गीत २१ (१९१)
सत्य आत्मसात करा
१. मार्ग सत्याचा उत्तम जगण्याला,
बरा दूजान सापडे.
शिकवी येशू, मोल मोठे दानाला,
सौख्य नांदे चोहीकडे.
सत्य स्वीकारात,
विश्वास प्रकटू द्यात.
तुमच्या वचन वर्तनाने,
दिसे केले सत्य आत्मसात.
२. देण्याने स्थान प्रथम ईश्वराला,
जगाच्या स्नेहाला मुकाल.
करी कुंठित अविश्वासू मतीला,
कि, दैवी नीती स्वीकाराल.
सत्य स्वीकारात,
संसारी न गुंतूयात.
देवाच्या जवळ येण्याने,
दिसे केले सत्य आत्मसात.
३. करी सैतान सतत फसवणूक,
परि करा त्याचा विरोध.
विश्वास ढाल होईल संरक्षक.
टाळी त्याच्या अस्त्रांचा क्रोध.
सत्य स्वीकारात,
डाव सैतानाचे ज्ञात.
देवाची शस्त्रास्त्रे घेण्याने,
दिसे केले सत्य आत्मसात.
४. देह अशक्त हृदय अविचारी,
नि पापी स्थितीशी झुंज.
परि जयाची असो मनी खातरी,
देव हो मित्र नि भुज.
सत्य स्वीकारात,
नसो गोडी कुकर्मात.
देही अंकुश ठेविल्याने,
दिसे केले सत्य आत्मसात.