उद्ध्वस्त होणाऱ्या संसारास साह्य
न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडवरील एका स्त्रीने कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकाविषयी असे लिहिले: “अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदाच मी हे पुस्तक हाती घेतलं तेव्हा मला असं वाटलं जणू माझा विवाह अशा एका टप्प्यावर येऊन पोहंचला होता जेव्हा मी एकतर तो ‘टिकवू शकत होते किंवा मोडू शकत होते.’”
तिने आपली पार्श्वभूमी याप्रकारे स्पष्ट केली. “माझ्या आईचा दोन वेळा विवाह झाला असून दोन्ही विवाहात तिनं खूप अत्याचार सहन केला होता. त्यामुळं, आम्हाला असं शिकवलं गेलं होतं, की पुरुष काहीएक कामाचे नसतात आणि स्त्रियांवर अत्याचार करणं हाच एक त्यांचा हेतू असतो. म्हणून मग मी अतिशय निगरगट्ट, हट्टी स्त्री बनले आणि वादविवादांत तर मी कधीच हार मानत नसे.”
या स्त्रीला बदल करण्याची गरज जाणवली. “मला याची जाणीव झाली, की माझ्या पतीच्या अधीन न राहिल्यामुळे, शिवाय मी अतिशय ताठर मनाची असल्यामुळे कौटुंबिक सौख्यानंद प्राप्त करण्याची शक्यता मी गमावून बसत होते.” यास्तव, तिने आवश्यक ते बदल केले. ती म्हणते: “मी आणि माझे पती, कुटुंब या नात्याने त्या पुस्तकाचा आता अभ्यास करत आहोत आणि एक ख्रिस्ती पत्नी कसं बनावं ते मी अजूनही शिकत आहे. सध्या आमच्या दोघांमध्ये जो नातेसंबंध आहे त्याबद्दल आम्ही आनंदी आहोतच पण आम्हाला अजून पुष्कळ प्रगती करायची आहे.
“यापूर्वी आमचं घरकुल कधीच इतकं प्रेमळ व शांतिमय नव्हतं.”
देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकातील ८ वा पाठ, “देवाला संतुष्ट करणारे कौटुंबिक जीवन” हा विषय हाताळतो; ६ रुपयांच्या अनुदानात असलेले हे ३२ पानी माहितीपत्रक तुम्हालाही हवे असल्यास अथवा तुमच्यासोबत कोणी मोफत गृह बायबल अभ्यास करावा अशी तुमची इच्छा असल्यास, कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर लिहा.