वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g19 क्र. २ पृ. १०-११
  • जबाबदार व्यक्‍ती कसं बनावं?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जबाबदार व्यक्‍ती कसं बनावं?
  • सावध राहा!—२०१९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जबाबदार व्यक्‍ती बनण्यात काय सामील आहे?
  • जबाबदार व्यक्‍ती बनणं महत्त्वाचं का आहे?
  • मुलांना जबाबदार व्यक्‍ती बनायला शिकवणं
  • घरातल्या कामांमध्ये हातभार लावण्याचं महत्त्व
    सावध राहा!—२०१७
  • स्वतंत्र होऊ देण्यास शिकणे
    सावध राहा!—१९९८
  • ८ उदाहरण
    सावध राहा!—२०१८
  • मुलांना शिस्त लावण्यास बायबल मदत करू शकते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०१९
g19 क्र. २ पृ. १०-११
एक वडील आपल्या मुलाची झाडांना पाणी घालायला मदत करत आहेत

चौथी गोष्ट

जबाबदार व्यक्‍ती कसं बनावं?

जबाबदार व्यक्‍ती बनण्यात काय सामील आहे?

जबाबदार लोक भरवशालायक असतात. त्यांना दिलेलं काम ते वेळेवर आणि चांगल्या प्रकारे करतात.

मुलं लहान असली तरी ती जबाबदार बनायला शिकू शकतात. पेरेंटींग विथाऊट बॉर्डर्स  नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे की, “मुलं १५ महिन्यांची झाली की आईवडील जे सांगतील ते ती करतात. आणि जेव्हा ती १८ महिन्यांची होतात तेव्हा तर आईवडील जे करतात ते त्यांना करायचं असतं. बऱ्‍याचशा संस्कृतींत, मुलं ५ ते ७ वर्षांची होतात तेव्हा ते घरातल्या कामांमध्ये हातभार कसं लावू शकतात हे आईवडील त्यांना शिकवतात. मुलं लहान असली तरी ती अनेक कामं अगदी नीट करतात.”

जबाबदार व्यक्‍ती बनणं महत्त्वाचं का आहे?

पुष्कळ मुलं जेव्हा मोठी होतात आणि आईवडिलांपासून वेगळी राहायला जातात तेव्हा त्यांना जीवनातल्या समस्यांना यशस्वीपणे तोंड देता येत नाही. काहींच्या बाबतीत हे यासाठी घडतं कारण त्यांच्या आईवडिलांनी याआधी त्यांना पैशाचा सुज्ञपणे वापर करायला, घर चालवायला किंवा रोजच्या लहानमोठ्या जबाबदाऱ्‍या हाताळायला शिकवलेलं नसतं.

तात्पर्य हेच, की मुलांना लहान असतानाच जबाबदार व्यक्‍ती बनायला शिकवलं तर मोठं झाल्यावर आपण काय करावं हे त्यांना स्वतःहून कळेल. हाऊ टू रेझ ॲन अडल्ट या पुस्तकात म्हटलं आहे की, “मुलं सज्ञान किंवा अठरा वर्षांची होईपर्यंत त्यांनी तुमच्यावर अवलंबून राहावं अशी तुमची इच्छा असू नये, कारण त्यांना नंतर एकट्याने जगाचा सामना करावा लागणार असतो.”

मुलांना जबाबदार व्यक्‍ती बनायला शिकवणं

घरातली काही कामं नेमून द्या.

बायबल तत्त्व: “सर्व श्रमांत लाभ आहे.”—नीतिसूत्रे १४:२३.

लहान मुलांना आपल्या आईवडिलांना त्यांच्या कामांत मदत करायला आवडतं. तुम्ही त्यांची ही नैसर्गिक इच्छा लक्षात घेऊन त्यांना घरातली काही कामं नेमून देऊ शकता.

काही आईवडील आपल्या मुलांना कामं देत नाहीत. त्यांचं असं मत असतं की शाळेत जाणाऱ्‍या मुलांना ढीगभर अभ्यास असतो तर त्यांना काम देऊन त्यांचा भार आणखी का वाढवावा?

पण जी मुलं घरातली कामं करतात ती सहसा शाळेत हुशार असतात कारण त्यांना दिलेली सर्व कामं ती स्वीकारतात आणि पूर्णही करतात. त्याशिवाय, पेरेंटींग विथाऊट बॉर्डर्स  या पुस्तकात म्हटलं आहे, “मुलं लहान असतात तेव्हा त्यांना आपल्याला मदत करायची इच्छा असते. पण आपण त्यांना तसं करू दिलं नाही तर इतरांना मदत करणं इतकं महत्त्वाचं नाही असं त्यांना वाटू लागतं . . . आणि इतकंच काय तर त्यांची कामं इतर कोणीतरी करावीत अशीही अपेक्षा ते करू लागतात.”

पुस्तकातल्या या वाक्यावरून समजतं, की आईवडिलांनी मुलांना घरातली कामं करायला शिकवली तर ती इतरांना मदत करायला शिकतील आणि स्वार्थी बनणार नाहीत. मुलांनी घरातली कामं केल्यामुळे त्यांना वाटेल की घरात त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे आणि त्या कामांची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

आपल्या हातून झालेल्या चुकांसाठी आपण जबाबदार आहोत हे मुलांना समजायला मदत करा.

बायबल तत्त्व: “सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील.”—नीतिसूत्रे १९:२०.

तुमची मुलं जेव्हा चुकतात जसं की, त्यांच्याकडून चुकून एखाद्याच्या वस्तूचं नुकसान झालं असेल तेव्हा ती चूक लपवण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्या परिणामांना त्यांना सामोरं जाऊ द्या. वस्तूचं नुकसान झालं असेल तर ते माफी मागू शकतात किंवा झालेल्या नुकसानाची भरपाई करू शकतात कारण या गोष्टी करणं त्यांच्या क्षमतेपलीकडे नाही.

मुलांनी केलेल्या चुकांसाठी ते जबाबदार आहेत हे त्यांना कळेल तेव्हा त्यांना पुढील गोष्टी शिकायला मिळतील:

  • प्रामाणिक बनायला आणि आपल्या चुका कबूल करायला

  • आपल्या चुकांसाठी इतरांचं नाव पुढे करण्याचं टाळायला

  • कारणं देण्याचं टाळायला

  • गरज पडली तर माफी मागायला

एक वडील आपल्या मुलाची झाडांना पाणी घालायला मदत करत आहेत

प्रशिक्षण देण्याची हीच वेळ आहे 

ज्या मुलांना लहान असताना जबाबदार बनायला शिकवलं जातं ती मोठी झाल्यावर आपलं जीवन चांगल्या रीतीने व्यतीत करायला शिकतील

आपल्या उदाहरणातून शिकवा

  • मी मेहनती, सुव्यवस्थित आणि वेळेचं पालन करणारा आहे का?

  • मी घरात काम करतो हे माझी मुलं पाहतात का?

  • मी माझ्या चुका कबूल करतो का आणि गरज पडल्यास माफी मागतो का?

आमचा अनुभव . . .

लॉरा नावाची आई म्हणते, “माझा मुलगा आणि मुलगी लहान होते तेव्हापासूनच ते मला मदत करायचे. मी स्वयंपाक बनवायचे तेव्हा ते मला हातभार लावायचे. मी कपड्यांची घडी घालायचे तर तेही माझ्यासोबत कपड्यांची घडी घालायचे. मी साफसफाई करायचे तेव्हा तेसुद्धा माझ्यासोबत साफसफाई करायचे. काम करायला त्यांना मजा वाटायची. मी जे करायचे त्यांनाही तेच करायचं होतं. त्यांना माझ्यासोबत वेळ घालवायला मिळतोय यामुळे ते आनंदी व्हायचे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे ते जबाबदार व्यक्‍ती बनायला शिकले.”

डेब्रा नावाची आई म्हणते, “एकदा आमचा मुलगा आमच्या ओळखीच्या एका व्यक्‍तीशी उद्धटपणे बोलला. मी त्याला त्यांना फोन करून माफी मागायला सांगितलं आणि त्याने तसं केलंही. मग बरीच वर्षं, कितीतरी वेळा त्याने आपल्या प्रामाणिक पण मनाला टोचणाऱ्‍या शब्दांनी इतरांना दुखावलं आणि त्याला यासाठी माफी मागावी लागली. पण या गोष्टीमुळे आज त्याच्याकडून चूक झाल्यावर तो मनापासून माफी मागायला शिकला आहे.”

परिणामांचे फायदे

ॲटलँटीक  मासिकात शिक्षिका जेसीका लॅहे यांनी लिहिलं, “मुलं चुका करतात तेव्हा आईवडिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्या परिणामांना मुलं सामोरं गेली तर त्यांना खूप काही शिकायला मिळेल. प्रत्येक वर्षी मी पाहत आलेय, की अशीच मुलं जास्त आनंदी आणि यशस्वी आहेत ज्यांनी चुका केल्यावर त्यांच्या आईवडिलांनी त्यांना पाठीशी न घालता त्यांच्या परिणामांना सामोरं जाऊ दिलं आणि त्यांना सुधरायला मदत केली.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा