वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १०/८ पृ. ३१
  • आज अनेकजण रक्‍त का नाकारत आहेत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आज अनेकजण रक्‍त का नाकारत आहेत?
  • सावध राहा!—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • रक्‍ताने जीवन वाचविणे—कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • रक्‍त संक्रमण–किती सुरक्षित?
    रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
  • रक्‍तसंक्रमणाचा वादग्रस्त इतिहास
    सावध राहा!—२०००
  • रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते? या माहितीपत्रकाच्या अभ्यासासाठी प्रश्‍न
    आमची राज्य सेवा—२००१
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 १०/८ पृ. ३१

आज अनेकजण रक्‍त का नाकारत आहेत?

अलीकडेच आँटेरिओ न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण, ऐतिहासिक निर्णय घेतला. दोन व्यक्‍तींना एकाच रक्‍तदात्याचे दूषित रक्‍त दिले गेले तेव्हा या दोघांनाही एचआयव्हीचा संसर्ग झाला; यासाठी न्यायालयाने कॅनडियन रेड क्रॉसला जबाबदार धरले. या प्रसंगी न्यायाधीश स्टिव्हन बॉरिन्स म्हणाले: “दूषित रक्‍त देऊन रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार अत्यंत भयानक असून याबाबतीत तातडीने पावले उचलणे अत्यावश्‍यक आहे.”

सन १९८० च्या दशकात सुमारे १,२०० कॅनडियन लोकांना एचआयव्हीचा, तर आणखीन १२,००० लोकांना हेपाटायटीस सीचा संसर्ग झाला होता; या सर्वांचे कारण एकच: दूषित रक्‍त व दूषित रक्‍त उत्पादने. याचे प्रमाण कमी करण्यासाठी रक्‍तदात्यांची आता अधिक काळजीपूर्वक तपासणी केली जाते. पण सगळेच रक्‍तदाते आपला लैंगिक पूर्वेतिहास खरे खरे सांगत नाहीत. उदाहरणार्थ, संयुक्‍त संस्थानांतील एका सर्वेक्षणानुसार ५० पैकी १ रक्‍तदाता धोकेदायक गोष्टी केल्याचे कबूल करत नाही जसे की समलैंगिक संभोग किंवा वेश्‍येसोबतचे शरीरसंबंध.

या समस्येत भर घालणारी दुसरी गोष्ट म्हणजे, रक्‍ताची चाचणी केली म्हणजे धोका पूर्णपणे टळला आहे असे नाही. नव वैज्ञानिक (इंग्रजी) या नियतकालिकानुसार, “एचआयव्हीची लागण झाल्यापासून तीन आठवड्यांच्या आत एखादी व्यक्‍ती रक्‍तदान करते तेव्हा या विषाणूंचा तपास लावण्यात केलेल्या सर्व चाचण्या फोल ठरतात. हेपाटायटीस सीच्या बाबतीत तर संसर्ग झाल्यापासून दोन महिन्यांपर्यंत देखील विषाणूंचा पत्ता लागत नाही.”

अलीकडील काळात, रक्‍तदान करण्यात किंवा रक्‍त स्वीकारण्यात कॅनडियन लोकांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. स्तंभलेखक पॉल श्रॉट्‌स लिहितात: “रक्‍तदान करण्यात कपात होत असताना तसेच रक्‍तदान करू न शकणाऱ्‍यांच्या संख्येत वाढ होत असताना रक्‍त पर्यायी औषधांचा शोध लावण्यात यहोवाचे साक्षीदार आघाडीवर आहेत ही देवाची कृपाच म्हणावी.”

गंमतीची गोष्ट अशी की, द टोरोन्टो स्टारने दिलेल्या अहवालानुसार अलीकडेच जवळजवळ ४० लोकांना “रक्‍त संक्रमण नको असल्यामुळे आपण यहोवाच्या साक्षीदार आहोत असे खोटे सांगून ते कॅनडियन रुग्णालयांत भरती झाले.” सर्वेक्षणे दाखवून देतात, की सुमारे ९० टक्के कॅनडियन लोक रक्‍त पर्यायी औषधेच घेणे अधिक पसंत करतात. म्हणूनच असे म्हणता येईल, की रक्‍ताचा वापर आता धार्मिक वादाच्या भोवऱ्‍यात अडकलेला विषय राहिलेला नाही.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा