तुम्हाला बायबलच्या ज्ञानाची लालसा आहे का?
बायबलच्या चर्चेवर साम्यवादी राष्ट्रांमध्ये दशकानुदशके निर्बंध होता. तथापि, शीत युद्ध संपुष्टात आल्यापासून तेथील सहस्त्रावधी लोक बायबलच्या ज्ञानाचा शोध घेऊ लागले आहेत. हे विशेषतः भूतपूर्व सोविएत संघराज्याच्या प्रजासत्ताक देशांमध्ये घडत असले तरीसुद्धा पौर्वात्य युरोपीय देशांतही सारखीच परिस्थिती आढळते.
उदाहरणार्थ, हंगेरी येथील पेक्स नामक ठिकाणी, जीवशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय शिकवणाऱ्या एका ४५-वर्षीय शिक्षिकेस बायबलवर चर्चा केल्याने अतिशय आनंद झाला. या शिक्षिकेने लिहिले, “मी बुडापेस्टला गेले असता तेथे यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकाशी बोलण्याचा विलक्षण आनंददायक अनुभव मला मिळाला. मला शास्त्रवचने वाचावयास खूप आवडते व बायबल अभ्यास घेण्यास मला नक्कीच आनंद होईल. तुमच्या मदतीचा मी कृतज्ञतेने स्वीकार करीन.”
यहोवाचे साक्षीदार सर्वत्र लोकांना, आनंदाने अशा प्रकारची मदत देतात. तुमच्यासोबत बायबलवर चर्चा करण्यासाठी कोणी तुमच्या घरी यावे अशी तुमची इच्छा असल्यास, कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ ५ वर असलेल्या योग्य पत्त्यावर लिहा.