“मानवजातीसाठी एक उदात्त कार्य”
“ह्या पुस्तकाचं प्रकाशन करून मानवजातीकरता तुम्ही एक उदात्त कार्य केलंय. ते विलक्षण आहे. संकलनही सर्वोत्कृष्ट स्वरूपाचं. खरोखर मूल्यांकन करण्यालायक.
“ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे, धर्माच्या हरएक पैलूंना ते स्पर्श करते आणि असं करत असता टीका न करण्याची खबरदारी घेतली गेली होती. शाबास. खरोखर एक उत्कृष्ट पुस्तक.”
हे पत्र लिहिणारे भारतातील तिरुचिरापल्ली येथील डॉक्टर कोणत्या पुस्तकाचा उल्लेख करत होते? विश्वभरातील मुख्य धर्मांचे—हिंदू, बौद्ध, ताओ, कन्फ्यूशस, शिंटो, ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांचे उगम तसेच त्यांच्या शिकवणुकी यांचे ३८४ पृष्ठांत संकलित केलेले देवासाठी मानवजातीचा शोध (इंग्रजी) ह्या पुस्तकाचा ते उल्लेख करत होते. याचे शेवटले अध्याय, आधुनिक अविश्वास आणि सत्य देवाकडे वळणे यांविषयीचे स्पष्टीकरण देतात. ह्या पुस्तकाच्या १.६ कोटीहून अधिक प्रती ३७ भाषांत छापल्या गेल्या आहेत.
ह्या डॉक्टरांनी, दुसऱ्या एकाचे पुस्तक घेऊन वाचले होते. आपली स्वतःची एक प्रत त्यांना हवी होती. ह्या सचित्र पुस्तकाचे तुम्हाला स्वतः परीक्षण करावयाचे असल्यास तुमच्या क्षेत्रातील यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा अथवा या नियतकालिकातील पृष्ठ ५ वर दिलेल्या सगळ्यात जवळच्या पत्त्यावर लिहा.