“अव्वल दर्जाचे मासिक”
तुम्हाला कधी सावध राहा! मासिक वाचण्याचा योग आला का? तुमच्या हातातल्या या मासिकाला तुम्ही कोणता दर्जा द्याल? यातील लेख तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण व उत्तमप्रकारे सचित्रित केलेले वाटतात का?
नायजेरियातील एका स्वच्छंदी लेखकाने लिहिले: “यहोवाचा साक्षीदार नसलो तरीही सावध राहा! मासिकाचा एकही अंक मी चुकवत नाही. सावध राहा! एक अव्वल दर्जाचे मासिक आहे. त्यातून मला अनेकानेक सर्जनशील कल्पना मिळतात. त्याची मुखपृष्ठे दिलखेचक असून खुल्या मनाने वाचणाऱ्या व्यक्तीच्या मनात हे मासिक वाचण्याची अनावर इच्छा निर्माण करतात. सावध राहाचा! हरएक अंक उल्लेखनीय सर्जनशीलतेची, तर त्याचे हरएक पृष्ठ पत्रकाराच्या उत्कृष्टपणाची ग्वाही देते. त्यातील लेख समयोचित व उत्तमप्रकारे लिहिले असल्यामुळे प्रत्येक अंक लाखमोलाच्या माहितीचा जणू खजिनाच आहे.”
आम्ही तुम्हाला सावध राहा! मासिकाच्या या अंकातील लेखांचे परीक्षण करण्याचे उत्तेजन देतो. तुम्हाला दुसरी एक प्रत हवी असल्यास कृपया Praharidurg Prakashan Society, Plot A/35, Nr Industrial Estate, Nangargaon, Lonavla 410 401, Mah., India, या पत्त्यावर अथवा पृष्ठ ५ वर दिलेल्या पत्त्यावर याची मागणी करा. आम्ही जरूर तुम्हाला पुढील अंक पाठवू किंवा मग आपल्या काळाचे महत्त्व काय याची चर्चा करण्यासाठी कोणी तुमच्या घरी यावे अशी तुम्ही विनंती केल्यास तशी व्यवस्थाही आम्ही जरूर करू.