“त्यानं आयुष्यात वाचलेलं ते पहिलंच पुस्तक होतं”
युक्रेनमधील यहोवाचे साक्षीदार, ट्रेनची वाट पाहत असलेल्या लोकांसोबत नेहमीच बोलत असतात. बायबलविषयी रुची असलेल्या एका स्त्रीला, बायबल कथांचं माझं पुस्तक देण्यात आले होते; हे असे एक प्रकाशन आहे ज्यात चित्रांचा मुक्तहस्ताने उपयोग केला असून, बायबलच्या इतिहासाचे कथन देखील अनुक्रमाने करण्यात आले आहे.
नंतर पुन्हा एकदा, त्याच स्टेशनवर या स्त्रीची साक्षीदाराशी गाठ पडली आणि पुस्तकासाठी तिने तिचे आभार मानले. ती म्हणाली: “माझ्या मुलाला शाळेच्या पुस्तकांचा नुसता वीट आला होता. त्यानं कधी त्यांचं वाचनही केलं नसेल. पण मग, बायबल कथा पुस्तक मी त्याला दिलं तेव्हा त्यातली चित्रं त्यानं नजरेखालून घातली आणि ते वाचून काढण्याची अनावर इच्छा त्याच्यात निर्माण झाली. काही दोन आठवड्यांतच त्यानं संपूर्ण पुस्तक वाचून काढलं. त्यानं आयुष्यात वाचलेलं ते पहिलंच पुस्तक होतं. पण त्याही पेक्षा अधिक म्हणजे, देवाची ओळख पटल्याचा त्याला सर्वाधिक आनंद झाला. आणि त्याच्यामध्ये झालेले हे बदल पाहून मला स्वतःला देखील खूप आनंद होतोय. कृपया, वाचण्यासाठी मला आणखीन काहीतरी द्या.”
जवळच उभ्या असलेल्या आणखीन एका स्त्रीने त्यांचे संभाषण ऐकले. तिलाही बायबल कथांचं माझं पुस्तक याची एक प्रत मिळेल का, असे तिने विचारले. तुम्ही देखील हे २५६ पृष्ठांचे पुस्तक प्राप्त करू शकता अथवा बायबल शिक्षणाच्या मूल्यावर चर्चा करण्यासाठी कोणालातरी आपल्या घरी बोलवू शकता; त्यासाठी Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ ५ वर दिलेल्या उचित पत्त्यावर लिहा.