वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • my कथा ८५
  • गोठ्यात येशूचा जन्म

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गोठ्यात येशूचा जन्म
  • बायबल कथांचं माझं पुस्तक
  • मिळती जुळती माहिती
  • येशूचा जन्म—कोठे आणि केव्हा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • देवदूत येशूच्या जन्माबद्दल घोषणा करतात
    बायबलमधून शिकू या!
  • येशूचा जन्म—कोठे व केव्हा?
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • तिनं या सर्व गोष्टी आपल्या “अंतःकरणात ठेवल्या”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
बायबल कथांचं माझं पुस्तक
my कथा ८५
गोठ्यात योसेफ, मरीया आणि येशू आहे

कथा ८५

गोठ्यात येशूचा जन्म

हे तान्हं बाळ कोण आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? होय, तो येशू आहे. एका गोठ्यात नुकताच त्याचा जन्म झाला आहे. गोठा म्हणजे, जनावरांना ठेवण्याची जागा. मरीया येशूला गव्हाणीत ठेवत आहे. गाढवं आणि इतर जनावरांना खायला चारा ठेवण्याच्या जागेला गव्हाण म्हणतात. पण मरीया आणि योसेफ या जनावरांच्याबरोबर गोठ्यात का आहेत? ही काही बाळंतपणाची जागा नव्हे, नाही का?

खरं म्हणजे, नाही. पण त्याचं कारण असं: रोमचा शासक कैसर औगुस्त यानं नियम केला की, पुस्तकात आपलं नाव नोंदवण्यासाठी प्रत्येकानं आपल्या जन्माच्या गावाला परत जावं. योसेफाचा जन्म या बेथलेहेम गावात झाला होता. पण मरीया आणि तो तिथे पोहोचले तेव्हा, राहण्यासाठी त्यांच्याकरता कोठेही जागाच नव्हती. त्यामुळे त्यांना इथे जनावरांबरोबर राहावं लागलं. आणि त्याच दिवशी मरीयेनं येशूला जन्म दिला. पण तुम्हाला दिसतो तसा, तो अगदी खुशाल आहे.

येशूला पाहण्यासाठी मेंढपाळ बेथलेहेमला येतात

येशूला पाहायला येणारे मेंढपाळ तुम्हाला दिसतात का? रात्री शेतात ते आपल्या कळपांची राखण करत होते. तेव्हा त्यांच्या भोवती एक मोठा प्रकाश पडला. तो एक देवदूत होता! मेंढपाळांना अतिशय भीती वाटली. परंतु तो देवदूत म्हणाला: ‘भिऊ नका! माझ्यापाशी तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आज, बेथलेहेमात ख्रिस्त प्रभूचा जन्म झाला. तो लोकांना तारील! तो, कपड्यात गुंडाळून गव्हाणीत ठेवलेला तुम्हाला सापडेल.’ अचानक अनेक देवदूत आले आणि देवाची स्तुती करायला लागले. त्यामुळे, तात्काळ हे मेंढपाळ येशूला शोधण्यासाठी घाईघाईनं गेले, आणि आता त्यांना तो सापडला आहे.

येशू इतका खास का आहे, ते तुम्हाला ठाऊक आहे का? तो खरोखर कोण आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? या पुस्तकाच्या पहिल्या गोष्टीत देवाच्या पहिल्या मुलाबद्दल सांगितलं होतं, त्याची आठवण करा. त्या मुलानं, स्वर्ग, पृथ्वी आणि इतर सर्व गोष्टी बनवण्यात यहोवाबरोबर काम केलं. तोच हा येशू.

यहोवानं स्वर्गातून त्याच्या पुत्राचं जीवन घेऊन, मरीयेच्या पोटात ठेवलं. इतर बाळं त्यांच्या आईच्या पोटात वाढतात तसं, ताबडतोब तिच्या पोटात एक बाळ वाढू लागलं. पण हा देवाचा पुत्र होता. शेवटी, इथे, बेथलेहेमातल्या एका गोठ्यात येशू जन्मला. तेव्हा, येशूचा जन्म झाल्याचं लोकांना सांगता आल्याबद्दल, देवदूतांना आनंद का झाला, हे आता तुम्हाला समजतं का?

लूक २:१-२०

अभ्यासासाठी प्रश्‍न

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा