तुम्हाला पस्तावा होणार नाही असा निर्णय
दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलेले कोट्यवधी स्त्री-पुरुष आता ४० ते ६० च्या वयोगटात आहेत. आपल्या जीवनात साध्य केलेल्या गोष्टींबद्दल अनेकजण समाधानी असले, तरी काहींना निराशा वाटते. त्यांनी लग्न केले, नोकरी केली, त्यांना मुले झाली, त्यांचे आपापले कुटुंब होते आणि काहींनी आपल्या पालकांना मरतानाही पाहिले आहे. आज, त्यांचे केस पांढरे होत असताना, वजन वाढत असताना आणि गुडघे दुर्बल झाले असताना काहींना वाटते की, त्यांना आपल्या जीवनातली ध्येये साध्य करता आली नाहीत. नाउमेदीने ते कदाचित असा प्रश्न विचारतील, ‘जीवनाला काय अर्थ आहे?’ कदाचित हाच प्रश्न तुम्ही देखील विचारला असेल.
वेळोवेळी आपल्या जीवनाचे पुनरावलोकन करणे निश्चितच फायदेकारक असते. दुसऱ्या बाजूला पाहता, तुम्हाला पस्तावा झाला अशा गतकाळातील निर्णयांवर विचार करत बसल्याने निराशा होऊ शकते. ‘असे केले असते तर . . . ,’ असे म्हणण्याऐवजी भविष्यात तुम्ही अद्यापही जे सुज्ञ निर्णय घेऊ शकता त्यांच्यावर मन केंद्रीत करणे किती उत्तम ठरेल. असाच एक निर्णय म्हणजे, जीवनाच्या अर्थासंबंधाने उठणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या माहितीचे परीक्षण करणे होय. म्हणून, देव खरोखरी आपली काळजी करतो का? हे प्रकाशन वाचण्याचे आमंत्रण आम्ही तुम्हाला देतो. आमचे हे आमंत्रण स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचा तुम्हाला पस्तावा होणार नाही.
सोबत दिलेले तिकीट भरून, दिलेल्या पत्त्यावर किंवा या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर पोस्टाने पाठवल्याने तुम्हाला हे ३२-पानी माहितीपत्रक मिळू शकेल.
□ देव खरोखरी आपली काळजी करतो का? हे माहितीपत्रक मला पाठवा
□ मला एक मोफत गृह बायबल अभ्यास हवा आहे; तरी यासंबंधी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.