वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g21 क्र. ३ पृ. ३
  • तुम्ही हे कसं ठरवू शकता?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही हे कसं ठरवू शकता?
  • सावध राहा!—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • निर्माता तुमचे जीवन अर्थपूर्ण बनवू शकतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • निर्माणकर्त्यावरचा आपला विश्‍वास मजबूत करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • महान सृष्टीकर्ता आपली काळजी वाहतो!
    आमची राज्य सेवा—१९९९
  • सजीव सृष्टीची सुरुवात कशी झाली?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२१
g21 क्र. ३ पृ. ३
एका पाळकाच्या हातात बायबल आहे, तर एका शास्त्रज्ञाच्या हातात डीएनएचं मॉडल आहे आणि एक मुलगी त्यांकडे चौकस नजरेने पाहात आहे.

तुम्ही हे कसं ठरवू शकता?

“हे विश्‍व शून्यातून स्वतःहून अस्तित्वात येऊ शकतं आणि येत राहील.”—स्टीफन हॉकिंग व लीओनार्ड म्लोडिनोव या भौतिकशास्त्रज्ञांनी लिहिलेल्या, आणि २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या द ग्रँड डिझाईन या पुस्तकातून.

“सुरुवातीला देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली.”—बायबल, उत्पत्ती १:१.

हे विश्‍व आणि जीवसृष्टी देवाने निर्माण केली, की ती आपोआप अस्तित्वात आली? या प्रश्‍नाचं, वरती उल्लेख केलेल्या दोन भौतिकशास्त्रज्ञांनी दिलेलं उत्तर आणि बायबलमध्ये दिलेलं उत्तर यात जमीन अस्मानाचा फरक आहे. या भोतिकशास्त्रज्ञांचं म्हणणं मानणारेही बरेच लोक आहे आणि बायबलचं म्हणणं मानणारेही बरेच आहेत. तर असेही अनेक जण आहेत ज्यांना यांपैकी काय मानायचं ते समजत नाही. या विषयावर अनेक प्रसिद्ध पुस्तकांमध्ये, तसंच टीव्ही कार्यक्रमांमध्ये बरेच वादविवाद होताना दिसतात.

एकीकडे तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला असं शिकवलं असेल, की हे विश्‍व आणि सगळी जीवसृष्टी आपोआप अस्तित्वात आली. पण याचा काही पुरावा त्यांनी तुम्हाला दिला का? दुसरीकडे, हे सगळं एका निर्माणकर्त्याने बनवलं आहे  असं धर्मगुरूंना शिकवताना तुम्ही ऐकलं असेल. पण याचाही काही पुरावा ते देतात का? की या गोष्टींवर तुम्ही डोळे झाकून “विश्‍वास” ठेवला पाहिजे असं ते म्हणतात?

हे विश्‍व कसं अस्तित्वात आलं असा प्रश्‍न तुम्हाला कधी ना कधी पडलाच असेल. पण या प्रश्‍नाचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही अशी शंका कदाचित तुमच्या मनात आली असेल. शिवाय, या प्रश्‍नाचं उत्तर मिळवणं खरंच इतकं महत्त्वाचं आहे का, असाही कदाचित तुम्ही विचार केला असेल.

सावध राहा!  मासिकाच्या या अंकात असे काही पुरावे दिले आहेत ज्यांचं परीक्षण केल्यामुळे अनेकांना खातरी पटली आहे, की हे विश्‍व कोणीतरी बनवलं आहे. तसंच, या अंकात हेसुद्धा सांगितलं आहे, की जीवसृष्टीची सुरुवात कशी झाली या प्रश्‍नाचं उत्तर मिळवणं इतकं महत्त्वाचं का आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा