वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ६/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • डेंग्यू—चावण्यामुळे संभवणारा ताप
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९९
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९९
सावध राहा!—१९९९
g99 ६/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनोगत

माझं लक्ष का लागत नाही? “तरुण लोक विचारतात . . . माझं लक्ष का लागत नाही?” (ऑगस्ट ८, १९९८), हा लेख वाचून माझे डोळे आनंदानं भरून आले. मी १८ वर्षांची आहे आणि सध्या पूर्ण-वेळेची सेवा करते. क्षेत्र सेवेत लोकांना मदत करण्यासाठी लक्ष एकाग्र करणं अत्यंत जरूरीचं असतं; पण मला ते जमत नसल्यामुळे मी फार दुखी व्हायचे. शेवटी एक वेळ अशी आली, की मला काही गोष्टी आठवेनाशा झाल्या, मी नीट विश्‍लेषण करू शकत नव्हते आणि त्यामुळे मी अगदी हताश झाले. यहोवा यथाकाळी अन्‍न पुरवतो असं बायबलमध्ये काही उगाच म्हटलेलं नाही.

ए. आर. सी. आर., अमेरिका

प्रवाशांना सूचना “डेंग्यू—चावण्यामुळे संभवणारा ताप” (ऑगस्ट ८, १९९८) या लेखातील “प्रवाशांना सूचना” यातून एक सूचना सुटलेली दिसते आणि ती म्हणजे रात्रीच्या वेळी मच्छरदाणी, शक्यतो जंतूनाशके फवारलेली मच्छरदाणी वापरणे.

आय. एच., इंग्लंड

यावरील आपले मनोगत दिल्याबद्दल आम्ही वाचकाचे आभार मानतो. खासकरून मलेरियाचा प्रतिबंध करण्यासाठी ही सूचना उपयुक्‍त आहे. (ऑगस्ट ८, १९९७ च्या “सावध राहा!” अंकातील पृष्ठ ३१ पाहा.) पण, यु.एस. सेंटर्स फॉर डिझीज कंट्रोल यानुसार ज्या डासामुळे डेंग्यूचा ताप येतो तो डास “सहसा दिवसा मानवी शरीरावर पोटपूजा करतो.” “सकाळी, दिवस उजाडल्यानंतर बरेच तास तसेच संध्याकाळी काळोख होण्यापूर्वी तो सगळ्यात जास्त” चावतो. त्यामुळे, या विशिष्ट रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी रात्रीच्या वेळी मच्छरदाणी वापरणे कदाचित इतके उपयोगाचे ठरणार नाही.—संपादक.

जाहिरातबाजी

यहोवाची साक्षीदार नसलेली माझी मुलगी जाहिरातीच्या क्षेत्रात काम करते; त्यामुळे “जाहिरातबाजी—आणि तुम्ही!” ही लेखमाला असलेला सप्टेंबर ८, १९९८ चा अंक मी तिला टपालाने पाठवून दिला. तिनं त्याची खूप वाहवा केली आणि म्हटले, की लोकांची मनं जिंकण्याची कला खरं तर तुमच्या लेखकांनी आत्मसात केली आहे.

आर. एस., संयुक्‍त संस्थाने

सैतानाला जबाबदार धरणे? मी १७ वर्षांचा आहे आणि कालपरवाच, आयुष्यात पहिल्यांदा सावध राहा! मासिक वाचण्याचा योग मला आला. आता जणू मला ते वाचण्याचं व्यसनच जडलं आहे! “बायबलचा दृष्टिकोन: आपल्या पापांसाठी सैतानाला जबाबदार धरावे का?” (सप्टेंबर ८, १९९८) अशी अति-उपयुक्‍त माहिती त्यात होती. कोणतंही पाप केलं तर त्याचा दोष आपण सैतानाच्या माथी लावू शकतो असाच कालपर्यंत माझा ग्रह होता. पण काहीही म्हणा, तुमचं हे मासिक अव्वल दर्जाचं मासिक आहे आणि सगळ्यांनीच ते वाचावं अशी शिफारस मी करतो. कृपया तुमच्या वर्गणीदारांच्या यादीत माझंही नाव नोंदवा!

एम. एम., अमेरिका

युवकांमधील आत्महत्या “आजच्या युवकांसाठी काय आशा?” (ऑक्टोबर ८, १९९८) या लेखमालेसाठी मी तुमचे मनस्वी आभार मानू इच्छिते. तो लेख वाचून मला अगदी भरून आलं. कारण कित्येकदा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण, प्रत्येक वेळी माझे प्रयत्न फसले याचा आता मला आनंद होतो.

ए. झेड., चेक गणराज्य

एका अत्यंत नाजूक विषयावर हे अतिशय सहानुभूतीपर लेख होते. या वर्षाच्या सुरवातीला, अतिनिराशेमुळे मी देखील माझं जीवन संपवून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या समयोचित विषयासाठी आभारी; कारण त्यामुळे मी आज जिवंत आहे.

आर. पी., इंग्लंड

माझ्या वर्गातल्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यासाठी मला खूप वाईट वाटतं. त्यापैकी एकाला आपल्या भविष्यात समस्यांशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं आणि म्हणून त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हा लेख खूप व्यावहारिक होता कारण आपलं भविष्य अर्थपूर्ण कसं होऊ शकतं हे त्या लेखानं अगदी सुस्पष्ट, सरल शब्दांत दाखवून दिलं.

आर. डी., स्पेन

तुमचा हा लेख वाचून मी अगदी हेलावून गेले. जणू एका प्रेमळ पित्याप्रमाणे यहोवा माझ्याशी बोलत होता. मी लहान असताना माझ्या वडिलांनी माझ्याशी दुर्व्यवहार केला. त्यामुळे आपल्याला काहीच किंमत राहिली नाही असं राहून राहून मला वाटायचं आणि अनेकदा आत्महत्या करण्याचा मी विचार केला. पण आता, तुमच्या लेखानं दिलेल्या सल्ल्यानुसार मी ‘खऱ्‍या जीवनाची’ लालसा विकसित करत आहे.—१ तीमथ्य ६:१९.

एस. आर., ब्राझील

युवकांचे आपले स्वतःचे बोल उद्धृत केल्याबद्दल तुमचे विशेष आभारी. कारण त्यांपैकी बऱ्‍याच युवकांनी केवळ मोजक्याच शब्दांत समस्यांवर उपाय सुचवले आहेत.

डब्ल्यू. एच., जर्मनी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा