तुमची स्वतःची अशी एक स्वतंत्र व ठाम ओळख असेल, तर तुम्ही प्रचंड वादळातही टिकून राहू शकता
तरुणांसाठी
९ ओळख
याचा काय अर्थ होतो?
तुमची ओळख ही फक्त तुमचं नाव किंवा तुम्ही कसे दिसता यापर्यंतच मर्यादित नसते. तुमची मूल्यं, विश्वास आणि व्यक्तिमत्त्व यांचाही यात समावेश होतो. तुमचं वागणं-बोलणं, तुमचा स्वभाव या गोष्टींवरून तुमची ओळख ठरते.
हे का महत्त्वाचं?
तुमची स्वतःची एक स्वतंत्र अशी ओळख असते तेव्हा तुम्ही मित्रांच्या दबावात येत नाही. ज्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे त्यांवर तुम्ही ठाम राहता आणि मित्रांच्या बोलण्यावरून तो बदलत नाही.
“बरेच लोक दुकानात ठेवलेल्या पुतळ्यांसारखे असतात. कोणते कपडे घालायचे हे ते स्वतः ठरवत नाहीत तर दुसरे त्यांच्यासाठी निवडतात.”—अमेय.
“जरी कठीण वाटत असलं तरी योग्य गोष्टींसाठी ठाम भूमिका घ्यायला मी शिकले. माझे खरे मित्रमैत्रिणी कोण आहेत हे मी त्यांच्या वागण्यावरून आणि त्यांच्यासोबत असताना माझ्या वागण्यावरून सांगू शकते.”—कॅरल.
बायबल तत्त्व: “या जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण करू नका, तर आपली विचारसरणी बदलून स्वतःचे रूपांतर होऊ द्या.”—रोमकर १२:२.
तुम्ही काय करू शकता?
तुमचे चांगले गुण, कमतरता आणि विश्वास यांचं परीक्षण केल्यामुळे, तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात आणि तुम्हाला कशा प्रकारची व्यक्ती बनायचं आहे, हे समजायला तुम्हाला मदत होईल. यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता.
चांगले गुण: माझ्यात कोणते गुण आणि कौशल्यं आहेत? मी कोणत्या बाबतीत चांगला आहे? (उदाहरणार्थ: दिलेली वेळ पाळणं, आत्मसंयम, मेहनत, उदारता.) मी कोणत्या चांगल्या गोष्टी करतो?
सल्ला: तुमच्यात कोणते चांगले गुण आहेत यावर विचार करायला तुम्हाला कठीण जात आहे का? तुमच्या आईवडिलांना किंवा एखाद्या भरवशालायक मित्राला विचारा की त्याला तुमच्यात कोणते चांगले गुण दिसतात आणि का.
बायबल तत्त्व: “प्रत्येकाने स्वतःच्या कार्यांचे परीक्षण करावे, म्हणजे मग दुसऱ्या कोणाशी तुलना केल्यामुळे नाही, तर स्वतःच्या कार्यांमुळे त्याला आनंदी होता येईल.”—गलतीकर ६:४.
कमतरता: माझ्या व्यक्तिमत्त्वातल्या कोणत्या पैलूंवर मला काम केलं पाहिजे? वाईट गोष्टी करण्याचा जास्त मोह मला कधी होतो? मी कोणत्या क्षेत्रात जास्त आत्मसंयम दाखवला पाहिजे?
बायबल तत्त्व: “‘आपल्यामध्ये पाप नाही,’ असे जर आपण म्हटले, तर आपण स्वतःलाच फसवत आहोत.”—१ योहान १:८.
विश्वास: मी कोणते नैतिक स्तर पाळतो आणि का? मी देवाला मानतो का? कोणत्या पुराव्यांमुळे मला त्याचं अस्तित्व पटलं आहे? कोणती कार्यं पाहून मला अन्याय झाल्यासारखा वाटतो आणि का? भविष्य कसं असेल याबद्दल माझा काय विश्वास आहे?
बायबल तत्त्व: “विवेक तुझे रक्षण करेल, समंजसपणा तुला संभाळेल.”—नीतिसूत्रे २:११.