वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • dg भाग १ पृ. २-३
  • देव खरोखरी आपली काळजी करतो का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव खरोखरी आपली काळजी करतो का?
  • देव खरोखरी आपली काळजी करतो का?
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • देव दुःख काढून का टाकत नाही?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • दु:खातून मुक्‍त अशी पृथ्वी
    देव खरोखरी आपली काळजी करतो का?
  • दुःख नसेल तेव्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
देव खरोखरी आपली काळजी करतो का?
dg भाग १ पृ. २-३

भाग १

देव खरोखरी आपली काळजी करतो का?

१, २. देवाविषयी लोक कोणता प्रश्‍न विचारतात, व का?

तुमच्या जीवनामध्ये कधी तरी, तुम्ही असे विचारले असावे: ‘आमची काळजी वाहणारा देव आहे तर, त्याने दु:खाला परवानगी का दिली?’ आम्ही सर्वांनी दु:खाचा अनुभव घेतला आहे किंवा ज्यांना दु:ख आहे अशा काहींना ओळखत असू.

२ वस्तुत:, सबंध इतिहासात लोकांनी युद्धे, निष्ठुरता, हिंसा, अप्रामाणिकता, गरिबी, आजार व प्रिय जनांच्या मृत्युने दु:ख आणि हृदययातना सहन केल्या आहेत. आमच्या २०व्या शतकातच, युद्धांनी दहा कोटी लोकांना ठार मारले आहे. इतर करोडो जखमी झाले किंवा त्यांची घरे व मालमत्ता ही गमावली गेली. आमच्या काळात पुष्कळ अशा भयंकर घटना घडल्या, ज्याचा परिणाम अति शोक, अश्रुधारा, आणि अगणित लोकांच्या समोर आशाहीनता यात दिसला आहे.

३, ४. देवाने दु:खाला दिलेल्या परवानगीबद्दल अनेकांना कसे वाटते?

३ काही लोक दु:खी व रागीट होतात आणि त्यांना वाटते की देव आहे, तर तो आपली काळजी खरोखरच घेत नाही. किंवा त्यांना वाटते की देवच नाही. उदाहरणार्थ, एक माणूस, ज्याने पहिल्या महायुद्धात वंशीय छळामुळे त्याच्या मित्रांचा आणि कुटुंबाचा मृत्यू सहन केला, त्याने विचारले: “आम्हाला देवाची गरज होती तेव्हा तो कोठे होता?” आणखीन एक व्यक्‍ति, नाझींनी दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी केलेल्या लाखोंच्या कत्तलीतून वाचला, त्याने पाहिलेल्या त्रासामुळे अत्यंत दु:खीत झाला, तो म्हणाला: “तुम्ही माझे हृदय चाटले तर विषबाधा होईल.”

४ यास्तव एक चांगला देव दुष्ट गोष्टींना का घडू देतो हे पुष्कळांना समजत नाही. उलटपक्षी, ते असा प्रश्‍न विचारतात की तो अस्तित्त्वात आहे का किंवा त्याला खरोखरच आपली काळजी आहे का. बहुतेकांना असेही वाटते की दु:ख हे मानवी अस्तित्त्वाचाच एक भाग नेहमी असेल.

[२, ३ पानांवरील चित्र]

दुःखापासून मुक्‍त असे नवे जग जवळ आहे का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा