाणले पाहिजे. याशिवाय, कौटुंबिक अभ्यास प्रभावकारी असण्यासाठी योग्य मनोवृत्ती आवश्यक आहे. एका पित्याने म्हटले: “याचे रहस्य म्हणजे, संचालकाने कौटुंबिक अभ्यासाबद्दल मनमोकळेपणाचे परंतु आदरणीय—अनौपचारिक पण क्षुल्लक न समजण्याजोगे वातावरण ठेवण्यास उत्तेजन देणे होय. योग्य संतुलन राखणे नेहमीच सोपे नसेल आणि तरुणांना त्यांच्या प्रवृत्तीत अनेकदा बदल करण्याची गरज असेल. जर काही गोष्टी एका अथवा दुसऱ्या प्रसंगी योग्यप्रकारे होत नसल्यास प्रयत्न चालूच ठेवा आणि आगाऊ प्रसंगाची अपेक्षा बाळगा.” याच पित्याने म्हटले की, तो प्रत्येक अभ्यासाआधी सर्वांचा योग्य दृष्टिकोन असावा म्हणून प्रार्थनेत यहोवाकडील मदतीची स्पष्टपणे विनंती करीत असे.—स्तोत्र ११९:६६.
१३ कौटुंबिक अभ्यास चालवणे ही सत्य मानणाऱ्या पालकांची जबाबदारी आहे. काही पालक, स्वाभाविकपणेच शिक्षक नसतील त्यामुळे कौटुंबिक अभ्यास मनोरंजक बनविण्याचे मार्ग शोधणे त्यांना कठीण वाटेल हे खरे. तथापि, तुम्ही तुमच्या किशोरवयीनांवर “कृतीने व सत्याने” प्रीती केल्यास, त्यांची आध्यात्मिकरित्या वाढ होण्यासाठी लीन आणि प्रामाणिक रीतीने त्यांना मदत करण्याची तुमची इच्छा असेल. (१ योहान ३:१८) वेळोवेळी ते तक्रार करतील पण त्यांच्या कल्याणाबद्दल तुमची गाढ आवड त्यांना कळून येईल.
१४. किशोरवयीनांसोबत आध्यात्मिक गोष्टींचे दळणवळण करताना अनुवाद ११:१८, १९ चा अवलंब कसा केला जाऊ शकतो?
१४ आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या बाबींचे दळणवळण करण्यासाठी केवळ कौटुंबिक अभ्यास हाच एक प्रसंग नाही. यहोवाने पालकांना दिलेली आज्ञा तुम्हाला आठवते का? त्याने म्हटले: “तुम्ही माझी ही वचने आपल्या ध्यानीमनी साठवून ठेवा, ती चिन्हांदाखल आपल्या हातास बांधा आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा. तुम्ही आपल्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्याविषयी बोलत जा.” (अनुवाद ११:१८, १९; तसेच अनुवाद ६:६, ७ देखील पाहा.) याचा अर्थ पालकांनी सतत त्यांच्या मुलांना भाषण देत राहावे असा होत नाही. परंतु, प्रेमळ कुटुंब प्रमुखाने त्याच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक दृष्टिकोनाची उभारणी करण्याच्या संधींविषयी नेहमीच दक्ष राहिले पाहिजे.
शिस्त आणि आदर
१५, १६. (अ) शिस्त म्हणजे काय? (ब) शिस्त लावण्यासाठी कोण जबाबदार आहे आणि शिस्त अनुसरली जाईल याची खातरी करण्याची जबाबदारी कोणाची आहे?
१५ शिस्त सुधारणा करणारे एक प्रशिक्षण आहे आणि त्यामध्ये दळणवळणाचा समावेश होतो. शिक्षा आवश्यक असली तरी—शिस्त याचा अर्थ शिक्षा देण्यापेक्षा सुधारणा असा अधिकपणे होतो. तुमची मुले लहान असताना त्यांना शिस्तीची गरज होती आणि आता ते किशोरवयीन असले तरीही त्यांना काही अंशी शिस्त लावण्याची कदाचित अधिक गरज असेल. सुज्ञ किशोरवयीनांना हे सत्य असल्याचे माहीत आहे.
१६ बायबल म्हणते: “मूर्ख आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ मानितो; वाग्दंड लक्षात ठेवितो तो शहाणा होतो.” (नीतिसूत्रे १५:५) या शास्रवचनापासून आपण पुष्कळ काही शिकतो. शिस्त लावली जाईल यास हे सूचित करते. किशोरवयीनाला वाग्दंड न दिल्यास ‘तो त्यास लक्षात ठेवू’ शकत नाही. यहोवा, शिस्त लावण्याची जबाबदारी पालकांना, विशेषपणे पित्याला देतो. तथापि, ती शिस्त ऐकणे ही किशोरवयीनाची जबाबदारी आहे. त्याने आपल्या आईवडिलांच्या सुज्ञ शिस्तीकडे लक्ष दिल्यास त्याला अधिक शिकता येईल आणि तो कमी चुका करील. (नीतिसूत्रे १:८) बायबल म्हणते: “बोधाचा अव्हेर करणाऱ्याला दारिद्र्य व लज्जा ही प्राप्त होतात, परंतु वाग्दंड ऐकणारा सन्मान पावतो.”—नीतिसूत्रे १३:१८.
१७. शिस्त लावणे हे उद्दिष्ट बाळगून पालकांनी कोणते संतुलन राखण्याची गरज आहे?
१७ किशोरवयीनांना शिस्त लावताना पालकांनी संतुलन राखण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या संततीला चीड आणणारे कदाचित त्यांच्या मुलांचा आत्मविश्वास नष्ट करील असे कडक वागणे टाळले पाहिजे. (कलस्सैकर ३:२१) तरीही, पालकांनी इतकी मोकळीक देणारेही असू नये की ज्यामुळे तरुण लोक आवश्यक प्रशिक्षणापासून वंचित राहतील. अशी मोकळीक हानीकारक असू शकेल. नीतिसूत्रे २९:१७ म्हणते: “आपल्या मुलास शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जिवाला हर्ष देईल.” तथापि २१ वे वचन म्हणते: “कोणी आपल्या चाकरास बाळपणापासून लाडाने वाढविले, तर तो शेवटी मुलगाच [कृतघ्न, तळटीप] होऊन बसेल.” हे वचन चाकराविषयी बोलत असले तरी, घरातील कोणत्याही तरुणाला देखील ते तितकेच लागू होते.
१८. शिस्त कशाचा एक पुरावा आहे आणि पालकांनी न बदलणारी शिस्त लावताना काय टाळले जाते?
१८ सत्यामध्ये योग्य शिस्त, मुलावरील पालकांच्या प्रेमाचा पुरावा असतो. (इब्री लोकांस १२:६, ११) तुम्ही पालक असल्यास, न बदलणारी, योग्य शिस्त लावणे कठीण असल्याचे तुम्हाला माहीत आहे. शांती असावी म्हणून हटवादी किशोरवयीनाला जे काही करण्याची इच्छा आहे ते करू देण्याची अनुमती देणे सोपे असल्याचे वाटेल. तथापि शेवटी, हा दुसरा मार्ग अनुसरणाऱ्या पालकाला अनियंत्रित घराचा परिणाम भोगावा लागेल.—नीतिसूत्रे २९:१५; गलतीकर ६:९.
काम आणि खेळ
१९, २०. पालक मनोरंजनाच्या बाबतीत त्यांच्या किशोरवयीनांसोबत सुज्ञतेने कसे वागू शकतात?
१९ प्राचीन काळात, मुलांनी घरात आणि शेतात काम करावे असे सामान्यपणे अपेक्षिले जात होते. आज अनेक किशोरवयीनांकडे देखरेख न ठेवलेला बराच रिकामा वेळ असतो. रिकामा वेळ भरून काढण्यासाठी, वाणिज्य जग भरमसाट साधने पुरवते. यामध्ये आणखी भर घालावयाची म्हणजे, हे जग नैतिकतेबद्दलच्या बायबल दर्जांना अतिशय कमी लेखते परंतु, संभाव्य विपत्तीवर तुमच्याजवळ एक सूत्र आहे.
२० या कारणास्तव, समंजस पालक मनोरंजनाबद्दल अंतिम निर्णय घेण्याचा हक्क राखतात. तथापि, किशोरवयीन मोठा होत आहे हे विसरू नका. दर वर्षी त्याला किंवा तिला प्रौढासारखी वागणूक दिली जावी अशी आशा कदाचित ते करतील. या कारणास्तव, पालकांनी किशोरवयीन मोठे होतात तसे त्यांना मनोरंजनाबद्दल निवड करण्याची—जोपर्यंत त्या निवडी आध्यात्मिक प्रौढत्वाची प्रगती प्रदर्शित करतात तोपर्यंत अधिक मोकळीक देणे सुज्ञतेचे आहे. काही वेळा किशोरवयीन, संगीत, सोबती इत्यादीबद्दल निर्बुद्ध निवड करील. हे घडते तेव्हा, किशोरवयीनाबरोबर त्याची चर्चा केली पाहिजे जेणेकडून भविष्यात तो चांगल्या निवडी करील.
२१. मनोरंजनात घालवलेल्या वेळेतील वाजवीपणा किशोरवयीनाचे संरक्षण कसे करील?
२१ मनोरंजनासाठी किती वेळ दिला जाण्यास हवा? काही देशांमध्ये किशोरवयीनांना निरंतर करमणुकीचा अधिकार देण्यात आला आहे असा विश्वास बाळगण्यास त्यांना प्रवृत्त करण्यात येत आहे. या कारणास्तव, एखादा युवक त्याचा आराखडा असा योजिल, की एकानंतर एक “मौज” त्याला करावयास मिळेल. वेळ हा इतर गोष्टीत जसे की कौटुंबिक, वैयक्तिक अभ्यास, आध्यात्मिकरित्या प्रौढ असणाऱ्या बांधवांसोबतचा सहवास, ख्रिस्ती सभा आणि घरकामात देखील दिला पाहिजे हा धडा शिकवणे पालकांवर अवलंबून असते. यामुळे “विषयसुखाला” देवाच्या वचनास दाबून टाकण्यापासून दूर ठेवले जाईल.—लूक ८:११-१५.
२२. किशोरवयीनाच्या जीवनात मनोरंजनाचे संतुलन कशासोबत असले पाहिजे?
२२ शलमोन राजाने म्हटले: “मनुष्यांनी आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्यांस काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीहि देवाची देणगी आहे.” (उपदेशक ३:१२, १३) होय, आनंद करणे हा संतुलित जीवनाचा भाग आहे. तसेच परिश्रम देखील संतुलित जीवनाचा भाग आहे. आज अनेक किशोरवयीनांना परिश्रम करण्यापासून मिळणारे समाधान अथवा समस्या हाताळण्यापासून आणि ती सोडवण्यापासून मिळणारी स्वाभिमानाची भावना कळत नाही. काहींना त्यांच्या नंतरच्या जीवनात स्वतःचे पालनपोषण करण्यासाठी एखादे कौशल्य अथवा उद्योग विकसित करण्याची संधी दिली जात नाही. पालकांसाठी येथे एक खरे आव्हान आहे. तुमच्या तरुणांना अशा संधी आहेत याची खातरी तुम्ही कराल का? तुम्ही परिश्रमाला मोलाचे समजण्यास आणि त्याचा आनंद घेण्याचे तुमच्या किशोरवयीनाला शिकवण्यात यशस्वी झाल्यास तो किंवा ती हितकर दृष्टिकोन विकसित करील ज्यामुळे आयुष्यभराचे लाभ मिळतील.
किशोरवयीन ते प्रौढ
तुमच्या मुलांसाठी प्रीती आणि गुणग्राहकता व्यक्त करा
२३. पालक त्यांच्या किशोरवयीनांना उत्तेजन कसे देऊ शकतात?
२३ तुमच्या किशोरवयीनाच्या बाबतीत समस्या येतात तेव्हा “प्रीति कधी अंतर देत नाही,” हे शास्रवचन तेव्हा देखील खरे ठरते. (१ करिंथकर १३:८) निःसंशये वाटणारी प्रीती दाखवण्याचे कधीही थांबवू नका. स्वतःला विचारा, ‘प्रत्येक मुलाला समस्या हाताळण्यात किंवा अडखळणांवर मात करण्यात यश मिळाल्यावर मी त्याची प्रशंसा करतो का? संधी निघून जाण्याआधी, माझी प्रीती आणि गुणग्राहकता व्यक्त करण्यासाठी मी संधींचा उपयोग करतो का?’ काही वेळा गैरसमजुती झाल्या तरी, किशोरवयीनांना त्यांच्यावरील तुमच्या प्रेमाची खातरी झाल्यास, ते त्याच रीतीने प्रेम करण्याची शक्यता अधिक असते.
२४. मुलांचे संगोपन करण्यात सामान्य नियम म्हणून कोणते शास्रवचनीय तत्त्व खरे ठरते परंतु काय लक्षात ठेवले पाहिजे?
२४ अर्थातच, मुले प्रौढ होतात तसे, शेवटी ते स्वतःसाठी अधिक मोठे निर्णय घेतील. काही बाबींमध्ये पालकांना ते निर्णय आवडणार नाहीत. त्यांच्या मुलाने यहोवाची सेवा न करण्याचा निर्णय घेतल्यास मग काय? हे घडू शकते. यहोवाच्या काही आत्मिक पुत्रांनी देखील त्याचा सल्ला नाकारला आणि स्वतःला बंडखोर असल्याचे शाबीत केले. (उत्पत्ति ६:२; यहूदा ६) आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करण्यासाठी ज्यांमध्ये कार्यक्रम आखला जाऊ शकतो त्या संगणकाप्रमाणे मुले नाहीत. ते स्वतंत्र इच्छा असलेले प्राणी आहेत, ते घेत असलेल्या निर्णयांबद्दल यहोवासमोर जबाबदार आहेत. तरीही नीतिसूत्रे २२:६ एक सामान्य नियम म्हणून खरे ठरते: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.”
२५. पालकत्वाच्या विशेषाधिकाराबद्दल यहोवाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालकांकडे कोणता उत्तम मार्ग आहे?
२५ यास्तव, तुमच्या मुलांवर खूप प्रीती करा. त्यांचे पालनपोषण करण्यासाठी बायबलच्या तत्त्वांचा अवलंब करण्यासाठी तुमच्या वतीने सर्वोत्तम प्रयत्न करा. ईश्वरी वर्तणुकीचे एक उत्तम उदाहरण मांडा. अशा प्रकारे, तुमच्या मुलांना मोठे होऊन जबाबदार, देवभिरू प्रौढ व्यक्ती होण्याची उत्तम संधी तुम्ही द्याल. पालकत्वाच्या विशेषाधिकाराबद्दल यहोवाला कृतज्ञता दाखवण्याचा हा पालकांकरता सर्वोत्तम मार्ग आहे.