वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ७/८ पृ. ३२
  • तिचा देवावर विश्‍वास का नव्हता?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तिचा देवावर विश्‍वास का नव्हता?
  • सावध राहा!—१९९८
सावध राहा!—१९९८
g98 ७/८ पृ. ३२

तिचा देवावर विश्‍वास का नव्हता?

सोव्हियत युनियनचे भूतपूर्व प्रजासत्ताक, जॉर्जिया, रूस्तावी येथील अलेस्या नामक एका तरुणीने तिच्या घरी आलेल्या दोघांना आपल्या आईवडिलांचा फोटो दाखवला व म्हणाली: “देव असता, तर त्याने माझ्या आईवडिलांना इतक्या तरुण वयात मारलं नसतं!” अलेस्याचा पती, टोमाझी घरी आला तेव्हा या दोघांनी भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! आणि “पहा! मी सर्व नवे करतो” ही माहितीपत्रके दिली आणि ते निघून गेले.

या दांपत्याला पुनर्भेट देण्यात आली तेव्हा, अलेस्याने “पहा!” माहितीपत्रक वाचले होते आणि तिला बायबलचा अभ्यास करायचा होता. तिने जे काही वाचले ते तिला आवडले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेत, ती पटापट माहितीपत्रक उघडून तिने अधोरेखीत केलेले भाग वाचून दाखवत होती. त्यातली वाजवी कारणमीमांसा तिला अतिशय आवडली होती.

उदाहरणार्थ, ते माहितीपत्रक म्हणते: “फुले, पक्षी, प्राणी, मानव या नावाने ओळखला जाणारा आश्‍चर्यजनक प्राणी, जीवन व जननाचे चमत्कार ह्‍या आपल्या सभोवतालच्या सुंदर गोष्टी, त्यांना घडवणाऱ्‍या बुद्धीवंताविषयी साक्ष देतात. (रोमकर १:२०) जेथे बुद्धी असते तेथे मन असते. जेथे मन असते तेथे एक व्यक्‍ती असते. सर्वोच्च बुद्धी ही सर्व जीवनमात्रांच्या निर्मात्याची, जीवनाच्या स्रोताची, सर्वोच्च व्यक्‍तीची आहे. (स्तोत्रसंहिता ३६:९) सृष्टीकर्ता हा खरोखरच सर्व प्रशंसेला व आराधनेला पात्र आहे.—स्तोत्रसंहिता १०४:२४; प्रकटीकरण ४:११.”

नंतर अलेस्याने सांगितले की, मृत पावलेल्या प्रियजनांना पुनरुत्थित करण्याच्या देवाच्या अभिवचनाबद्दल वाचूनच खरे तर ती बायबलचा अभ्यास करायला प्रवृत्त झाली होती. या माहितीपत्रकांमधील विश्‍वास बळकट करणाऱ्‍या माहितीचा तुम्हालाही लाभ होईल याचा आम्हाला विश्‍वास आहे. तुम्हाला भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! आणि “पहा! मी सर्व नवे करतो” यांची प्रत हवी असल्यास, अथवा मोफत गृह बायबल अभ्यास चालवण्यासाठी तुमच्याकडे कोणी यावे अशी तुमची इच्छा असल्यास, कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर लिहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा