वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 १०/८ पृ. ३२
  • “माझं एकच स्वप्न”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “माझं एकच स्वप्न”
  • सावध राहा!—१९९९
सावध राहा!—१९९९
g99 १०/८ पृ. ३२

“माझं एकच स्वप्न”

याविषयावर, युगोस्लाव्हियाच्या व्रान्य गावातल्या एका शाळेतील विद्यार्थ्यांना निबंध लिहायला सांगितला होता. आठ वर्षांच्या सर्ज्येने लिहिलेला पुढील निबंध नंतर शाळेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आला.

“खूप चांगले मार्क मिळवून पास व्हायचं आणि मग बेलग्रेडला जाऊन मस्तपैकी सुटी घालवायची एवढं एकच माझं स्वप्न आहे असं सुरवातीला मला लिहावंसं वाटलं. पण, घरी निवान्त असताना एक वेगळाच विचार माझ्या मनात आला. सबंध जगात सुखशांती असावी, सर्वांनी सुखासमाधानानं राहावं आणि एकमेकांवर प्रेम करावं, एकमेकांना मदत करावी हे खरं तर माझं स्वप्न आहे. सर्वांनी निरोगी असावं आणि आपला हा पृथ्वी ग्रह आणखीन स्वच्छसुंदर व्हावा अशी माझी इच्छा आहे.

“आज रसायनांमुळे पृथ्वी अगदी प्रदूषित झाली आहे. पाणी आणि हवा देखील दूषित आहे. दुष्काळामुळे दररोज हजारो बालके मृत्यूच्या खाईत लोटली जाताहेत आणि रोगराई आणखीन कितीतरी मुलांचे जीव घेत आहे. हे सबंध चित्रच बदलून जावं, सर्व मुलांना आपल्या आईबाबांचं भरभरून प्रेम मिळावं नि उजाडणारा प्रत्येक दिवस आनंदाचे भरते घेऊन येणारा असेल या खात्रीनं जगातल्या सर्व मुलांना दररोज कोणत्याही भयाविना निवान्त झोप यावी असं मला वाटतं. अर्थात, हे आज तरी शक्य नाही. पण, भविष्यात मात्र नक्की होईल. एवढं एकच माझं स्वप्न आहे.”

भविष्यात आपले हे स्वप्न नक्की वास्तवात उतरेल असे पूर्ण आत्मविश्‍वासानिशी सर्ज्ये का म्हणू शकला? कारण बायबलमध्ये वर्णन केलेल्या देवाच्या अभिवचनांवर त्याचा भरवसा आहे. देव खरोखरी आपली काळजी करतो का? या माहितीपत्रकातील “देवाच्या निर्मितीचे आश्‍चर्यकारक नवे जग” या सदरात देवाच्या अभिवचनांचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे.

देव खरोखरी आपली काळजी करतो का? या माहितीपत्रकाविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुमची मदत करण्यास आम्हाला आनंद वाटेल. तुमच्या परिसरात राहणारा आमचा एक प्रतिनिधी तुम्हाला भेट देईल. तुमची तशी इच्छा असल्यास कृपया पुढील कूपन भरून ते टपालाने आम्हाला पाठवून द्यावे किंवा या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर पत्र लिहावे.

□ कृपया तुमच्या एखाद्या प्रतिनिधीला माझ्या घरी पाठवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा