तुम्ही देवाला प्रसन्न करू इच्छिता का?
आपल्या जीवनात अध्यात्मिक गोष्टी असल्याच पाहिजे याची तुम्हाला प्रकर्षाने जाणीव होते का? जगात जिथे केवळ भौतिक गोष्टींना महत्त्व देतात तेथे कशाची तरी कमी आहे असे तुम्हाला वाटते का? देव कोण आहे याची माहिती तुम्हाला करून घ्यायची आहे का? आणि त्याच्याशी एक घनिष्ठ नातेसंबंध जोडायचा आहे का?
यावर तुम्ही कदाचित म्हणाल, ‘होय निश्चित; पण हे मला कसे करता येईल? कारण बायबल वाचणं आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी समजून घेणं इतकं सहजसोपं नाही.’ गरिबीमुळे काहींना त्यांना पुरेसे शिक्षण मिळालेले नसेल; साहजिकच, अशा लोकांना बायबलचे वाचन करणे जड जाते. देव कोण आहे आणि सार्वकालिक जीवन मिळवू इच्छिणाऱ्यांकडून तो काय अपेक्षा करतो हे समजण्यासाठी आपण अशा लोकांना कशी मदत करू शकतो?
वॉच टावर संस्थेने १९९६ मध्ये देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे प्रकाशन प्रकाशित केले; सध्या, २११ भाषांमध्ये ते उपलब्ध आहे. ३२ पृष्ठांच्या या रंगीबेरंगी माहितीपत्रकात १६ भाग असून त्यांत पुढील प्रश्नांची अगदी सुस्पष्ट, बायबल-आधारित उत्तरे दिलेली आहेत: देव कोण आहे? येशू ख्रिस्त कोण आहे? पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे? तुम्हाला खरा धर्म कसा शोधता येईल? तसेच, आपण प्रार्थनेमार्फत देवाच्या समीप कसे जाऊ शकतो आणि देवाला संतुष्ट करणाऱ्या कौटुंबिक जीवनाचा आनंद आपण कसा घेऊ शकतो याची देखील त्या माहितीपत्रकात चर्चा केलेली आहे.
तुम्हाला हे माहितीपत्रक हवे असल्यास कृपया हे कापून आम्हाला पाठवून द्यावे.
□ देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक मला पाठवून द्यावे.
□ मला एक मोफत गृह बायबल अभ्यास हवा आहे; तरी यासंबंधी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.