वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ११/८ पृ. ३२
  • बायबल हस्तपत्रिका काय साध्य करू शकतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबल हस्तपत्रिका काय साध्य करू शकतात
  • सावध राहा!—१९९७
सावध राहा!—१९९७
g97 ११/८ पृ. ३२

बायबल हस्तपत्रिका काय साध्य करू शकतात

रशियामध्ये मॉस्को जवळील गॉलिटसिनॉ शहरात, एका यहोवाच्या साक्षीदाराने, बाबागाडी ढकलत नेणाऱ्‍या एका स्त्रीला, कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा ही हस्तपत्रिका दिली. साक्षीदार पुढे चालू लागला, पण तेवढ्यात, ती स्त्री आपल्यालाच हाक मारत असल्याचे त्याने ऐकले. त्याला गाठण्यासाठी ती स्त्री बाबागाडी ढकलत ढकलत अक्षरशः त्याच्यामागे धावत होती.

त्या स्त्रीने आणखीन शिकून घेण्याची इच्छा व्यक्‍त केल्यामुळे साक्षीदाराने तिला बायबल विषयांवरील आणखीन दोन हस्तपत्रिका दिल्या. शिवाय, संपर्क साधण्यासाठी त्याने आपला फोन नंबरही तिला दिला. त्याच दिवशी संध्याकाळी तिने फोन केला आणि तिच्याबरोबर एक साप्ताहिक बायबल अभ्यास करण्याच्या योजना आखल्या गेल्या. केवळ सात महिन्यांतच, त्या स्त्रीने व तिच्या धाकट्या बहिणीने देवाची सेवा करण्यासाठी आपले समर्पण केले व त्यांचा बाप्तिस्मा झाला.

कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा, खिन्‍न झालेल्यांना सांत्वन, जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो? आणि शांतीदायक नवीन जगातील जीवन, या बायबलवर आधारित हस्तपत्रिका तुम्हालाही वाचायची इच्छा असल्यास, कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर लिहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा