धार्मिकतेसाठी झालेला छळ
तुम्ही मित्रांकडून वा नातेवाईकांकडून ऐकाल की यहोवाचे साक्षीदार कायद्याच्या गोत्यात पडतात, काही सरकारांनी त्यांना बंदी घातली आहे, किंवा इतर काही कारणास्तव ते वाईट लोक आहेत. हे असे त्यांच्याविरूद्ध का बोलले जाते?
यहोवाचे साक्षीदार कायद्याचा अवमान करतात म्हणून नव्हे तर ते येशूच्या पावलावर पाऊल टाकतात म्हणून असे होते. येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले होते की, लोक त्यांची निंदा करतील, त्यांचा छळ करतील व त्यांच्याविरुद्ध खोटेपणाने हर तऱ्हेच्या वाईट गोष्टी बोलतील. याचे कारण, देवाचा प्रमुख विरोधी, सैतान, या जगाचा देव आहे आणि लोकांना देवाच्या सेवेपासून परावृत्त करणे त्याला आवडेल.—मत्तय ५:१०-१२; १०:१६-२२, ३४-३९; २४:९, १०; योहान १५:१७-१६:३; २ तीमथ्य ३:१२; १ पेत्र ५:८; प्रकटीकरण १२:१७.
प्रेषितांना पकडून न्यायसभेत नेले गेले ते, ते गुन्हेगार, हिंसक वा राजद्रोही होते म्हणून नव्हे. तर ते सुवार्तेचा प्रचार करत होते म्हणून नेण्यात आले. प्रेषित पौलाने उच्च न्यायसभेला, सुवार्तेच्या प्रचाराच्या ख्रिस्तीजनांच्या हक्काचे समर्थन करण्यास व तो कायदेशीररित्या सिद्ध करण्यासाठी याचना केली.—प्रे. कृत्ये ४:१८-२०; ५:२८-३२; फिलिप्पैकर १:७.
आज यहोवाचे साक्षीदार कायद्यानुसार वागणारे ख्रिस्तीजन असून ते कर भरतात व अधिकारी वर्गाला मान देतात. ते कैसराचे कैसराला व देवाचे देवाला भरून देतात. सरकारी अधिकाराशी त्यांचा खटका उडत असल्यास त्याचे कारण, ते सरकार त्यांच्या प्रचार कार्याला मान्यता देत नाही, किंवा राष्ट्रांमधील परस्पर व्यवहारात ते तटस्थ राहतात हे असते. या बाबतीत “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे” असे म्हणणाऱ्या प्रेषितांसारखा पवित्रा यहोवाच्या साक्षीदारांना घ्यावा लागतो.—प्रे. कृत्ये ५:२९; मार्क १२:१७; योहान १८:३६; तीत ३:१, २.
यहोवाच्या साक्षीदारांना छळून घेण्याची हौस नाही, तर ते शांततेने जगू इच्छितात. परंतु देवाचे नियम अनुसरल्यामुळे आणि येशू ख्रिस्ताचे अनुकरण करण्यामुळे त्यांचा छळ झाल्यास तो सहन करण्यात त्यांना आनंद वाटतो.—मत्तय ५:१०-१२; प्रे. कृत्ये ५:४०, ४१; १ करिंथकर ४:१२; १ तीमथ्य २:२; १ पेत्र ३:१४, १५; ४:१२-१६.
● यहोवाच्या सेवकांची निंदा का होते व छळ का होतो?
● ख्रिस्ती प्रेषितांप्रमाणे यहोवाच्या साक्षीदारांचा कधी कधी शासकीय अधिकाऱ्यांशी खटका का उडतो?
● यहोवाचे सेवक छळाकडे कोणत्या दृष्टीने पाहतात?
[२९ पानांवरील चित्रं]
देवाच्या राज्याचा प्रचार केल्यामुळे येशूला पिलातासमोर उभे राहावे लागले व पौलाला तुरुंगात टाकण्यात आले