भाग ३
इजिप्तमधून सुटका ते इस्राएलच्या पहिल्या राजापर्यंत
मोशेनं इस्राएलांना इजिप्तमधल्या गुलामगिरीतून सोडवून सीनाय पर्वताकडे नेलं. तिथे देवानं त्यांना त्याचे नियम दिले. त्यानंतर मोशेनं, कनान देश हेरण्यासाठी १२ माणसं पाठवली. पण परतल्यावर, त्यातल्या १० जणांनी वाईट बातमी दिली. त्यांच्यामुळे, इजिप्तला परत जावं, असं लोकांना वाटलं. त्यांच्यातल्या विश्वासाच्या अभावामुळे, ४० वर्षं अरण्यात भटकायला लावून देवानं इस्राएलांना शिक्षा केली.
शेवटी, इस्राएलांना कनान देशात नेण्यात पुढाकार घेण्यासाठी यहोशवाला निवडलं गेलं. तो देश ताब्यात घ्यायला त्यांना मदत व्हावी, म्हणून यहोवानं चमत्कार केले. त्यानं जॉर्डन नदी वाहण्याची थांबवली, यरीहोचा तट पाडला आणि एक संपूर्ण दिवस सूर्याला थांबवून ठेवलं. सहा वर्षांनी कनानी लोकांपासून देश काबीज केला गेला.
यहोशवापासून सुरवात करुन, ३५६ वर्षं इस्राएलांवर शास्त्यांचा अंमल होता. त्यांच्यातल्या बाराक, गिदोन, इफ्ताह, शमशोन आणि शमुवेल यांच्यासह अनेकांबद्दल आपण शिकतो. तसंच राहाब, दबोरा, याएल, रूथ, नामी आणि दलीलासारख्या स्त्रियांबद्दलही वाचतो. तिसऱ्या भागात एकूण ३९६ वर्षांचा इतिहास आहे.