वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • my कथा ७३
  • इस्राएलचा शेवटला गुणी राजा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इस्राएलचा शेवटला गुणी राजा
  • बायबल कथांचं माझं पुस्तक
  • मिळती जुळती माहिती
  • योशीयाचं देवाच्या नियमांवर प्रेम होतं
    बायबलमधून शिकू या!
  • योशीयाचे मित्र चांगले होते
    आपल्या चिमुकल्यांना शिकवा
  • नम्र योशीयावर यहोवाची कृपा होते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • त्याने लोकांना यहोवाकडे परत आणलं
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
अधिक माहिती पाहा
बायबल कथांचं माझं पुस्तक
my कथा ७३
योशीया राजा आणि त्याची माणसं खोट्या उपासनेसाठी वापरल्या जाणाऱ्‍या मूर्ती तोडतात

कथा ७३

इस्राएलचा शेवटला गुणी राजा

योशीया दक्षिणेच्या दोन वंशांच्या राज्याचा राजा होतो तेव्हा, फक्‍त आठ वर्षांचा असतो. राजा व्हायला हे फारच लहान वय आहे. त्यामुळे सुरवातीला काही वयस्कर लोक, राज्यावर शासन करायला त्याला मदत करतात.

योशीयाला राजा होऊन सात वर्षं लोटल्यावर तो यहोवाचा शोध घेऊ लागतो. तो, दावीद, यहोशाफाट आणि हिज्कीया यांच्या उदाहरणाप्रमाणे चालतो. मग, विशीच्या आत असतानाच योशीया एक धाडसी काम करतो.

बऱ्‍याच काळापर्यंत इस्राएली लोक फार वाईट वागले आहेत. ते खोट्या देवांची उपासना करतात. ते मूर्तींना दंडवत घालतात. या कारणांमुळे, योशीया आपल्या माणसांसकट जातो आणि देशातून खोटी उपासना निपटून काढायला लागतो. अनेक लोक खोट्या देवांची उपासना करत असल्यामुळे, हे काम फारच मोठं आहे. योशीया आणि त्याची माणसं मूर्ती तोडताना इथे तुम्हाला दिसतात.

त्यानंतर, यहोवाच्या मंदिराची डागडूजी करण्यासाठी योशीया तीन माणसांना नेमतो. लोकांकडून पैसे गोळा केले जातात आणि जरूर त्या कामाची मजुरी देण्यासाठी, या माणसांच्या हातात देतात. मंदिराचं काम करत असताना, महायाजक हिल्कीया याला तिथे एक फार महत्त्वाची गोष्ट सापडते. ते तर, खूप खूप वर्षांपूर्वी यहोवानं मोशेला लिहायला सांगितलेलं नियमशास्त्राचं पुस्तक आहे. अनेक वर्षं ते हरवलं होतं.

ते पुस्तक योशीयाकडे नेलं जातं व तो ते वाचून दाखवायला सांगतो. ते ऐकत असताना योशीयाला दिसून येतं की, लोक यहोवाचे नियम पाळत नाहीत. या गोष्टीचं त्याला फार वाईट वाटतं. आणि त्यामुळे इथे तुम्हाला दिसतं त्याप्रमाणे, तो आपले कपडे फाडतो. तो म्हणतो: ‘या पुस्तकात लिहीलेले नियम आपल्या वाडवडिलांनी न पाळल्यामुळे यहोवा आपल्यावर रागावला आहे.’

देवाचं नियमशास्त्र वाचलं जात असताना योशीया राजा ऐकतो तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं

यहोवा त्यांना काय करणार आहे, ते शोधून काढायला योशीया हिल्कीया महायाजकाला आज्ञा देतो. हिल्कीया हुल्दा नावाच्या संदेष्ट्रीकडे जाऊन तिला विचारतो. योशीयाला देण्यासाठी ती त्याला यहोवाकडून असा निरोप देते: ‘त्यांनी खोट्या देवांची उपासना केल्यामुळे आणि देश दुष्टाईनं भरल्यामुळे, जेरूसलेम आणि सर्व लोकांना शिक्षा होईल. पण योशीया, तू चांगलं ते केल्यामुळे, ही शिक्षा तुझ्या मरणाच्या आधी येणार नाही.’

२ इतिहास ३४:१-२८.

अभ्यासासाठी प्रश्‍न

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा