मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा?
“मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?” असा प्रश्न इयोब या गृहस्थाने बऱ्याच काळाआधी विचारला. (इयोब १४:१४) कदाचित, तुम्हाला सुद्धा याविषयीचे नवल वाटत राहिले असावे. तुम्हाला असे कळाले की याच पृथ्वीवर सर्वोत्तम अशा वातावरणात तुमच्या प्रियजनांचे तुम्हासोबत पुनर्मिलन होणे शक्य आहे तर तुम्हाला कसे वाटेल?
वस्तुतः पवित्र शास्त्र हे अभिवचन देते: “तुझे मृत जिवंत होतील. . . . [ते] उठतील.” शिवाय पवित्र शास्त्र असेही म्हणते: “नीतीमान पृथ्वीचे वतन पावतील. तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—यशया २६:१९; स्तोत्रसंहिता ३७:२९.
अशा या अभिवचनांवर खरा आत्मविश्वास ठेवायचा आहे तर त्यासाठी या मुलभूत प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत: लोक का मरतात? मृत कोठे आहेत? आणि ते पुनः जिवंत होऊ शकतील याची खात्री आम्हाला कशी होईल?
मृत्यु, आणि आम्ही मरतो तेव्हा काय घडते
मानवाने मरू नये असे देवाने आरंभलाच इच्छिले होते अशी स्पष्टता पवित्र शास्त्र करते. त्याने आदाम व हव्वा या पहिल्या मानवी जोडप्याची निर्मिती करून त्यांना एदेन या पृथ्वीवरील नंदनवनात ठेवले होते. त्यांनी मुले प्रसवावी व आपल्या नंदनवन घराचा विस्तार पृथ्वीच्या पाठीवर न्यावा अशीही सूचना त्यांना मिळाली होती. देवाच्या सूचनांचा भंग केला तरच त्याना मरण येणार होते.—उत्पत्ती १:२८; २:१५–१७.
देवाच्या दयाळुपणाविषयी रसिकता न राखल्यामुळे आदाम व हव्वेने त्याच्या सूचनेचा भंग केला त्यामुळे त्यांना विदित करण्यात आलेली शिक्षा मिळाली. “तू . . . मातीला जाऊन मिळशील,” असे देवाने आदामाला म्हटले. तो पुढे म्हणाला: “कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ती ३:१९) आदामाच्या निर्मितीआधी तो कोठेहि अस्तित्वात नव्हता, तो निव्वळ माती होता. त्यामुळेच त्याने केलेल्या आज्ञाभंगामुळे वा पापामुळे त्याला परत मातीत जाऊन मिळण्याची म्हणजे अस्तित्वविरहीत होण्याची शिक्षा मिळाली.
याप्रकारे मृत्यु हा जीवनाची अनुपस्थिति दर्शवितो. पवित्र शास्त्र हा फरक असा स्पष्ट करते: “पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान . . . सार्वकालिक जीवन आहे.” (रोमकर ६:२३) मरणाची स्थिति ही संपूर्णपणे बेशुद्धावस्थेची असते हे दाखविताना पवित्र शास्त्र म्हणते: “आपणास मरावयाचे आहे जिवंताला निदान कळत असते, पण मृतास तर काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) माणूस मरतो त्याविषयी पवित्र शास्त्राचे विवेचन असे आहे की, “त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याचे सर्व विचार नष्ट होतात.”—स्तोत्रसंहिता १४६:३, ४.
एदेनामध्ये केवळ आदाम व हव्वेने त्या आज्ञेचा भंग केला होता तर मग आम्ही सर्व का मरतो? याचे कारण हे की आम्हा सर्वांचा जन्म आदामाच्या आज्ञाभंगानंतर झाला व त्यामुळेच आम्हा सर्वांना त्याच्याकडून पाप व मरण या गोष्टी वारशाने लाभल्या. पवित्र शास्त्रही तेच म्हणते: “एका माणसाच्या [आदामाच्या] द्वारे पाप जगात शिरले व पापाच्या द्वारे मरण शिरले आणि . . . सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”—रोमकर ५:१२; इयोब १४:४.
तरीपण काहीजण म्हणतील: ‘मृत्युमधून बचावणारा अमर असा जीव मनुष्यात नाही का?’ अशी शिकवण बहुतेकांना मिळाली आहे त्यामुळे ते असेही म्हणतात की मृत्यु हा दुसऱ्या जीवनाचे द्वार आहे. तथापि ही कल्पना पवित्र शास्त्रात आढळत नाही. देवाचे वचन शिकविते की तुम्हीच जीव आहात आणि तुमचा जीव तुमच्या सर्व शारीरिक व मानसकि गुणांसहित तुम्ही स्वतः आहात. (उत्पत्ती २:७; यिर्मया २:३४, नीतीसूत्रे २:१०) याचप्रमाणे पवित्र शास्त्र असे म्हणते: “जो जीव पाप करेल तो मरेल.” (यहेज्केल १८:४) माणसाला एक अमर जीव असून तो शरीराच्या मरणानंतर बचावून राहतो असे पवित्र शास्त्र कोठेही शिकवीत नाही.
माणसे कशी पुनः जिवंत होतील
पाप व मरण यांनी जगात प्रवेश केल्यानंतर, मृतांना पुनरूत्थानाद्वारे परत जिवंत करण्याचा आपला उद्देश आहे हे देवाने प्रकटविले. याविषयीची स्पष्टता देताना पवित्र शास्त्र म्हणते: “अब्राहामाने [आपला पुत्र इसहाक याला] मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे हे . . . मानले.” (इब्रीयांस ११:१७–१९) अब्राहामाचा आत्मविश्वास चुकीचा नव्हता कारण पवित्र शास्त्र सर्वसमर्थ देवाबद्दल म्हणते: “तो मृतांचा देव नव्हे तर जिवंताचा आहे, कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.”—लूक २०:३७, ३८.
होय, सर्वसमर्थ देवाठायी त्याला वाटणाऱ्या लोकांचे पुनरूत्थान करण्याची केवळ शक्ती नाही तर इच्छा सुद्धा आहे. येशू ख्रिस्तानेही स्वतः म्हटले: “याविषयी आश्चर्य करू नका, कारण असा समय येत आहे की त्यात स्मृतिकबरेत असणारे सर्व त्याची वाणी ऐकतील व . . . बाहेर येतील.”—योहान ५:२८, २९; प्रे. कृत्ये २४:१५.
हे बोलणे झाल्यानंतर काही काळातच नाईन या इस्राएली शहरातून एक प्रेतयात्रा बाहेर येताना येशूला भेटली. मयत झालेला तरूण विधवेचा एकुलता मुलगा होता. तिचे अतोनात दुःख पाहून येशूला खूप कळवळा आला. त्यामुळे त्याने प्रेताला उद्देशून अशी आज्ञा केली: “मुला, मी तुला सांगतो, उठ!” तो मुलगा उठून बसला आणि येशूने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले.—लूक ७:११–१७.
त्या विधवेला जे आश्चर्य व जो आनंद झाला तसाच येशूने यहुदी सभास्थानाच्या प्रमुख अधिकाऱ्याच्या घरी भेट दिली तेव्हाहि घडला. याईरची १२ वर्षे वयाची मुलगी वारली होती. पण येशू त्याच्या घरी आला तेव्हा तो आत मृत मुलगी होती तेथे गेला व त्याने म्हटले: “मुली, उठ!” आणि ती तत्काळ उठून बसली!—लूक ८:४०–५६.
काही काळाने येशूचा मित्र लाजर वारला. येशू त्याच्याकडे आला तेव्हा त्याला मरून चार दिवस झाले होते. त्याची बहीण मार्था अतिशय दुःखात होती तरी तिने आशा राखून म्हटले: “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” पण येशू कबरेजवळ गेला, त्याने धोंड काढायला लावली आणि हाक मारून म्हटले: “लाजरा, बाहेर ये!” व तो बाहेर आला!—योहान ११:११–४४.
आता जरा विचार करा: लाजार चार दिवस मृत होता त्यावेळी तो कोणत्या स्थितीत होता? आपण स्वर्गात पवित्र वातावरणात होतो किंवा यातनामय नरकात गेलो होतो असे काहीच लाजराने सांगितले नाही. तो यापैकी कोठेही गेला असता तर त्याने नक्कीच सांगितले असते. नाही, लाजार मरणात पूर्णपणे बेशुद्धावस्थेत होता आणि येशूने त्याचे पुनरूत्थान केले नसते तर तो “शेवटल्या दिवशी पुनरूत्थान समय” येईपर्यत तसाच राहिला असता.
हे खरे की येशूने केलेले हे चमत्कार तात्कालिक फायद्याचे होते कारण ज्यांना त्याने पुनरूत्थित केले होते ते पुन्हा कालांतराने वारले. तथापि, त्याने १९०० वर्षांआधी हा पुरावा दाखविला की देवाच्या सामर्थ्याद्वारे मृत पुन्हा जिवंत होऊ शकतात! त्यामुळेच आपल्या चमत्काराद्वारे येशूने, देवाच्या राज्यात पृथ्वीवर काय घडेल त्याची चुणूक दिली.
कोणी प्रियजन मरतो तेव्हा
मृत्यु हा शत्रू हल्ला करतो त्यावेळी तुमची पुनरूत्थानावर जरी आशा असली तरी तुम्हाला अतोनात दुःख होते. अब्राहामला सुद्धा आपली बायको सारा जिवंत होईल असा विश्वास होता तरीही आम्ही वाचतो की, “अब्राहाम तिजसाठी शोक व विलाप करण्यास आला.” (उत्पत्ती २३:२) आणि येशूबद्दल काय? लाजार वारला त्यावेळी तो ‘आत्म्यात खवळला व विव्हळ झाला,’ व लगेच “रडला.” (योहान ११:३३, ३५) या कारणामुळेच तुम्हास प्रिय असणारा कोणी वारला आणि तुम्ही रडता तेव्हा तो अशक्तपणा नसतो.
लहान मूल मरते त्यावेळी आईला विशेषेरित्या दुःख वाटते. आईचे हे दुःख केवढे मोठे असते त्याची पवित्र शास्त्र प्रचिती देते. (२ राजे ४:२७) अर्थातच, बापाला सुद्धा हे दुःख आवरणे मोठे जड जाते. “हाय रे हाय! . . . तुझ्याऐवजी मी मेलो असतो तर बरे होते,” असा दावीद राजाने आपला मुलगा अबशालोम वारला त्यावेळी विलाप केला.—२ शमुवेल १८:३३.
तरीपण, तुमचा पुनरूत्थानावर विश्वास असल्यामुळे तुमचे दुःख सतत तीव्र असणार नाही, ते कमी होईल. पवित्र शास्त्र म्हणते त्याप्रमाणे “ज्यांना आशाच नाही त्या बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद” करीत बसणार नाही. (१ थेस्सलनीकाकर ४:१३) उलटपक्षी, तुम्ही प्रार्थनेद्वारे देवाच्या समीप येत राहाल त्यामुळे ‘तो तुमची काळजी घेईल’ असे पवित्र शास्त्र तुम्हाला आश्वासन देते.—स्तोत्रसंहिता ५५:२२.
अन्यथा सूचित केले नसल्यास येथे वापरलेले बायबल भाषांतर द होली बायबल मराठी—आर. व्ही. हे आहे.