“सावध राहा! वाचून पाहण्याचीही तसदी मी कधी घेतली नव्हती!”
हे आहेत, कॅलिफोर्निया येथील सॅन जोस स्टेट युनिव्हर्सिटीत पर्यावरणसंबंधी अभ्यासक्रम करत असलेल्या एका विद्यार्थिनीचे शब्द. ती पुढे म्हणते: “या नियतकालिकात—‘चर्चला नियमित जा,’ किंवा ‘यहोवाचे साक्षीदार बना,’ वगैरे उपदेश असतील असा माझा ग्रह होता. पण मी हा अंक (जानेवारी ८, १९९६, [इंग्रजी] ‘आपला धोक्यात असलेला ग्रह—वाचवता येईल का?’) वाचला तेव्हा त्यातील वस्तुतः माहिती वाचून मी थक्क झाले! या अंकातील लेखांसोबत ‘जगातील काही प्रमुख पर्यावरण समस्या’ या शीर्षकाची एक माहितीवर्धक आकृती आहे, ज्यामध्ये जंगलतोड, विषारी गाळसाळ, वातावरणातील प्रदूषण, पाण्याची टंचाई, लोप पावण्याच्या मार्गावर असलेले प्राणी आणि जमिनीची झीज या समस्या असलेली ठिकाणे दाखवण्यात आली आहेत.
“मला अद्याप मुलं नाहीत पण समजा झालीच, तर त्यांना शुद्ध हवा, खेळायला बगिचे किंवा जिवंत राहायला पाणी तरी असेल की नाही असा प्रश्न मला पडतो. . . . या लेखांसाठी मी तुमची प्रशंसा करते.”
सावध राहा! नियतकालिकाच्या प्रत्येक अंकाचे सध्या १ कोटी ८३ लाख प्रतींचे ८० भाषांमध्ये वितरण आहे, त्यापैकी ५६ प्रती एकाच वेळी प्रकाशित होतात. तुम्हाला नियमितपणे ही पत्रिका वाचायची असल्यास, कृपया तुमच्या भागातल्या यहोवाच्या साक्षीदारांशी दूरध्वनीने किंवा स्थानीय राज्य सभागृहात किंवा पृष्ठ ५ वर दिलेल्या जवळच्या पत्त्यावर लिहून संपर्क साधा.