वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ८/८ पृ. १४
  • मनोरंजनाच्या बाबतीत निवडक असा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मनोरंजनाच्या बाबतीत निवडक असा
  • सावध राहा!—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • हितकारक मनोरंजन कसे निवडावे
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • तुम्हाला मिळू शकते हितावह करमणूक
    सावध राहा!—१९९७
  • यहोवाच्या दृष्टीने चांगलं मनोरंजन निवडा
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • विचार करून मनोरंजन निवडा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ८/८ पृ. १४

मनोरंजनाच्या बाबतीत निवडक असा

मनोरंजनाचा तुमच्या मुलावर कोणता परिणाम होतो? सुमारे ३० वर्षे मुलांबरोबर कार्य केलेले व शिक्षक आणि डॉक्टर या नात्याने काम करणारे अल्वीन पूसन यांना खात्री पटली आहे, की सेक्स आणि हिंसा असलेले चित्रपट पाहिल्याने युवकांना वाटते, की अशाप्रकारची वर्तणूक सर्वसामान्य आहे. ते आणखी एका धोक्याकडे लक्ष वेधतात: “अशा प्रकारचे चित्रपट पाहून घरी आलेली मुलं घाबरलेली, किंवा अति आक्रमक होताना मी स्वतः पाहिलेलं आहे. याहूनही वाईट म्हणजे, काहींनी कवटाळण्यास, अंगठा चोखण्यास किंवा बिछाना ओला करण्यास पुन्हा सुरवात केल्याचे देखील मी पाहिलं आहे.” या डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, तज्ज्ञांना मते अशा वर्तणुकीसाठी, शारीरिक किंवा लैंगिक शोषण किंवा युद्ध-क्षेत्रात राहणे इत्यादी, घटना देखील कारणीभूत ठरतात. ते डॉक्टर पुढे म्हणतात: “आपल्यातील कोणीच आपल्या मुलाला अशा परिस्थितीत स्वतःहून ढकलणार नाही, पण खऱ्‍या जीवनामध्ये ज्या गोष्टी त्यांनी पाहू नयेत अशी आपण अपेक्षा करतो त्या गोष्टी ते चित्रपटांमध्ये पाहतात तेव्हा आपण त्यांना अडवतही नाही.”

ख्रिश्‍चनांकडे, मनोरंजनाच्या बाबतीत निवडक असण्याकरता व त्यांनी निवडलेले मनोरंजन त्यांना बायबल तत्त्वांचा भंग करण्यास प्रवृत्त करीत नाही याची खात्री करण्याकरता ठोस कारण आहे. जसे की, स्तोत्र ११:५ म्हणते: “नीतिमान आणि दुष्ट यांना तो कसोटीला लावतो; हिंसा ज्यांना प्रिय आहे, अशांचा तो द्वेष करतो.” (सुबोध भाषांतर) तसेच ख्रिस्ती प्रेषित पौलाने लिहिले: “तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ . . . हे जिवे मारा; . . . क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणापासून दूर करा.”—कलस्सैकर ३:५, ८.

यास्तव, पालक आपल्या मुलांकरता व स्वतःकरता जे मनोरंजन निवडतात ते ‘देहाच्या कर्मांना’ बढावा देत नाहीत याची त्यांनी खबरदारी बाळगली पाहिजे. (गलतीकर ५:१९-२१) त्यांनी, आपल्या मनोरंजनाचा दर्जा आणि प्रमाण या दोहोंचा विचार करून निवडक असले पाहिजे.—इफिसकर ५:१५-१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा