वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ७/८ पृ. १६
  • ‘ते जणू मध चाखण्यासारखे होते’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘ते जणू मध चाखण्यासारखे होते’
  • सावध राहा!—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही त्रैक्य मानावे का? या माहितीपत्रकाच्या अभ्यासाचे प्रश्‍न
    आमची राज्य सेवा—१९९०
  • तुम्ही त्यावर विश्‍वास ठेवणार का?
    तुम्ही त्रैक्य मानावे का?
  • ती पवित्र शास्त्राची स्पष्ट शिकवण आहे का?
    तुम्ही त्रैक्य मानावे का?
  • त्रैक्याचे स्पष्टीकरण कसे देण्यात येते?
    तुम्ही त्रैक्य मानावे का?
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ७/८ पृ. १६

‘ते जणू मध चाखण्यासारखे होते’

सन १९९३ च्या मध्यात ॲल्टस, ओक्लाहोमा, अमेरिका येथील यु.एस. हवाई दलात लष्करी अधिकारी असलेल्या एका चिंतातूर पित्याने आपल्या मुलीची मदत करता यावी म्हणून मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली; या मुलीच्या वैवाहिक जीवनात अनेक वादळे उठली असून ती घटस्फोट घेण्याच्या बेतात होती. दुसऱ्‍या दिवशी सकाळीच यहोवाच्या साक्षीदारांनी या गृहस्थाचे दार ठोठावले व सावध राहा! नियतकालिकाचा जुलै ८, १९९३ चा (इंग्रजी) अंक त्याला दाखवला; अंकाचा विषय होता: “घटस्फोट—आनंदी जीवनाचे द्वार?”

यापूर्वी या गृहस्थाला यहोवाचे साक्षीदार कधीच पसंत नव्हते व त्याने चुकूनही कधी त्यांचे ऐकून घेतलेले नव्हते; आज मात्र त्याने लगेच, ते सावध राहा! नियतकालिक स्वीकारले व वाचूनही काढले. नंतर त्यातील शास्त्रवचने व मुद्दे त्याने आपल्या मुलीला सांगितले. सावध राहा! याबरोबर दिलेला टेहळणी बुरूज नियतकालिकेचा अंक देखील त्याने वाचून काढला. त्यातील एका लेखाने, तो आयुष्यभर मानत असलेल्या त्रैक्याच्या शिकवणुकीचा अधिक खोलवर जाऊन विचार करण्यास त्याला प्रवृत्त केले. मुलीची मदत करण्यासंबंधी आपण केलेल्या प्रार्थनेचेच उत्तर आपल्याला मिळाले आहे हे त्याच्या लक्षात आले; तथापि, आपल्या प्रार्थनांचे उत्तर देण्यासाठी देव, त्रैक्यावर मुळीच विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांचा उपयोग का करील असा एक प्रश्‍न त्याला पडला. त्याने तर्क केला, की प्रार्थनांचे उत्तर देण्यासाठी सत्य न शिकवणाऱ्‍या लोकांचा देव कधीही उपयोग करत नाही.

यास्तव, त्रैक्यासंबंधी यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्‍वासांचे अधिक तपशीलवार स्पष्टीकरण देणारी साहित्ये प्राप्त करण्यासाठी त्याने त्यांच्या राज्य सभागृहास फोन केला. फोनवर या गृहस्थाशी संभाषण करणारी व्यक्‍ती खरे तर ख्रिस्ती वडिलांच्या सभेत उपस्थित होती. वेळ न दवडता हा लष्करी अधिकारी राज्य सभागृहात गेला आणि तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक व तुम्ही त्रैक्य मानावे का? हे माहितीपत्रक त्याला देण्यात आले.

त्याच रात्री या गृहस्थाने संपूर्ण माहितीपत्रक वाचून काढले. वाचता वाचता तो इतका उत्साही होत होता, की त्याने नंतर सांगितल्याप्रमाणे, मध्येमध्ये थांबून त्याला स्वतःस सांगावे लागले, ‘सावकाश! सावकाश! असे होऊच शकत नाही. हे सर्वस्वी अविश्‍वसनीय आहे.’ सदर माहितीपत्रकाने इतक्या स्पष्टपणे त्रैक्याच्या शिकवणुकीविरुद्ध बायबल पुरावे सादर केले होते की ते वाचल्यानंतर त्याने म्हटले, “ते जणू मध चाखण्यासारखेच होते.” दुसऱ्‍या दिवशी संध्याकाळी तो पहिल्यांदाच यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहिला व तेथे त्याने जे काही ऐकले त्यावरून तो खूप खूष झाला.

यहोवाच्या साक्षीदारांसोबतच्या आपल्या पहिल्या बायबल अभ्यासानंतर व धूम्रपानावरील बायबलच्या दृष्टिकोनाची पुरती चर्चा केल्यानंतर त्याने आपल्या सिग्रेटी नष्ट केल्या व पुन्हा कधीच त्यांना हात लावला नाही. आठवड्यातून अनेकवेळा त्याच्यासोबत बायबल अभ्यास केला गेला. त्रैक्य माहितीपत्रक वाचल्याच्या तीन महिन्यांनंतर व लष्करातून सेवा निवृत्त झाल्यानंतर तो यहोवाच्या साक्षीदारांसह जाहीर प्रचार कार्यात सहभागी होऊ लागला. तीन महिन्यांनंतर, यहोवाला केलेल्या समर्पणाचे प्रतीक म्हणून त्याने पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. आज एक पूर्ण-वेळेचा सेवक या नात्याने तो सेवा करत आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा