वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १२/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—२०००
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 १२/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनोगत

अर्भक मृत्यू “जगावरील दृष्टिक्षेप” यातील “धुम्रपानाचा संबंध अर्भक मृत्यूशी” (जानेवारी २२, १९९७, इंग्रजी) ह्‍या शीर्षकाखालील विशेष माहिती प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहे. मला असं वाटतं, की हरएक आई या माहितीकडे गांभीर्यानं पाहील. गरोदर असताना मी धुम्रपान करत राहिल्यामुळं SIDS (सडन इन्फॅन्ट डेथ सिन्ड्रोम) या आजारापायी माझा तान्हा मुलगा मरता मरता वाचला. या शोकांतिकेनंतर वर्षभर त्याला हार्ट मॉनिटरवरच जगावं लागलं, जेणेकरून तो झोपलेला असताना त्याचं हृदय बंद पडलं, की मॉनिटर लगेच धोक्याची सूचना द्यायचा. हे सगळं होण्याआधीच मला यहोवाची ओळख झाली असती तर किती बरं झालं असतं! मी धुम्रपान करण्याचं सोडून दिलं असतं, शिवाय माझ्यावर आणि माझ्या मुलावर हा भयंकर प्रसंग ओढवण्याची वेळही आली नसती.

ए. सी. ए., संयुक्‍त राष्ट्रे

संधिदाह रोगी “जेव्हा मी अशक्‍त तेव्हाच मी सशक्‍त” (जानेवारी २२, १९९७, इंग्रजी) असं शीर्षक असलेल्या, लूरेटा मास यांच्या अनुभवासाठी मी कृतज्ञता व्यक्‍त करू इच्छिते. मी २७ वर्षांची असून मला देखील संधिवाताभ दाहाचा रोग आहे. चिकित्सेमुळं थोडाफार गुण येत असला तरी मला काहीसं निराश आणि नाउमेद वाटतं, कारण या आजारापायी मला पूर्ण-वेळ प्रचारकाच्या सेवेतून अंग काढावं लागलं. आपल्या आजारातही यहोवाची सेवा करत राहण्याचा लूरेटा मासचा दृढसंकल्प उत्तेजनात्मक होता. मी निराशेला माझ्यावर मात करू देणार नाही; मला अधिकाधिक प्रचार कार्य करायचं आहे.

ए. बी., इटली

माझ्या आईला ३० पेक्षा अधिक वर्षांपासून संधिवाताभ दाहाचा रोग आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे, हा दाह कमी करणे जवळजवळ अशक्यच आहे. एवढं असूनही माझी आई, मंडळीच्या बहुधा सर्व सभांना उपस्थित राहते याचं मला फार कौतुक वाटतं. आपल्या व्हिलचेअरवर बसून ती ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत भाग घेते आणि अजूनही प्रचार कार्य करू शकते. इतकं दुखणं असून सुद्धा तिच्या तोंडून कधीही तक्रारीचा सूर निघत नाही.

एस. एम., जर्मनी

नोहाकालीन जलप्रलय “बायबलचा दृष्टिकोन: जलप्रलय—सत्य अथवा दंतकथा?” (मार्च ८, १९९७) या लेखानं त्या ऐतिहासिक घटनेचा गांभीर्यानं विचार करण्यास मला मदत केली. इतर अनेकांप्रमाणं, लहान असताना मलाही जलप्रलयाबद्दल शिकवलं गेलं होतं. पण, अनेक लोक जलप्रलयाच्या अहवालाकडे, निव्वळ झोपताना मुलांना सांगावयाची एक गोष्ट, या दृष्टिकोनातून पाहतात हे मात्र मला ठाऊक नव्हतं. ज्याअर्थी येशू, शेवटल्या काळाची तुलना नोहाच्या दिवसांशी करतो हीच बाब दाखवून देते, की जलप्रलय एक वास्तविक घटना होती.

एस. एम., संयुक्‍त संस्थाने

अध्ययन असमर्थता मला दहा वर्षांचा मुलगा असून त्याला गंभीर स्वरूपाचा एडीएचडी विकार आहे. सांगण्यास अतिशय आनंद होतो की, “अध्ययन असमर्थतांशी झुंजणाऱ्‍या मुलांना साहाय्य” (मार्च ८, १९९७) ही श्रृंखला प्रकाशित झाल्यापासून अनेक स्नेह्‍यांनी मला हे सांगितलं, की त्यांनी ही विकृती समजून मला साहाय्य करण्याचा प्रयत्न केला असला तरी, मला आणि माझ्या मुलाला नेमकं कसं वाटत होतं हे मात्र ते कधीच समजू शकले नव्हते. अनेकांनी असंही सांगितलं, की साहाय्य करण्यास ते पहिल्यापेक्षा आता अधिक इच्छुक असतील. मंडळीतील एका बहिणीनं वेळ काढून माझ्या मुलासोबत या लेखाची उजळणी केली आणि त्याला उत्तेजन दिलं. नंतर माझ्या मुलानं मलाही ते मासिक पुन्हा वाचून दाखविण्यास सांगितलं.

एल. ए. डी., संयुक्‍त संस्थाने

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा