“सर्व लोक कधी एकमेकांवर प्रीती करतील का?”
मागच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत, “सर्व लोक कधी एकमेकांवर प्रीती करतील का?” या चार पानी हस्तपत्रिकेचा अतिशय मोठ्या प्रमाणावर वाटप झाला; सबंध जगभरात त्याच्या ३० कोटींपेक्षा अधिक प्रतींचे १०० हून अधिक भाषांत वाटप करण्यात आले होते. अनेक लोकांनी मनापासून त्याची प्रशंसा केली; उदाहरणार्थ, ईस्टन, पेन्सिल्व्हेनिया, अमेरिकेच्या एक्सप्रेस टाईम्स वृत्तपत्रात या हस्तपत्रिकेबद्दल असे लिहिले होते:
“आज शेजाऱ्याशेजाऱ्यांमध्ये प्रेम राहिलेले नाही इतके काय पण लोक अक्षरशः एकमेकांच्या जीवावर उठले आहेत हे उदाहरणे देऊन त्यात सुस्पष्ट केले आहे; याचेच एक ढळढळीत उदाहरण बोस्निया-हर्जेगोविना आणि र्वांडाचे आहे; या ठिकाणी वेगवेगळ्या वंशाचे आणि धर्माचे असूनही वर्षांनुवर्षे अगदी खेळीमेळीने राहिलेल्या लोकांनी पुढे एकमेकांची कत्तल केली.
“येथल्या म्हणजे अमेरिकेतल्या परिस्थितीबद्दल बोलताना एकटे राहणाऱ्या वयस्कर लोकांच्या समस्येचा उल्लेख केला होता ज्यांची कोणीही पर्वा करत नाही; हस्तपत्रिकेवरील एक चित्र अर्थात कडेकोट सुरक्षा असलेल्या आणि अर्धवट उघडलेल्या दारातून डोकावून पाहणाऱ्या त्या भयभीत स्त्रीचे चित्र विशेष लक्ष वेधून घेणारे होते.”
द फिलॉसफिकल लिट्रेचर क्लब इम्प्रेस्याने स्लोवेनियातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला अशी विनंती केली: “दुःखाची गोष्ट अशी की, स्लोवेनियामध्ये धार्मिक सत्यांच्या स्पष्टीकरणासाठी आम्हाला रोमन कॅथलिक चर्चकडेच वळावे लागते. पण या धार्मिक सत्यांची अधिक चांगली समज मिळावी म्हणून ‘सर्व लोक एकमेकांवर कधी प्रीती करतील का?’ या हस्तपत्रिकेच्या ५० प्रती आम्हाला पाठवण्याची नम्र विनंती करत आहोत. ही हस्तपत्रिका आम्हाला वेगळी वाटली केवळ त्यातील माहितीमुळेच नव्हे तर त्यात दिलेल्या चित्रांच्या बाबतीत देखील.”
जगातले सर्व लोक शांतीने आणि ऐक्याने राहू शकतील याचा पुरावा तुम्हाला हवा असेल तर कृपया पुढील तिकिट भरून ते टपालाने आम्हाला पाठवून द्यावे.
□ देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक मला पाठवा. त्यासाठी मी रु. ६ पाठवत आहे.
□ मला एक मोफत गृह बायबल अभ्यास हवा आहे; तरी यासंबंधी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.