वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g21 क्र. १ पृ. ३
  • आनंदी जीवनासाठी मोलाचा सल्ला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आनंदी जीवनासाठी मोलाचा सल्ला
  • सावध राहा!—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०२१
  • खऱ्‍या सुखाचे रहस्य काय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • खरी बुद्धी मोठ्याने हाक मारत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • यहोवाची सेवा करण्यामधील खरा आनंद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२१
g21 क्र. १ पृ. ३
एक स्त्री भारतातल्या एका हॉटेलमध्ये बसून नुकत्याच वाचलेल्या गोष्टीवर विचार करत आहे.

आनंदी जीवनासाठी मोलाचा सल्ला

राणीa नावाची एक स्त्री म्हणते: “जगाची परिस्थिती खूपच खराब झालीए. बऱ्‍याच ठिकाणी युद्धं, गरिबी आणि आजारपण पाहायला मिळतं. तसंच, लहानलहान मुलांवर अत्याचार होताएत. हे सगळं पाहून मला खूप वाईट वाटतं. पण मला माहितीए, की ही परिस्थिती अशीच राहणार नाही, ती लवकरच बदलेल.”

राणी असं इतकं खातरीने का म्हणू शकली? कारण तिला माहीत झालं, की आपल्याला बनवणारा देव लवकरच ही वाईट परिस्थिती बदलणार आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत आनंदी राहण्यासाठी देवाने पवित्र शास्त्रात काय लिहून ठेवलं आहे हेही तिला कळलं. तुम्हीसुद्धा निर्माणकर्त्याने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या, तर आनंदी राहू शकता. यासाठी आपण या मासिकात काही प्रश्‍नांवर चर्चा करू. जसं की:

  • कुटुंब आनंदी कसं राहू शकतं?

  • नाती कशी जपायची?

  • समाधानी जीवन कसं जगायचं?

  • जीवनात इतकं दुःख, इतका त्रास का आहे? आपण का मरतो?

  • चांगली परिस्थिती येणार आहे हे आपण कसं म्हणू शकतो?

  • आपल्याला ज्याने बनवलं आहे त्या देवाला तुम्ही कसं आळखू शकता? आणि त्याच्याशी मैत्री कशी करू शकता?

या गोष्टींबद्दल निर्माणकर्त्याने जे सांगितलं आहे ते फक्‍त काही विशिष्ट समूहाच्या लोकांसाठी नाही, तर सगळ्यांसाठीच आहे.

a या मासिकात नावं बदलण्यात आली आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा